Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Inspirational > Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज

Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज

Param Ashawar : मध्य प्रदेशातील ग्रामीण भागातील गरीब मुलींच्या संघाने आर्थिक अडचणींवर मात करून 'इंडियन विमेन्स लीग' (IWL) च्या टायर-२ मध्ये ऐतिहासिक मजल मारावी, यासाठी तब्बल १० लाखांचं कर्ज घेतलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:41 IST2026-04-06T12:41:17+5:302026-04-06T12:41:54+5:30

Param Ashawar : मध्य प्रदेशातील ग्रामीण भागातील गरीब मुलींच्या संघाने आर्थिक अडचणींवर मात करून 'इंडियन विमेन्स लीग' (IWL) च्या टायर-२ मध्ये ऐतिहासिक मजल मारावी, यासाठी तब्बल १० लाखांचं कर्ज घेतलं.

coach Param Ashawar borrows rs 10l to fire mp rural girls team to national womens football league | Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज

Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज

'चक दे! इंडिया' चित्रपटातील कबीर खानने ज्याप्रमाणे आपली कारकीर्द पणाला लावून महिला हॉकी संघाला मोठा सन्मान मिळवून दिला होता, अगदी तशीच कामगिरी ३६ वर्षीय एनआयएस (NIS) प्रमाणित प्रशिक्षक परम अशावर यांनी केली आहे. मध्य प्रदेशातील ग्रामीण भागातील गरीब मुलींच्या संघाने आर्थिक अडचणींवर मात करून 'इंडियन विमेन्स लीग' (IWL) च्या टायर-२ मध्ये ऐतिहासिक मजल मारावी, यासाठी त्यांनी तब्बल १० लाखांचं कर्ज घेतलं.

'डिस्ट्रिक्ट रायसेन फुटबॉल क्लब' (DRFC) चं हे यश प्रशिक्षक परम यांचा मुलींच्या टॅलेंटवर असलेला विश्वास आणि त्यांनी दिलेल्या समर्पणाचं फळ आहे. त्यांनी घेतलेलं सर्व कर्ज या मुलींच्या प्रशिक्षणाचे किट्स, प्रवासाचा खर्च आणि कॅम्पचा खर्च भागवण्यासाठी वापरलं गेलं. या मुलींनी देखील आपल्या प्रशिक्षकाच्या विश्वासाचं चीज केलं. 

बलाढ्य संघाला पराभूत करण्याचा पराक्रम

गेल्या महिन्यात आयडब्ल्यूएल (IWL) पात्रता फेरीत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या प्रवासात त्यांनी ओडिशा एफसीसारख्या अनुभवी आणि बलाढ्य संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केला. आपल्या पहिल्याच मोहिमेत डीआरएफसीने एका विजयासह आणि एका बरोबरीसह एकूण चार गुण मिळवून गटात संयुक्तपणे तिसरं स्थान पटकावलं.

"प्रशिक्षक परम आमचे हिरो"

स्पर्धेतून परतल्यानंतर परम यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितलं की, "या मुलींमध्ये जिद्द होती पण संसाधनं नव्हती. त्यांचं टॅलेंट वाया जाताना मी पाहू शकत नव्हतो. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील भविष्यासाठी हे कर्ज म्हणजे मी दिलेली एक छोटीशी किंमत आहे."  या विजयात निर्णायक गोल करणाऱ्या फॉरवर्ड सोनी मुंडाने आपल्या यशाचं श्रेय प्रशिक्षकांना दिलं आहे. "प्रशिक्षक परम आमचे हिरो आहेत. त्यांचे समर्पण आम्ही कधीही विसरणार नाही. पुढच्या वर्षी आम्ही परत येऊ आणि त्यांच्यासाठी ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करू" असं डीआरएफसीच्या एका खेळाडूने सांगितलं.

"गरज पडल्यास आणखी कर्ज घेण्यास तयार"

कर्जाच्या ओझ्यामुळे परम अजिबात डगमगलेले नाहीत. संघाला पुढे नेण्यासाठी गरज पडल्यास आणखी कर्ज घेण्यासही ते तयार आहेत. ते म्हणतात, "हे कर्ज मी कसं फेडणार हे मला माहीत नाही, पण त्यामुळे माझी झोप उडालेली नाही. माझ्या संघाचा विजय माझ्या सर्व चिंता दूर करतात. मध्य प्रदेशातील प्रत्येक मुलीने मोठं स्वप्न पाहावं यासाठी आणि महिला फुटबॉलच्या प्रगतीसाठी मी प्रयत्न करत राहेन."

मध्य प्रदेश फुटबॉल असोसिएशनने डीआरएफसीच्या या कामगिरीचे कौतुक करताना हा तळागाळातील खेळांसाठी एक मैलाचा दगड असल्याचं म्हटलं आहे. "रायसेनची ही गोष्ट प्रेरणादायी आहे. जिद्द असेल तर पैशाची अडचण येत नाही, हेच यातून सिद्ध होतं" असं एआयएफएफ (AIFF) सचिव अमित रंजन देव यांनी सांगितलं. बंगाल आणि मणिपूरसारख्या फुटबॉलमधील दिग्गजांच्या सावलीत असलेल्या मध्य प्रदेशासाठी आता या मुलींनी यशाचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. जोपर्यंत आपल्या मुली आयडब्ल्यूएलचे विजेतेपद मिळवत नाहीत, तोपर्यंत परम थांबणार नाहीत.
 

Web Title : कोच ने ग्रामीण लड़कियों को फुटबॉल लीग में पहुंचाने के लिए लिया कर्ज।

Web Summary : मध्य प्रदेश में एक कोच ने ग्रामीण लड़कियों की फुटबॉल टीम का समर्थन करने के लिए ₹10 लाख का ऋण लिया। उनकी टीम ने समर्पण और प्रतिभा का प्रदर्शन करते हुए इंडियन विमेंस लीग में प्रतिस्पर्धा करने के लिए वित्तीय बाधाओं को पार किया।

Web Title : Coach takes loan to help rural girls reach football league.

Web Summary : A coach in Madhya Pradesh took a loan of ₹10 lakh to support a rural girls' football team. His team overcame financial obstacles to compete in the Indian Women's League, showcasing dedication and talent.