Join us
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या लेकीची मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया स्पर्धेत चर्चा, पितळेच्या ताटात सजले मराठमोळे पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2026 17:07 IST

MasterChef Australia Season 18 या स्पर्धेत धडक मारणारी श्वेता साकोडे नेमकी आहे तरी कोण?

ठळक मुद्देश्वेता म्हणते कोण म्हणतं लहान शहरातल्या मुली मोठी स्वप्नं पाहू शकत नाहीत?

मास्टर शेफ स्पर्धा म्हणजे पाककला या क्षेत्रासाठी सगळ्यात मोठे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारी स्पर्धा. महाराष्ट्र आणि अवघ्या भारतासाठीच या स्पर्धेशी संबंधित एक आनंदाची बाब म्हणजे ऑस्टेलिया येथे होत असलेल्या मास्टरशेफ स्पर्धेच्या १८ व्या सिझनमध्ये मुळची नागपूरची असणारी श्वेता साकोडे सहभागी होत असून टॉप ४० स्पर्धकांमध्ये ती निवडली गेली आहे. ३६ वर्षांची श्वेता डेंटिस्ट असून ती एक चांगली कंटेंट क्रियेटरही आहे. मागील काही वर्षांपासून ती मेलबर्न येथे वास्तव्यास असून आता तर मास्टरशेफ स्पर्धेद्वारे तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे...   

या स्पर्धेत श्वेता महाराष्ट्राची समृद्ध खाद्यसंस्कृती दाखवत आहे. पितळी ताटात वाढलेली अस्सल मालवणी फिश फ्राय ही तिची ऑडिशन राऊंडमधली खासियत ठरली. तिच्या निमित्ताने आपल्याकडच्या पारंपरिक पदार्थांना जगासमोर येण्याची संधी मिळत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राची आणि भारताची खाद्यसंस्कृती किती वैभवशाली आहे, हे पुन्हा एकदा नव्याने जगाला कळणार आहे.

 

श्वेता म्हणते कोण म्हणतं लहान शहरातल्या मुली मोठी स्वप्नं पाहू शकत नाहीत? मी ती पाहिली.. ज्या मुलीला स्वयंपाकातल्या साध्या साध्या गोष्टीही जमत नव्हत्या ती मी आज एका जागतिक दर्जाच्या स्पर्धेपर्यंत येऊन पोहाेचले नव्हते. हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.

उगीच कशाला करता शोधाशोध, सुंदर केसांसाठी रोज ३ सुपरफूड खा! केसांच्या सगळ्या समस्याच संपतील

इथपर्यंत येणं अजिबात सोपं नव्हतं. यासाठी खूप मेहनत अगदी सातत्याने घ्यावी लागली. ऑडिशन राऊंडमध्ये परीक्षकांनीही मला हेच सांगितलं की प्रेशरमध्येही मी खूप चांगलं काम करू शकते.. येस आता इथून पुढेही तेच करायचं आहे. स्पर्धेच्या पुढच्या प्रवासासाठी मी अतिशय उत्सूक असून त्यासाठी प्रचंड मेहनत घेण्याचीही तयारी आहे. या स्पर्धेतील श्वेताच्या वाटचालीकडे कित्येकांचे लक्ष लागले असून तिला मास्टर शेफचा किताब जिंकलेला पाहणं तिच्यासकट अनेकांचं स्वप्न आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur dentist shines in MasterChef Australia with Marathi cuisine.

Web Summary : Nagpur's Shweta Sakode, a dentist in Melbourne, is a MasterChef Australia contestant. She showcased Maharashtrian cuisine, including Malvani fish fry served in a traditional brass plate, impressing judges and highlighting India's rich culinary heritage. Her success inspires small-town girls to dream big.
टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीनागपूरअन्नआॅस्ट्रेलिया