Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोरी हुश्शार! हॉकीच्या मैदानावर फडकवला तिरंगा; भारताच्या रणरागिणींचं आता 'मिशन फायनल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 14:57 IST

विश्वचषकासाठी आधीच पात्र ठरलेल्या भारतीय महिला हॉकी संघाची आता ‘एफआयएच’ विश्वचषक क्वालिफायर स्पर्धा जिंकण्यावर नजर आहे.

भारताच्या रणरागिणींनी हॉकीच्या मैदानावर तिरंगा फडकवला आहे. विश्वचषकासाठी आधीच पात्र ठरलेल्या भारतीय महिला हॉकी संघाची आता ‘एफआयएच’ विश्वचषक क्वालिफायर स्पर्धा जिंकण्यावर नजर आहे. यासाठी शुक्रवारी इटलीविरुद्धचा उपांत्य सामना जिंकणं भारतीय संघासाठी पहिला टप्पा ठरेल.

भारतीय महिला हॉकी संघ ब गटामध्ये तीन सामन्यांत सात गुणांसह अव्वल राहिला. स्कॉटलंडचेही सात गुण होते. मात्र, गोल फरकात मागे पडल्याने त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. भारताने साखळी टप्प्यात दोन सामने जिंकले, तर एक सामना अनिर्णित राखला.

इटलीचा संघ ‘अ’ गटात दुसऱ्या स्थानी राहिला. त्यांनी एक सामना जिंकला, एक सामना अनिर्णित राखला आणि एक सामना गमावला. भारताकडून फॉरवर्ड नवनीत कौर हिने उत्कृष्ट कामगिरी केली असून, ती आतापर्यंत चार गोल करून आघाडीवर आहे. वेल्सविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात तिने हॅट्रिक नोंदविली होती.

इटलीच्या संघाची मदार फेडरिका कार्टा हिच्यावर असेल. तिने आतापर्यंत तीन गोल केले आहेत. भारताचे पारडे जड दिसत आहे. २०१२ पासून दोन्ही संघांमध्ये झालेल्या सात सामन्यांपैकी पाच भारताने जिंकले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : India's Women's Hockey Team Aims for FIH World Cup Qualifier Victory

Web Summary : Indian women's hockey team, already qualified for World Cup, eyes FIH Qualifier victory. They topped their group and will face Italy in the semi-finals, with Navneet Kaur in excellent form. India holds a strong record against Italy.
टॅग्स :हॉकीप्रेरणादायक गोष्टी