lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Inspirational > ... तेव्हा तर ‘इंग्रजी’ही धड कळत नव्हतं, काय सांगणार बाई असण्याचा ‘इसेन्स’? - १८ वर्षांच्या सुश्मिता सेनचा सवाल

... तेव्हा तर ‘इंग्रजी’ही धड कळत नव्हतं, काय सांगणार बाई असण्याचा ‘इसेन्स’? - १८ वर्षांच्या सुश्मिता सेनचा सवाल

सुश्मिता सेनला जेव्हा विचारण्यात आलं, ‘व्हाट फॉर यू इज द इसेन्स ऑफ बीईंग अ वूमन?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 03:33 PM2022-03-10T15:33:29+5:302022-03-10T15:44:41+5:30

सुश्मिता सेनला जेव्हा विचारण्यात आलं, ‘व्हाट फॉर यू इज द इसेन्स ऑफ बीईंग अ वूमन?’

... I didn't understand meaning of 'essence' . sushmita sen think over answer after 28 years | ... तेव्हा तर ‘इंग्रजी’ही धड कळत नव्हतं, काय सांगणार बाई असण्याचा ‘इसेन्स’? - १८ वर्षांच्या सुश्मिता सेनचा सवाल

... तेव्हा तर ‘इंग्रजी’ही धड कळत नव्हतं, काय सांगणार बाई असण्याचा ‘इसेन्स’? - १८ वर्षांच्या सुश्मिता सेनचा सवाल

Highlightsमला स्त्रीची वैशिष्ट्ये काय, स्त्रीचे गुणधर्म काय? असा प्रश्न विचारला नव्हता तर स्त्री असण्याचा ‘इसेन्स’ विचारला होताखरोखर स्त्री म्हणून जन्माला येणं हे काहीतरी विशेष आहे.बाई म्हणजे फक्त तिचं गर्भाशय नाही, ती फक्त आई होण्यासाठी जन्माला आलेली नसते.

सुश्मिता सेन. आपल्या शर्थींवर आयुष्य जगणारी दिलखुलास बाई. विश्वसुंदरी. आई. अभिनेत्री. वयाच्या १८ व्या वर्षी ती मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकली. खरंतर १८ वर्षांच्या मुलीला जागतिक व्यासपीठावर जे प्रश्न विचारले जातात, त्यांची उत्तरं देताना त्याविषयाची समज असतेच असं नाही. १८ वर्षांच्या मुलीला तरी कसं कळावं की, बाई असण्याचा खरा ‘अर्थ’ काय असतो? पण सुश्मिताला असाच प्रश्न विचारण्यात आला होता, ‘व्हाट फॉर यू इज द इसेन्स ऑफ बीईंग अ वूमन?’ आता आपल्या २८ वर्षांनंतर आपल्या लेकीच्या शाळेच्या मासिकाला मुलाखत देताना सुश्मिता म्हणते, एक तर मी १८ वर्षांची, त्यात माझं शिक्षण हिंदी माध्यमात झालेलं. मला ‘इसेन्स’ या शब्दाचा नेमका अर्थही कळला नाही. जेमतेम इंग्रजीत मला जसा प्रश्न समजला तसं मी उत्तर दिलं..

Image: Google

सुश्मिताने त्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं होतं, बाई असणं म्हणजे देवाची देणगी आहे, त्या देणगीचं आपण साऱ्यांनीच मोल करायला हवं. बाळाला जन्म घालते ती आई, ती बाईच असते. ती ‘मनुष्यजातीला’ सांगते, वात्सल्य, काळजी घेणं, प्रेम करणं नक्की काय असतं. बाई असण्याचा हाच तर ‘इसेन्स’ आहे.
ते उत्तर तेव्हा अनेकांना आवडलं. सुश्मिता मिस युनिव्हर्स झाली. आता लेकीच्या शाळेत मुलाखत देताना तिला विचारण्यात आलं की, ते तेव्हाच उत्तर, १८ वर्षांच्या मुलीचं आता २८ वर्षांनंतर तुला काय वाटतं त्या उत्तराविषयी, काय बदल करायला आवडेल आज जर तुला कुणी असा प्रश्न विचारलं तर?

Image: Google

सुश्मिता म्हणते, ‘मला तो प्रश्नच खूप आवडला होता. आजही त्या प्रश्नाकडे मागे वळून बघते तेव्हा मला त्या प्रश्नाचं कौतुक वाटतं. मला स्त्रीची वैशिष्ट्ये काय, स्त्रीचे गुणधर्म काय? असा प्रश्न विचारला नव्हता तर स्त्री असण्याचा ‘इसेन्स’ विचारला होता.  बहुदा तेव्हा देवानेच तेव्हा माझ्याकडून ते उत्तर वदवून घेतलं असावं. मी ज्या पद्धतीने पुढचं आयुष्य जगले, त्या उत्तराचा बहुतेक पायाच होतं हे उत्तर, माझ्या नकळतही मी देऊन टाकलं होतं. आज मला त्यात काहीही बदल करावासा वाटत नाही. खरोखर स्त्री म्हणून जन्माला येणं हे काहीतरी विशेष आहे. देवाची देणगी असून त्याचा स्वीकार-सन्मान सर्वांनी करायला हवा हे सत्य आहे.  बाई म्हणजे फक्त तिचं गर्भाशय नाही, ती फक्त आई होण्यासाठी जन्माला आलेली नसते. ती तिच्या जगण्यातून प्रेम, माया, काळजी हे सारं जगत असते.

बाईनेही हा प्रवास केवळ बाह्य जगातला नाही तर अंतर्मुख होऊन स्वत:साठी अंतर्गतही करायला हवा. स्वत:ला शोधायला हवं. ओळखायला हवं. तो बाई असण्याचा इसेन्स आहे.
 

Web Title: ... I didn't understand meaning of 'essence' . sushmita sen think over answer after 28 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.