बिहारची रहिवासी असलेल्या ज्योती राणीने कठीण परिस्थितीचा सामना करून मोठं यश मिळवलं आहे. ज्योतीचे वडील पिकअप ड्रायव्हर आहेत आणि आई अंगणवाडी सेविका आहे. ज्योती राणी ही मूळची बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील रक्सौल ब्लॉकची रहिवासी आहे. त्यांचं वडिलोपार्जित घर बिहार-नेपाळ सीमेजवळील जोकियारी पंचायतीच्या चिकानी गावात आहे.बिहार लोकसेवा आयोग (BPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन ती सीनिअर डेप्युटी कलेक्टर म्हणजेच SDM झाली आहे.
ज्योती राणी एका साध्या कुटुंबातील आहे. तिची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तिने बारावीपर्यंतचं शिक्षण पाटण्यातून पूर्ण केलं. यानंतर त्याने आयआयटीची तयारी करण्यासाठी एक वर्षाचा ब्रेक घेतला. पण तिला यश मिळालं नाही. आयआयटीमध्ये प्रवेश न मिळाल्यानंतर ज्योतीने जयपूरमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये बी.टेक केलं. तिला एका ठिकाणी खासगी नोकरी मिळाली ज्यामध्ये तिला वार्षिक ६ लाख रुपयांचं पॅकेज मिळालं. पण कोरोना लॉकडाऊन दरम्यान तिने ही नोकरी सोडली.
महागड्या कोचिंगऐवजी YouTube वरून केला अभ्यास
ज्योती राणीने कोणत्याही कोचिंगशिवाय बीपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली. ही परीक्षा खूप कठीण मानली जाते. ज्योती राणीने YouTube ची मदत घेतली. ती युट्यूबवर व्हिडीओ पाहून अभ्यास करायची. ज्योतीने सांगितलं की, निकाल आल्यानंतर ती आणि तिचे वडील ढसाढसा रडले. तिने ६७ व्या बीपीएससीमध्ये २५६ वा रँक मिळवला. तिची पहिली पोस्टिंग पश्चिम चंपारण येथे होती.
"मी आणि माझे वडील खूप रडलो”
बीपीएससीचा निकाल पाहिल्यानंतर मी आणि माझे वडील खूप रडलो असं ज्योतीने म्हटलं आहे. यावरून ज्योती आणि तिच्या कुटुंबासाठी हे यश किती महत्त्वाचं होतं हे दिसून येतं. जर तुमच्यात कठोर परिश्रम आणि समर्पणाची आवड असेल तर तुम्ही कोणत्याही अडचणीवर मात करू शकता. परिस्थिती कशीही असो, जर माणूस दृढनिश्चयी असेल तर यश मिळतं हे ज्योतीने सिद्ध केलं आह.