राजस्थानमधील मोनिका यादवने प्रामाणिकपणे कठोर परिश्रम करणारे कधीही अपयशी ठरत नाहीत हे सिद्ध केलं आहे. मोनिकाने अवघ्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. पण इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा अजिबात सोपा नव्हता. आयएएस मोनिका ही सिकरमधील लिसाडिया गावची आहे. तिने मेहनतीने घवघवीत यश मिळवलं आहे.
मोनिकाचे वडील हरफूल सिंह यादव हे RAS अधिकारी आहेत. यामुळे तिला नेहमीच नागरी सेवा परीक्षेची आवड होती. तिने वयाच्या २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत ४०३ वा रँक मिळवला. आयएएस अधिकारी झाल्यानंतर, मोनिकाने राजस्थान नागरी सेवा परीक्षेत ९३ वा रँक मिळवला.
नेट, जेआरएफ आणि सीए सारख्या कठीण परीक्षा देखील उत्तीर्ण केल्या. एवढंच नाही तर लखनौ येथील इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये ७८ आठवड्यांच्या प्रशिक्षणादरम्यान तिला सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कारही मिळाला, ज्यामुळे तिच्या जिल्ह्याचं नाव मोठं झालं.
आयएएस अधिकारी होऊनही आयएएस मोनिका यादव आपल्या मातीशी जोडलेल्या आहेत. मोनिका सोशल मीडियावर एक्टिव्ह आहेत. मोनिकाचे वडील हरफूल सिंह यादव हे एक वरिष्ठ आरएएस अधिकारी आहेत आणि आई सुनीता यादव गृहिणी आहे. मोनिका तीन भावंडांमध्ये मोठी आहे. तिचं लग्न आयएएस सुशील यादव यांच्याशी झालं आहे.