Lokmat Sakhi >Inspirational > Women's Day 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यांची माहिती आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली त्या शिल्पी सोनी, एलिना मिश्रा कोण?

Women's Day 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यांची माहिती आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली त्या शिल्पी सोनी, एलिना मिश्रा कोण?

Women's Day 2025: जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिल्पी साेनी आणि एलिना मिश्रा यांच्या कर्तृत्वाविषयीच्या पोस्ट सोशल मिडियावर शेअर करून त्यांचा गौरव केला आहे.(Prime Minister Narendra Modi Praises Women Scientists Elina Mishra And Shilpi Soni)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2025 12:49 IST2025-03-08T12:34:24+5:302025-03-08T12:49:07+5:30

Women's Day 2025: जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिल्पी साेनी आणि एलिना मिश्रा यांच्या कर्तृत्वाविषयीच्या पोस्ट सोशल मिडियावर शेअर करून त्यांचा गौरव केला आहे.(Prime Minister Narendra Modi Praises Women Scientists Elina Mishra And Shilpi Soni)

prime minister Narendra modi praises women scientists elina mishra and shilpi soni on womens day 2025  | Women's Day 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यांची माहिती आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली त्या शिल्पी सोनी, एलिना मिश्रा कोण?

Women's Day 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यांची माहिती आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली त्या शिल्पी सोनी, एलिना मिश्रा कोण?

Highlightsमुळच्या मध्य प्रदेशच्या असणाऱ्या शिल्पी सोनी सध्या ISRO संस्थेमध्ये GSAT-22/23 या प्रोजेक्टसाठी असोसिएट प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम करत आहेत.

जागतिक महिला दिनानिमित्त सध्या देशभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे (Women's Day 2025). विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव करण्याची, त्यांच्या कार्याला समाजापुढे आणण्याची ही चांगली संधी असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही असाच एक अभिनव उपक्रम या महिलादिनी हाती घेतला आहे. यानिमित्त त्यांनी अवकाश शास्त्रज्ञ शिल्पी सोनी अणुशास्त्रज्ञ एलिना मिश्रा यांच्या कार्याचा गौरव करून त्यांची माहिती स्वत:च्या सोशल मीडिया पेजवर शेअर केली आहे. सध्या या दोन्ही पोस्ट सोशल मीडियावर अतिशय व्हायरल होत असून यानिमित्ताने त्यांचे कार्य आणि त्यांच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाची माहिती देशवासियांना समजत आहे.(Prime Minister Narendra Modi Praises Women Scientists Elina Mishra And Shilpi Soni)



शिल्पी सोनी यांचे योगदान

मुळच्या मध्य प्रदेशच्या असणाऱ्या शिल्पी सोनी सध्या ISRO संस्थेमध्ये GSAT-22/23 या प्रोजेक्टसाठी असोसिएट प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. त्या सांगतात की लहानपणापासूनच वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याकडे, वेगवेगळ्या गोष्टी कुतूहलाने पाहण्याकडे त्यांचा कल होता.

Mother Daughter Twinning: माय- लेकीची स्टाईल बघतच राहतील सगळे, जुन्या साडीचे शिवा नवे युनिक ड्रेस

ISRO सोबत काम करणे हे त्यांचे स्वप्न होते. ISRO विषयी सांगताना त्या म्हणतात की या संस्थेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे सगळ्यांच्या कामाला समान संधी असून तिथली सगळी कार्यपद्धती काचेसारखी पारदर्शक आहे. त्यामुळेच त्यांना आजवर इस्त्रोच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पुर्ण केली. 


 

कोण आहेत एलिना मिश्रा?

एलिना मिश्रा मुळच्या ओडिशामधील भुवनेश्वरच्या. शैक्षणिकदृष्ट्या त्यांच्या कुटूंबातले वातावरण अतिशय उत्तम. त्यामुळेच त्यांना नेहमीच वाव मिळत गेला आणि अणुशास्त्रज्ञ होण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी पुर्ण केले.

उन्हाळ्यात पालीच्या पिल्लांचा सुळसुळाट? कापसाचा बोळा घेऊन करा 'हा' उपाय- पाली घरातून गायब होतील

एक उत्तम संशोधक होऊन तज्ज्ञ संशोधकांच्या टीममध्ये काम करणे हे त्यांचे स्वप्न होते. त्या म्हणतात की जेव्हा निवड होऊन भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर येथे काम करण्याची संधी मिळाली तेव्हा माझे हे स्वप्न पुर्ण झाले. 


 

Web Title: prime minister Narendra modi praises women scientists elina mishra and shilpi soni on womens day 2025 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.