lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Gardening > कुंडीतल्या कडिपत्त्याची भरभरून वाढ होईल, २ घरगुती उपाय- हिरव्यागार पानांनी बहरून जाईल सुकलेलं रोप

कुंडीतल्या कडिपत्त्याची भरभरून वाढ होईल, २ घरगुती उपाय- हिरव्यागार पानांनी बहरून जाईल सुकलेलं रोप

Best Home Made Fertilizers For Kadipatta: कडिपत्त्याचं झाड सुकत असेले किंवा त्याची पाहिजे तशी वाढ होत नसेल तर हे २ सोपे घरगुती उपाय करून पाहा. (How to make kadipatta grow fast?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2024 01:50 PM2024-03-08T13:50:14+5:302024-03-08T13:51:05+5:30

Best Home Made Fertilizers For Kadipatta: कडिपत्त्याचं झाड सुकत असेले किंवा त्याची पाहिजे तशी वाढ होत नसेल तर हे २ सोपे घरगुती उपाय करून पाहा. (How to make kadipatta grow fast?)

Best home made fertilizers for kadipatta, Home remedies for the better growth of curry leaves plant, How to make kadipatta grow fast? | कुंडीतल्या कडिपत्त्याची भरभरून वाढ होईल, २ घरगुती उपाय- हिरव्यागार पानांनी बहरून जाईल सुकलेलं रोप

कुंडीतल्या कडिपत्त्याची भरभरून वाढ होईल, २ घरगुती उपाय- हिरव्यागार पानांनी बहरून जाईल सुकलेलं रोप

Highlightsझाडांची चांगली वाढ होण्यासाठी त्यांना वेळोवेळी खत स्वरुपातल्या पोषक गोष्टीही मिळायलाच पाहिजेत.

झाडांना आपण दररोज पाणी घालत असू, त्यांना पुरेशा उन्हामध्ये ठेवत असू तर ते त्यांच्यासाठी योग्यच आहे. पण या दोन गोष्टी मिळाल्याने झाडं भरभरून वाढतील असं नाही. झाडांची चांगली वाढ होण्यासाठी त्यांना वेळोवेळी खत स्वरुपातल्या पोषक गोष्टीही मिळायलाच पाहिजेत. वेळोवेळी योग्य खत मिळत गेलं, तर झाडांची नक्कीच भरभरून वाढ होते. अनेकजणांची अशी तक्रार असते की त्यांच्याकडचं कडिपत्त्याचं झाड चांगलं बहरत नाही (Home remedies for the better growth of curry leaves plant). नुसतं उंच काडीसारखं वाढत जातं. पण त्याला पाहिजे तशी मोठी हिरवीगार पानं येतच नाहीत ( How to make kadipatta grow fast?). अशीच तक्रार तुमचीही असेल तर कडिपत्त्याच्या झाडाला २ घरगुती पद्धतीची खतं देऊन पाहा. (Best home made fertilizers for kadipatta)

कडिपत्त्याच्या झाडाला कोणतं खत द्यावं?

 

१. तांदळाचं पाणी

हा उपाय करण्यासाठी तांदूळ एक- दोन वेळा धुवून घ्या. तांदुळाला लावलेली केमिकल्सची पावडर निघून गेली की ते तांदूळ भिजत घाला.

साडी नेसल्यावर खूप फुगते? अशा फुगीर साड्यांसाठी १ सोपी ट्रिक- चापूनचोपून बसेल साडी

साधारण दोन ते तीन तासांनी ते पाणी गाळून घ्या आणि १५ दिवसांसाठी साचवून ठेवा. १५ दिवसांनंतर त्या पाण्यात ५ पट दुसरे पाणी टाका आणि मग ते पाणी कडिपत्त्याला द्या. कडिपत्ता खूप चांगला वाढेल. 

 

२. शेणखत आणि कोरफड

कोणत्याही झाडाच्या वाढीसाठी शेणखत अतिशय उपयुक्तच आहे. पण कडिपत्त्याला जेव्हा शेणखत द्याल तेव्हा त्यात कोरफडीचा गरदेखील टाका.

महाशिवरात्र स्पेशल: उपवासामुळे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून ५ टिप्स, ॲसिडीटी- अपचनही टळेल

हा उपाय करण्यासाठी गायीचं शेण किंवा शेणखत आणि कोरफडीचा गर सम प्रमाणात घ्या. त्यात त्याच्या तिप्पट पाणी टाका. हे मिश्रण ३ ते ४ दिवस झाकून ठेवा आणि नंतर ते कडिपत्त्याच्या झाडाला टाका. 


 

Web Title: Best home made fertilizers for kadipatta, Home remedies for the better growth of curry leaves plant, How to make kadipatta grow fast?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.