भारताच्या महिला क्रिकेट संघाने इतिहास रचत आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५ जिंकला. या ऐतिहासिक विजयाने देशभरात जल्लोष झाला आणि चाहत्यांच्या आनंदाला पारा उरला नाही. सगळे जण वेगवेगळ्या पद्धतीने आनंद व्यक्त करत आहेत. (Harman and Smriti got this tattoo after winning the World Cup, see its meaning and memory)हा विजय लोकांसाठी भावनेचा विषय आहे. भारतीय संघाच्या या महान कामगिरीनंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना यांनी या विजयाची आठवण कायमस्वरुपी जपण्याचा एक खास आणि वेगळा मार्ग निवडला.
हरमनप्रीत कौरने आपल्या दंडावर वर्ल्ड कप ट्रॉफीचे चित्र आणि त्यासोबत २०२५ हे वर्ष तसेच फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर मिळालेल्या 52 धावांच्या विजयाचा आकडा कोरुन घेतला आहे. या टॅटूसोबत हरमनप्रीतने सोशल मीडियावर लिहिले, “Forever etched in my skin and my heart. Waited for you since Day 1…” — म्हणजेच हा विजय तिच्या हृदयात आणि आता तिच्या तहातावरही कायमचा कोरला गेला आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीची, संघर्षाची आणि संघाच्या स्वप्नपूर्तीची आठवण आहे.
स्मृती मानधनानेही आपल्या फोरआर्मवर अगदी समान डिझाईनचा टॅटू कोरला आहे. तीही या विजयाची भागीदार असल्याचा अभिमान व्यक्त करत म्हणाली की हा टॅटू तिच्यासाठी टीम इंडियाच्या जिद्दीची निशाणी आहे. दोघींनी कोरलेल हे टॅट्टू सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. चाहत्यांनी Proud of you Queens अशा शुभेच्छांचाही वर्षाव केला.
हा टॅटू म्हणजे विजयाची आठवण जपण्याचा एक भावनिक प्रयत्न आहे. टॅटू ही कायमस्वरुपी गोष्ट आणि या दोघींसाठी तो एक असा ठसा आहे जो त्यांच्या खेळातील सर्व संघर्ष, मेहनत आणि गौरवशाली क्षणांना जिवंत ठेवतो. त्यांच्या या निर्णयातून संघभावना, चिकाटी आणि देशासाठी खेळण्याची तीव्र निष्ठा दिसून येते.
