Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ilamon Thangkhiew : परंपरेला आधुनिकतेची जोड! मेघालयातल्या खासी संस्कृतीचं जतन करणाऱ्या तरुणीचा टेक्स्टाईल जगात डंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 18:37 IST

Ilamon Thangkhiew : मेघालयमधील टेक्स्टाईल डिझायनर इलामोन थंगख्यू यांची 'इंटीरियर डिझाइन मॅगझिन'ने 'हाइमटेक्स्टाईल २०२६' मधील १२ प्रमुख हायलाईट्सपैकी एक म्हणून निवड केली आहे.

मेघालयमधील टेक्स्टाईल डिझायनर इलामोन थंगख्यू यांची 'इंटीरियर डिझाइन मॅगझिन'ने 'हाइमटेक्स्टाईल २०२६' मधील १२ प्रमुख हायलाईट्सपैकी एक म्हणून निवड केली आहे. लंडन आणि भारत अशा दोन्ही ठिकाणी कार्यरत असलेल्या आणि 'रॉयल कॉलेज ऑफ आर्ट'च्या पदवीधर असलेल्या इलामोन यांनी जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे आयोजित इंटरनॅशनल टेक्स्टाईल ट्रेड फेअरच्या'न्यू टॅलेंट्स' कार्यक्रमांतर्गत आपली कला सर्वांसमोर आणली आहे.

'न्यू डिझाइनर्स' मॅगझिनने जगभरातील अशा ८ महिलांमध्ये इलामोन यांचा समावेश केला आहे, ज्यांच्या कामामुळे या उद्योगाच्या कक्षा रुंदावत आहेत. या महिलांच्या डिझाइनमध्ये प्रयोगशीलता आणि वारसा यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो, ज्यामध्ये काच, मीठ आणि मेटल यांसारख्या साहित्याचा वापर करून ऑर्गेनिक फॉर्मस साकारले जातात.

शिलाँगमध्ये जन्मलेल्या आणि सध्या लंडनमध्ये स्थायिक असलेल्या थंगख्यू यांच्या डिझाइन्सची मुळं प्रामुख्याने 'खासी' संस्कृती आणि परंपरांमध्ये रुजलेली आहेत. वारसा आणि निसर्ग यांवर त्या अधिक लक्ष केंद्रित करतात. त्या कापूस, रेशीम आणि बांबू यांसारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करून हाताने विणलेली वस्त्र आणि सरफेस डिझाईन्स तयार करतात. पारंपारिक विणकाम तंत्राचं जतन करतानाच त्यात आधुनिक डिझाइनचा समावेश करण्यासाठी त्या मेघालयातील स्थानिक कारागिरांसोबत काम करतात.

या गौरवाबद्दल बोलताना थंगख्यू म्हणाल्या की, "हे माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. यामुळे मला माझ्या कल्पना आणि कार्याला अधिक विकसित करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं आहे." त्यांनी 'हाइमटेक्स्टाईल'चं वर्णन इतर डिझाइनर्सशी जोडलं जाण्याची आणि कापड उद्योगातील वैविध्यपूर्ण साहित्य व दृष्टिकोन शोधण्याची एक मोठी संधी असं केलं.

गेल्या वर्षी अर्ज करण्याचं आमंत्रण मिळाल्यानंतर त्यांची 'न्यू डिझाइनर्स सिलेक्ट' या विशेष शोसाठी निवड करण्यात आली होती. थंगख्यू यांनी यापूर्वी जर्मनी आणि यूकेमध्ये आपलं काम दाखवलं आहे. त्यांना शिलाँगमध्ये 'प्राईम अवॉर्ड्स' (२०२१) आणि लंडनमध्ये 'हाऊस ऑफ डिरेक्टरी अवॉर्ड' (२०२५) यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Khasi culture meets modernity: Elamon shines at Heimtextil!

Web Summary : Meghalaya's textile designer Elamon Thangkhiew, celebrated at Heimtextil 2026, blends Khasi traditions with modern designs. Using natural materials and collaborating with local artisans, she creates unique textiles, garnering international recognition and awards for her innovative work.
टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीसोशल व्हायरलसोशल मीडिया