Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Inspirational > गरिबीवर मात! शेजाऱ्याकडून १०० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय; आता कोट्यवधींची मालकीण

गरिबीवर मात! शेजाऱ्याकडून १०० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय; आता कोट्यवधींची मालकीण

Shareefa Kalathinga : १०० रुपये उधार घेऊन आपला व्यवसाय सुरू केला आणि आज त्या तीन हॉटेल्सच्या मालकीण आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 11:27 IST2025-10-24T11:23:14+5:302025-10-24T11:27:05+5:30

Shareefa Kalathinga : १०० रुपये उधार घेऊन आपला व्यवसाय सुरू केला आणि आज त्या तीन हॉटेल्सच्या मालकीण आहेत.

success story of Shareefa Kalathingal who became crorepati hotelier from just rs 100 | गरिबीवर मात! शेजाऱ्याकडून १०० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय; आता कोट्यवधींची मालकीण

गरिबीवर मात! शेजाऱ्याकडून १०० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय; आता कोट्यवधींची मालकीण

केरळमधील मलप्पुरम येथील शरीफा कलाथिंगल यांनी अनोखा आदर्श ठेवला आहे. १०० रुपये उधार घेऊन आपला व्यवसाय सुरू केला आणि आज त्या तीन हॉटेल्सच्या मालकीण आहेत. कोट्टक्कलमध्ये ही हॉटेल्स आहेत. बिकट परिस्थितीमुळे त्यांच्याकडे तांदूळ घ्यायलाही पैसे नव्हते, तेव्हा शरीफा यांनी उन्नियप्पम (तांदळाच्या पिठापासून बनवलेली मिठाई) बनवायला सुरुवात केली आणि ती स्थानिक दुकानांमध्ये विकली. मेहनतीने आपला व्यवसाय सुरू केला. ४० हून अधिक महिलांना आता त्या रोजगार देत आहेत.

शरीफा कलथिंगल यांचा प्रवास गरिबीतून सुरू झाला. पती सक्कीर हे एक पेंटर होते. शेजाऱ्याकडून १०० रुपये उधार घेऊन त्यांनी तांदळाच्या पीठापासून आणि गुळापासून उन्नियप्पम बनवायला सुरुवात केली. एक वर्षाच्या मुलीला उचलून घेऊन त्या हाजियारपल्ली येथील स्थानिक दुकानांमध्ये विकण्यासाठी चार किलोमीटर चालत जायच्या. जेव्हा दहा पाकिटं विकली तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढला.

बँकेने कर्ज नाकारलं, लोकांनी टोमणे मारले

छोट्या छोट्या यशानंतर शरीफा यांनी केटरिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला. गहाण ठेवण्यासाठी काहीच नसल्यामुळे सर्व बँकांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला, त्यांना टोमणे मारले. या नकारामुळे न डगमगता केरळ सरकारचा महिला सक्षमीकरण कार्यक्रम "कुटुम्बश्री" मध्ये सामील होण्याचा मोठा निर्णय घेतला.

"मुथू केटरिंग" सुरू

२०१८ मध्ये कुटुम्बश्रीकडून २ लाख रुपयांचे कर्ज घेतलं आणि मुलगा मुथूच्या नावाने "मुथू केटरिंग" सुरू केलं. व्यवसाय झपाट्याने वाढला. कुटुंबश्रीच्या सल्ल्यानुसार, तिने "डब्बावाला" सेवा देखील सुरू केली, जी सरकारी कर्मचाऱ्यांना दररोज ५० ते ६० जेवण देत होती. सर्व काही व्यवस्थित चालू असताना, २०२० च्या कोरोना साथीच्या आजाराने व्यवसायावर गंभीर परिणाम झाला. सर्व ऑर्डर थांबल्या.

"कॅफे कुटुम्बश्री" नावाचं रेस्टॉरंट

कुटुम्बश्रीने शरीफा यांना मंजेरी मेडिकल कॉलेजमध्ये कोविड-१९ रुग्णांना जेवण पुरवण्याची संधी दिली. संधीचा फायदा घेतला. सुमारे २००० रुग्णांना जेवण पोहोचवण्यास सुरुवात केली. या उद्देशासाठी त्यांनी १०-१५ महिलांना काम दिलं. साथीचा आजार कमी झाल्यानंतर कोट्टाक्कल आयुर्वेद महाविद्यालयात कॅन्टीन चालवण्याची नोकरी मिळाली. या यशानंतर कोट्टाक्कलमध्ये एक हॉटेल खरेदी करून आपला व्यवसाय वाढवला. नंतर कुटुम्बश्रीच्या मदतीने, तिने "कॅफे कुटुम्बश्री" नावाचं रेस्टॉरंट देखील उघडलं.

४० हून अधिक महिलांना रोजगार

आज शरीफा कलाथिंगल यांच्याकडे तीन रेस्टॉरंट्स, तीन कार आणि एक कोटी किमतीचं घर आहे. रेस्टॉरंट्सनी गेल्या आर्थिक वर्षात ५० लाखांचं उत्पन्न मिळवलं. त्या ४० हून अधिक महिलांना रोजगार देतात. त्यांचे पती, सक्कीर हे आता रेस्टॉरंटचं काम पाहतात. शरीफा या ग्राहकांच्या समाधानावर लक्ष केंद्रित करतात. ज्या बँकांनी त्यांना एकेकाळी कर्ज नाकारलं होतं ते आता त्यांना कर्ज देण्यास उत्सुक आहेत. आपल्या समर्पणाने आणि कठोर परिश्रमाने, शरीफा यांनी गरिबीवर मात केली आहे.

Web Title: success story of Shareefa Kalathingal who became crorepati hotelier from just rs 100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.