Join us  

सुप्रीम कोर्टाच्या कॅन्टीनमधील 'स्वयंपाकी' वडिलांच्या लेकीची कमाल! सरन्यायाधीशांसह सर्वच न्यायमूर्तींनी दिली शाबासकी, कारण.... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2024 12:14 PM

Inspirational Story Of Pradnya Samal: आपल्या लेकीचे कौतूक करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Chief Justice of India D. Y. Chandrachud) यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील सर्वच न्यायमूर्ती (Supreme Court judges) येतात, ही बाबच प्रज्ञा सामल हिच्या आई- वडिलांना सुखावून टाकणारी आहे.

ठळक मुद्देन्यायमुर्तींनी तिला ३ पुस्तके भेट दिली असून त्यापैकी एका पुस्तकावर सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायमूर्तींनी शुभेच्छापुर्वक सह्या केल्या आहेत. 

उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर फक्त मनात जिद्द पाहिजे. तुमचा निश्चय ठाम असला की मग त्याच्या परिपूर्तीसाठी अनेक वाटा फुटत जातात, संधी मिळत जातात. असंच काहीसं प्रज्ञा सामल हिचं. प्रज्ञाने वडील अजय सामल सर्वोच्च न्यायालयातील कॅन्टीनमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतात. तर आई प्रमिला गृहिणी आहे. त्यांची लेक प्रज्ञा हिने कायद्याचे शिक्षण घेतले असून आता तिला कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे आहे. यासाठी तिने जगभरातील सर्वोत्तम महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षा दिल्या असता तब्बल ६ विद्यापीठांकडून तिला बोलावणे आले असून २ विद्यापीठांनी तिला शिष्यवृत्तीही दिली आहे.

 

एका महाविद्यालयाची शिष्यवृत्ती मिळविताना अनेकांच्या नाकीनऊ येतात. बरेचजण तर कठीण आहे म्हणून त्या वाटेने जाणेही टाळतात. पण अतिशय सामान्य कुटूंबातून आलेल्या प्रज्ञाने मात्र हे घवघवीत यश मिळवले.

राधिका मर्चंटच्या ६ क्लासी हेअरस्टाईल- लग्नकार्यासाठी आहेत परफेक्ट 

यामुळेच तर भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातल्या जवळपास सर्वच न्यायमुर्तींनी प्रज्ञाचे आणि तिच्या आई- वडिलांचे कौतूक केले. त्यांचा सत्कार केला. न्यायमुर्तींनी तिला ३ पुस्तके भेट दिली असून त्यापैकी एका पुस्तकावर सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायमूर्तींनी शुभेच्छापुर्वक सह्या केल्या आहेत. 

 

प्रज्ञा सध्या २६ वर्षांची असून तिला कोलंबिया लॉ स्कूल, शिकागो लॉ स्कूल, न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ पेनस्लिनेव्हिया कैरी लॉ स्कूल,

उन्हाळ्यासाठी गॉगल खरेदी करायचा? बघा २०२४ चे ट्रेण्डी गॉगल्स, करा फॅशन- दिसा कूल

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले स्कूल ऑफ लॉ आणि युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन लॉ स्कूल यांनी तिला ॲडमिशन देऊ केले आहे. त्यापैकी बर्कले स्कूल आणि मिशिगन लॉ स्कूल यांच्यावतीने तिला स्कॉलरशिप मिळाली आहे. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीसर्वोच्च न्यायालयडी. वाय. चंद्रचूड