Join us

राष्ट्राध्यक्षांची भररस्त्यात छेड काढली जाते,घाणेरडे स्पर्श होतात, कोण म्हणतं महिला सुरक्षित आहेत?

By कोमल दामुद्रे | Updated: November 7, 2025 12:22 IST

Women safety issue: Harassment of women: President harassment news: स्त्री चंद्रावर पोहोचली, वर्ल्ड कप जिंकला, मिस युनिव्हर्समध्येही पुढे... पण पुरुषांच्या अश्लील नजरांनी मात्र तिला कायमच अस्वस्थ केलं.

कोमल दामुद्रे

रस्त्यानं चालताना, स्टेशन-बस-रेल्वेच्या गर्दीत कुणीही कसाही घाणेरडा स्पर्श करुन जातो.(Women safety issue) पण राष्ट्राध्यक्ष असलेल्या महिलेलाही असं कुणी भर रस्त्यात छेडत असेल तर बायका किती सुरक्षित हा प्रश्न समोर येतोच.(mexican rashtrapati) त्याचं उत्तरच मिळत नाही हे जास्त अस्वस्थ करणारं आहे. (female President Claudia Sheinbaum Pardo)मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांना भर रस्त्यात एकानं त्रास दिला, छातीला गलिच्छ स्पर्श करत चुंबन घेण्याच्या प्रयत्न केला.( President harassment news) तिकडे मिस युनिव्हर्स स्पर्धेत चक्क एकजण जाहीरपणे एका सुंदरीला डंब म्हणाला आणि कुणाला काहीही वाटू नये.(Women security concerns) चालतंच.. असं म्हणणार आपण? ते ही किती दिवस?

भारतीय महिला संघाकडे पैसे नव्हते, खेळण्यासाठी फक्त तीनच बॅट - मंदिरा बेदीने मदत केली नसती तर...

स्त्री जन्माला आल्यापासूनच तिचा संघर्ष काही संपत नाही. तिचं अस्तित्व, तिची ओळख, तिचं स्वातंत्र्य याबद्दल कितीही चर्चा झाल्या तरी वास्तव मात्र आजही तितकंच वेगळं आहे. आपल्याला वाटतं, समाज बदलतोय, मानसिकता बदलतेय, स्त्रिया पुढे येत आहेत. पण खरंच असं आहे का? काळजी घे म्हणणारेही तिच्या कपड्यांवर, चालण्यावर, बोलण्यावर बोट ठेवतात. ऑफिसमध्ये कितीही मोठ्या पदावर पोहोचली तरी तिची किंमत अनेकदा तिच्या शरीराने मोजली जाते. रस्त्यावर चालताना तिच्यावर खिळून राहिलेल्या नजरांमध्ये केवळ कुतूहल नसतं तर तिला कमी लेखण्याची विकृती आणि त्यांच्या अश्लील इच्छा असतात. पण त्याही पुढे प्रश्न उभा राहतो तो तिच्या सुरक्षिततेचा. देश कोणताही असो, भाषा कोणतीही असो, पद कितीही मोठं असो, अनुभव तेच.

मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांचा अनुभव काय वेगळं सांगतो?

मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षा क्लॉडिया शेनबॉम या एका सार्वजनिक कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना एका व्यक्तीने स्पर्श करुन चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पुन्हा एकदा राष्ट्रपतींसह महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उभा राहिला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या व्यक्तीवर तक्रार दाखल केली. मात्र ही घटना तेच प्रश्न विचारतेय की महिला सुरक्षित का नाहीत? सुरक्षा यंत्रणा, पदाची ताकद, पदवी या अश्लील मानसिकतेवर मात करू शकत नाही.

या प्रसंगावरुन असं वाटतं की स्त्री यांच्या सुरक्षेची लढाई, तिचा संघर्ष अजूनही थांबलेला नाही. समाज कितीही प्रगत झाला, कायदे कितीही कडक झाले तरी  विकृती काही थांबत नाही. या घटनेनंतर मेक्सिकोमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून पाठिंबा व्यक्त केला जात आहे. महिलांनी सोशल मीडियावर “If she is not safe, none of us are” असे लिहित संताप व्यक्त केला आहे. जगातील एका राष्ट्राच्या सर्वोच्च पदावर असलेल्या स्त्रीला अशी वागणूक मिळतेय. यावरून आपण कल्पना करू शकतो की साध्या, रोजच्या जीवनातील महिला कोणत्या परिस्थितीतून जात असतील. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीमहिला