स्वप्न पाहण्यासाठी डोळ्यांची गरज नसते, मनात इच्छा आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर सगळं शक्य आहे. हे ढोबळ वाक्य खरं करुन दाखवणारी नागपूरची ईश्वरी पांडे. अथांग सागरातील भयंकर लाटा व धोकादायक समुद्री जीव यांचा धैर्याने सामना करत तलाईमन्नार (श्रीलंका) ते धनुष्कोडी (भारत) ही २८ किमी अंतराची पाल्कची सामुद्रधुनी अवघ्या ११ तास १५ मिनिटांत पोहून तिनं पार केली. विश्वविक्रम केला. ही मोहीम फत्ते करणारी ईश्वरी (Ishwari Pandey) जगातील पहिली दृष्टिहीन जलतरणपटू ठरली होती(Ishwari Pandey completed Palk Strait swim).
भारत आणि श्रीलंका यांच्यातील 'पाल्कची सामुद्रधुनी' म्हणजे केवळ अथांग समुद्र नव्हे, तर ते एक प्रचंड मोठंं आव्हान होतं. पण, ईश्वरीने आपल्या जिद्दीच्या जोरावर या लाटांनाही नमवलं आणि 'पाल्कची सामुद्रधुनी' पार करणारी जगातील पहिली पूर्णपणे अंध जलतरणपटू होण्याचा बहुमान मिळवला. ईश्वरीचा हा प्रवास (Ishwari Pandey historic swim achievement) केवळ पोहण्याचा नव्हता, तर तो अंधाराकडून प्रकाशाकडे आणि अशक्याकडून शक्याकडे नेणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे.
ईश्वरीचे प्रशिक्षक संजय बाटवे यांनी त्यांच्या शिष्येनं केलेल्या विश्वविक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, "ईश्वरीचा पराक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. या मोहिमेदरम्यान तिला अनेक अडचणी व समस्यांना तोंड द्यावं लागलं. निसर्गानंही तिची खूप परीक्षा घेतली. पाऊस, वारा आणि भयंकर लाटांचा तिला प्रचंड त्रास झाला. त्यामुळं इव्हेंट सुरु व्हायला तब्बल चार तास उशिर झाला. अखेर श्रीलंका सरकारकडून हिरवी झेंडी मिळाल्यानंतर पहाटे चार वाजता ईश्वरीनं तलाईमन्नार जेट्टी येथील समुद्रात उडी घेतली. ११ तास १५ मिनिटं मॅरेथॉन स्विमिंग करत दुपारी ३:१५ वाजता तिनं भारताचे टोक असलेले धनुष्कोडी गाठलं."
या संपूर्ण प्रवासात ईश्वरीने केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक ताकदही दाखवून दिली. जन्मापासूनच दृष्टी नसतानाही तिने खुल्या पाण्यातील जलतरणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सततचा सराव, प्रचंड चिकाटी आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे हा पराक्रम शक्य झाल्याचे सांगितले जाते. या मोहिमेचे आयोजन थेनी येथील 'ओपन वॉटर स्विमिंग ॲकॅडमी'तर्फे करण्यात आले होते. सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच पॅरा स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या पराक्रमाची अधिकृत नोंद करण्यात आली.
रोज रात्री दुधात ‘हा’ पदार्थ घालून प्या, सुटलेलं पोट होऊ लागेल सपाट-सोपा उपाय...
समुद्रातील जोरदार प्रवाह, बदलत्या लाटा आणि जेलीफिशचा धोका अशा प्रतिकूल परिस्थितीतही ईश्वरीने अपूर्व सहनशक्ती आणि मानसिक कणखरता दाखवली. जन्मतःच दृष्टिहीन असतानाही तिने सातत्यपूर्ण सराव आणि चिकाटीच्या जोरावर खुल्या पाण्यातील जलतरणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
जिद्द, चिकाटी आणि अफाट आत्मविश्वास असेल तर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ईश्वरी पांडेचा हा विश्वविक्रम हेच सांगतो की, परिस्थिती कशीही असो, जर मनाची तयारी असेल तर अशक्य वाटणारी गोष्टीही सहज साध्य करता येऊ शकते.
Web Summary : Nagpur's Ishwari Pandey, visually impaired, swam across the Palk Strait in 11 hours 15 minutes, setting a world record. She is the first blind swimmer to achieve this feat, proving dreams are possible with dedication.
Web Summary : नागपुर की दृष्टिहीन ईश्वरी पांडे ने 11 घंटे 15 मिनट में पाल्क जलडमरूमध्य को तैर कर पार किया, एक विश्व रिकॉर्ड बनाया। वह यह उपलब्धि हासिल करने वाली पहली नेत्रहीन तैराक हैं, जो साबित करती हैं कि समर्पण से सपने संभव हैं।