lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Inspirational > NDA Entrance topper : आजोबा आणि वडिलांचा सैन्यात जाण्याचा वारसा 'तिने' केला बुलंद, रोहतकची शनन NDA ची टॉपर

NDA Entrance topper : आजोबा आणि वडिलांचा सैन्यात जाण्याचा वारसा 'तिने' केला बुलंद, रोहतकची शनन NDA ची टॉपर

Entrance topper of NDA’s 1st women’s batch : कोण आहे एनडीए प्रवेश परीक्षेत महिलांच्या पहिल्या तुकडीत अव्वल, खडतर प्रशिक्षण घेऊन मुलीही होणार अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 11:17 AM2022-06-23T11:17:38+5:302022-06-23T12:46:42+5:30

Entrance topper of NDA’s 1st women’s batch : कोण आहे एनडीए प्रवेश परीक्षेत महिलांच्या पहिल्या तुकडीत अव्वल, खडतर प्रशिक्षण घेऊन मुलीही होणार अधिकारी

Entrance topper of NDA's 1st women's batch: Grandmother and father's legacy of joining army, Shanan Dhaka | NDA Entrance topper : आजोबा आणि वडिलांचा सैन्यात जाण्याचा वारसा 'तिने' केला बुलंद, रोहतकची शनन NDA ची टॉपर

NDA Entrance topper : आजोबा आणि वडिलांचा सैन्यात जाण्याचा वारसा 'तिने' केला बुलंद, रोहतकची शनन NDA ची टॉपर

Highlights १९ जणींची निवड करण्यात आली असून १० जणी भूदलाचे, ६ जणी हवाईदलाचे आणि ३ जणी नौदलाचे प्रशिक्षण घेणार आहेत.सर्वात अवघड असणाऱ्या ५ दिवसांच्या मुलाखतीतही शननने आपला आत्मविश्वास कायम राखत यश मिळवले. 

‘हम भी किसीसे कम नही’ म्हणत महिला आता सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवत असताना लष्करातील कामगिरीही महिलांसाठी फार अवघड नाही. लष्कराच्या अनेक उच्च पदांवर महिला अधिकारी कार्यरत असताना महिलांनाही पारंपरिक लष्करी प्रशिक्षण मिळावे अशी चर्चा मागील काही वर्षांपासून सुरू होती. या हेतूने नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (National Defence Academy) म्हणजे एनडीए या राष्ट्रीय संस्थेने मुलींना प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. यंदा पहिल्यांदाच मुलींनाही संस्थेची प्रवेश परीक्षा देण्याची संधी देण्यात आली होती. या परीक्षेत हरियाणाच्या रोहतक येथील शनन ढाका (Shanan Dhaka) या मुलीने बाजी मारली आहे. मुलींमध्ये पहिली येण्याचा मान शननला मिळाला आहे. एकूणात ती १० व्या क्रमांकावर आहे. एनडीएच्या पहिल्या बॅचमध्ये प्रवेश मिळवणारी शनन हिची कौटुंबिक, शैक्षणिक पार्श्वभूमी काय आणि तिने कशाप्रकारे या परीक्षेची तयारी केली याविषयी (Entrance topper of NDA’s 1st women’s batch).. 

(Image : Google)
(Image : Google)

कौटुंबिक पार्श्वभूमी

शननच्या कुटुंबात लष्करी सेवेची पार्श्वभूमी असून तिचे आजोबा चंद्रभान ढाका सुभेदार तर वडील विजयकुमार ढाका नायक सुभेदार होते. आर्मी स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या शनन हिने आपले आजोबा आणि वडील यांच्याकडून सैन्यात जाण्याची प्रेरणा घेतली. १० वी मध्ये शननने ९७ टक्के तर १२ वी मध्ये ९८ टक्के मिळवले होते. शननला सुरुवातीपासून सिव्हील सर्व्हिसेस किंवा लष्करातच जायचे होते. त्यामुळे तिने दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये शननने बीएसाठी प्रवेश घेतला होता. मात्र मागील वर्षी एनडी प्रवेशाबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर तिने एनडीएची प्रवेश परीक्षा देण्याचे ठरवले. तिची मोठी बहिण लष्करात नर्सिंग ऑफीसर असून लहान बहिण पाचवीमध्ये आहे. 

कशी केली परीक्षेची तयारी ?

शनन हिला एनडीएच्या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी अतिशय कमी म्हणजे केवळ ४० दिवसांचाच कालावधी मिळाला होता. मात्र काही झाले तरी या परीक्षेत यश मिळवायचेच हे मनात पक्के करुन शनन हिने दिवसरात्र मेहनत घेतली. मागच्या १० वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहून त्या सतत सोडवून शननने परीक्षेची तयारी केल्याचे ती सांगते. एनडीएचा पेपर सोडवण्यासाठी २.५ तासांचा कालावधी दिला जातो. मात्र शननने सुरुवातीपासून २ तासात पेपर सोडवण्याच्यादृष्टीने अभ्यास केला. त्यानंतर सर्वात अवघड असणाऱ्या ५ दिवसांच्या मुलाखतीतही शननने आपला आत्मविश्वास कायम राखत यश मिळवले. 

(Image : Google)
(Image : Google)

पहिल्यांदाच मुली घेणार एनडीएत प्रशिक्षण 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर यावर्षी पहिल्यांदाच मुलींना ही प्रवेशपरीक्षा देता येणार होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या या परीक्षेसाठी ५,७५,८५६ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता, त्यापैकी १,७७,६५४ मुली होत्या. त्यातील १९ जणींची निवड करण्यात आली असून १० जणी भूदलाचे, ६ जणी हवाईदलाचे आणि ३ जणी नौदलाचे प्रशिक्षण घेणार आहेत. कोणताही भेदभाव न करता मुलींना तीन वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे. 
 

Web Title: Entrance topper of NDA's 1st women's batch: Grandmother and father's legacy of joining army, Shanan Dhaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.