Lokmat Sakhi >Inspirational > अभिमानास्पद! वडिलांनी रिक्षा चालवली, भाजी विकली; आता मुलगी झाली वर्ल्ड चॅम्पियन

अभिमानास्पद! वडिलांनी रिक्षा चालवली, भाजी विकली; आता मुलगी झाली वर्ल्ड चॅम्पियन

मोनिकाच्या घराची गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हीही भावुक व्हाल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:01 IST2025-01-21T17:00:59+5:302025-01-21T17:01:47+5:30

मोनिकाच्या घराची गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हीही भावुक व्हाल.

father drive rickshaw sold vegetables now daughter monika becomes world champion in kho kho | अभिमानास्पद! वडिलांनी रिक्षा चालवली, भाजी विकली; आता मुलगी झाली वर्ल्ड चॅम्पियन

फोटो - ABP News

दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये खो-खो विश्वचषक २०२५ चे आयोजन १३ ते १९ जानेवारी दरम्यान करण्यात आलं होतं. यामध्ये बिहारची मुलगी मोनिकाची भारतीय महिला संघात निवड झाली. भारत आणि नेपाळ यांच्यात अंतिम सामना झाला ज्यामध्ये भारतीय संघाच्या खेळाडूंनी नेपाळचा पराभव केला आणि विश्वविजेतेपद जिंकलं. खो-खोचा अंतिम सामना १९ जानेवारी रोजी खेळवण्यात आला.

या कामगिरीमुळे मोनिकाच्या कुटुंबात आनंदाची लाट आहे. एकीकडे आनंद आहे आणि दुसरीकडे कुटुंब अजूनही संघर्षातून जात आहे. मोनिकाच्या घराची गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हीही भावुक व्हाल. मोनिकाचं घर भागलपूरच्या गोपाळपूर ब्लॉकमधील दिमाहा गावात आहे. वडील विनोद साह कधी रिक्षा चालवायचे तर कधी दिल्लीत भाजीपाला विकायचे. गावात त्याचं एक मातीचं घर आहे. आजही त्यांच्या घरात गॅस नाही.

खो खोचा सामना जिंकल्यानंतर मोनिकाने तिच्या वडिलांशी फोनवर संवाद साधला. वडिलांनी विचारलं, खेळ चांगला झाला का? यावर मुलीने उत्तर दिलं, हो बाबा, छान झाला आहे. वडील म्हणाले की, आम्हाला तुझा अभिमान आहे. तुम्ही सर्वजणी चांगल्या खेळल्या आहात. माझ्या मुलीने देशाचं नाव उंचावलं आहे.

मोनिकाच्या वडिलांनी १३ वर्षे रिक्षा चालवली. ते आपल्या मुलीला सोडण्यासाठी रिक्षाने शाळेत जात असे. जेव्हा मुलगी मोठी झाली तेव्हा ती स्वतः शाळेत जायची. ते भाजीपालाही विकायचे. त्यांचं गावात एक मातीचं घर आहे. गॅस कनेक्शन किंवा प्रधानमंत्री आवास योजनेचा कोणताही लाभ मिळाला नाही. 

पालकांनी सांगितलं की, अंतिम सामन्याच्या दिवशी ते शेजाऱ्याच्या घरी गेले आणि संपूर्ण सामना टीव्हीवर पाहिला. मोनिका खूप छान खेळत होती. भारताने हा सामना खूप मोठ्या फरकाने जिंकला. महिलांचा अंतिम सामना भारत आणि नेपाळ यांच्यात खेळवण्यात आला होता.
 

Web Title: father drive rickshaw sold vegetables now daughter monika becomes world champion in kho kho

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.