Join us
Daily Top 2Weekly Top 5

कमालच झाली राव! ७५ लाखांची नोकरी सोडली; तणावाला कंटाळून बनवलं 'स्ट्रेस-रिलीफ' ड्रिंक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 12:28 IST

Prashma Kanwar Singh : कॉर्पोरेट क्षेत्रात १६ वर्षे काम केल्यानंतर नोकरी करणाऱ्यांचा त्रास जवळून पाहिला आणि त्यानंतर त्यांनी एक असं एनर्जी ड्रिंक बनवलं, ज्यामध्ये अनेक औषधी वनस्पतींचा वापर करण्यात आला आहे.

कॉर्पोरेट क्षेत्रातील तणाव सर्वांनाच माहित आहे. कामाचा ताण आणि वेळेत टार्गेट पूर्ण करण्याचं दडपण प्रत्येकावर असतं. अशा परिस्थितीत अनेक लोक हा दबाव आणि तणाव दूर करण्यासाठी चहा-कॉफीचा आधार घेतात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. दिल्लीत राहणाऱ्या प्रश्मा कंवर सिंह यांच्यासोबतही असंच काहीसं घडलं. कॉर्पोरेट क्षेत्रात १६ वर्षे काम केल्यानंतर त्यांनी नोकरी करणाऱ्यांचा त्रास जवळून पाहिला आणि त्यानंतर त्यांनी एक असं एनर्जी ड्रिंक बनवलं, ज्यामध्ये अनेक औषधी वनस्पतींचा वापर करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या एनर्जी ड्रिंकची चव एखाद्या कोल्ड ड्रिंकसारखीच आहे. हे प्यायल्यानंतर तुमचा तणाव दूर होतो आणि तुम्हाला रिलॅक्स वाटतं. इतकंच नाही तर ८ वर्षांच्या मुलांपासून ७० वर्षांच्या वृद्धांपर्यंत कोणीही हे पिऊ शकतं. द्वारका येथील यशोभूमीमध्ये आयोजित 'स्टार्टअप महाकुंभ'मध्ये प्रश्मा जेव्हा आपला हा नवा स्टार्टअप घेऊन पोहोचल्या, तेव्हा लोकांनी हे ड्रिंक पिऊन त्यांना सांगितलं की, यामुळे खरोखरच तणाव कमी होतो आणि हलकं वाटतं.

नोकरीत प्रचंड मानसिक ताण

प्रश्मा यांनी सांगितलं की, त्यांनी आपल्या आयुष्यातील १६ वर्षे कॉर्पोरेट क्षेत्राला दिली. त्या वेळी त्यांचे वार्षिक पॅकेज ७५ लाख रुपये होते, पण या नोकरीत त्यांना प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागला. कॉर्पोरेट क्षेत्रात नेहमीच कामाचा ताण आणि टार्गेट पूर्ण करण्याचं दडपण असतं. वेळेवर ऑफिसला पोहोचणं आणि कधीकधी ओव्हरटाईम करावा लागणं यामुळे त्या तणाव दूर करण्यासाठी चहा-कॉफीचा आधार घेत असत, तर त्यांचे काही सहकारी सिगारेट ओढत असत.

‘कारा-कारा’

त्यांनी विचार केला की, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी असे एखादं एनर्जी ड्रिंक का बनवू नये, जे आरोग्याला हानी पोहोचवणार नाही आणि तणावही कमी करेल. यासाठी त्यांनी सखोल रिसर्च केला आणि विविध औषधी वनस्पतींपासून एक एनर्जी ड्रिंक तयार केलं, ज्याचं नाव त्यांनी ‘कारा-कारा’ (Kaara-Kaara) असं ठेवलं आहे.

एनर्जी ड्रिंकमध्ये प्रोटीन, ब्राह्मी आणि अश्वगंधा

प्रश्मा कंवर सिंह यांनी सांगितलं की, या एनर्जी ड्रिंकमध्ये प्रोटीन, ब्राह्मी आणि अश्वगंधा आहे. तसेच यामध्ये व्हिटॅमिन B-5, व्हिटॅमिन B-6, व्हिटॅमिन B-12, सोडियम आणि मॅग्नेशियमचा वापर करण्यात आला असून साखरेचे प्रमाण अत्यंत कमी आहे. याची किंमत ११९ रुपयांपासून सुरू होते. सध्या त्यांचे ऑफलाइन शोरूम सुरू आहे. हे एनर्जी ड्रिंक चवीला कोल्ड ड्रिंकसारखे असले तरी ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि तणाव कमी करण्यास मदत करते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-Corporate Employee Quits Job, Creates Stress-Relief Drink

Web Summary : Frustrated by corporate stress, Prshma Kanwar Singh quit her high-paying job. She developed 'Kaara-Kaara,' a healthy energy drink with herbs, offering a tasty, stress-reducing alternative to coffee and cigarettes for professionals.
टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीव्यवसायआरोग्य