Join us

Women's Day: मिशेल ओबामा सांगतात- Life Is A Practice, त्यामुळे मी माझ्या मुलींना नेहमी सांगते.... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2024 15:58 IST

International Women's Day: मिशेल ओबामा (Michelle Obama) यांनी त्यांच्या मुलींना सांगितलेला हा कानमंत्र वुमन्स डे निमित्त सगळ्या महिलांच्याच उपयोगी येणारा आहे.

ठळक मुद्देआपली आजची कृती कशी आहे आणि तिच आपली उद्याची ओळख असणार आहे, हे प्रत्येक तरुण मुलीने लक्षात घेण्याची गरज आहे. 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी म्हणजे मिशेल ओबामा (Michelle Obama). बराक ओबामा यांचे व्यक्तिमत्व जेवढे प्रसिद्ध आहे, तेवढीच ओळख मिशेल यांनाही मिळालेली आहे. त्यांनी त्यांचा स्वत:चा एक वेगळाच चाहता वर्ग निर्माण केला आहे. बराक यांनी केलेला संघर्ष तर सगळ्यांनाच परिचित आहे. पण त्यांच्या बरोबरीनेच मिशेलही अनेक कष्टांतून, संघर्षातून पुढे आलेल्या आहेत. याविषयीचा कानमंत्र त्या त्यांच्या मुलींनाही देतात. त्यांनी दिलेला तो मंत्र आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्याच मैत्रिणींच्या उपयोगी येणारा आहे.

 

मिशेल यांच्या मुलाखतीचा एक छोटासा भाग visionaires.club या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मिशेल सांगतात की आयुष्य हा एक प्रकारचा सराव आहे. त्यामुळे तुम्ही जशी प्रॅक्टीस कराल किंवा जसा सराव कराल, तसंच तुमचं आयुष्य घडत जाणार.

महाशिवरात्र स्पेशल: उपवासामुळे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून ५ टिप्स, ॲसिडीटी- अपचनही टळेल

जर आयुष्यातल्या लहान-सहान गोष्टी कष्टाने जिंकत गेलात, तर तुमचा हा सराव एक विजेता होण्याच्या दृष्टीने चालू आहे असं समजा. या उलट जर तुम्ही आयुष्यातल्या संधी हुकवत असाल, तुमचा हा सराव लुझर होण्याच्या दृष्टीने सुरू आहे. त्यामुळे तुम्ही आता काय करत आहात, हे तुमचं भविष्य घडविण्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. 

 

मिशेल म्हणतात की त्यामुळे मी माझ्या मुलींना नेहमी हेच सांगते की तुम्हाला भविष्यात काय व्हायचं आहे ते ठरवा आणि तुमचा प्रवास आतापासूनच सुरू करा. भविष्यात तुमच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा असं वाटत असेल तर त्यासाठी आधी तुम्हाला त्यांचा विश्वास संपादन करावा लागेल.

कुंडीतल्या कडिपत्त्याची भरभरून वाढ होईल, २ घरगुती उपाय- हिरव्यागार पानांनी बहरून जाईल सुकलेलं रोप

त्यामुळे आधी त्याचा सराव करा. म्हणूनच तर Life Is A Practice andyou should be practicing for a every single day.... महिलांसाठी तर हा संंदेश अतिशय उपयुक्त असून आपली आजची कृती कशी आहे आणि तिच आपली उद्याची ओळख असणार आहे, हे प्रत्येक तरुण मुलीने लक्षात घेण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीजागतिक महिला दिनमहिला