Lokmat Sakhi >Inspirational > वडिलांनी फेकलं, आईने जीवदान दिलं; १५ वाद्यांवर राष्ट्रगीत वाजवणाऱ्या लेकीची हृदयस्पर्शी गोष्ट

वडिलांनी फेकलं, आईने जीवदान दिलं; १५ वाद्यांवर राष्ट्रगीत वाजवणाऱ्या लेकीची हृदयस्पर्शी गोष्ट

नियती एक महिन्याची होती, तेव्हा तिच्या वडिलांनी तिला खिडकीतून बाहेर फेकून दिलं कारण त्यांना मुलगी ओझं वाटत होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:37 IST2025-04-04T13:36:42+5:302025-04-04T13:37:30+5:30

नियती एक महिन्याची होती, तेव्हा तिच्या वडिलांनी तिला खिडकीतून बाहेर फेकून दिलं कारण त्यांना मुलगी ओझं वाटत होती.

Abandoned by Her Father as a Baby, This 13-YO Now Plays the National Anthem on 15 Instruments | वडिलांनी फेकलं, आईने जीवदान दिलं; १५ वाद्यांवर राष्ट्रगीत वाजवणाऱ्या लेकीची हृदयस्पर्शी गोष्ट

वडिलांनी फेकलं, आईने जीवदान दिलं; १५ वाद्यांवर राष्ट्रगीत वाजवणाऱ्या लेकीची हृदयस्पर्शी गोष्ट

नियती चेत्रांश या मुलीने आपल्या टॅलेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचा हा प्रवास सोपा नव्हता. तिच्या आईने तिला मोठं केलं. जेव्हा ती फक्त एक महिन्याची होती, तेव्हा तिच्या वडिलांनी तिला खिडकीतून बाहेर फेकून दिलं कारण त्यांना मुलगी ओझं वाटत होती. सुदैवाने शेजाऱ्याने नियतीचा जीव वाचवला. या घटनेनंतर नियतीच्या आई निराश झाली पण खचली नाही. आपल्या लेकीसाठी खंबीरपणे उभी राहिली. 

लेकीसाठी पतीला सोडलं आणि मुलीला एकटीने वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला. मुलीचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं. नियती जसजशी मोठी होत गेली तसतसं तिचें संगीतावरील प्रेम अधिक दृढ होत गेलं. ती १२ वर्षांची असताना तिने ४२ वादये वाजवली, ही एक अशी कामगिरी होती ज्यामुळे तिच्या आजूबाजूच्या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. तिच्या आईने तिची फुल टाईम नोकरी सोडून फ्रीलान्सर म्हणून काम करायला सुरुवात केली आणि मुलीला तिचा छंद जोपासण्यास मदत केली.


६५ सेकंदात १५ वाद्यांवर राष्ट्रगीत

नियती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील रंगमंचांवर सादरीकरण करत असताना तिने अनेक विक्रम केले आहेत. फक्त ६५ सेकंदात १५ वाद्यांवर राष्ट्रगीत वाजवून तिने इंडिया अँड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवलं. तिने १३ मिनिटांहून अधिक काळ डोळ्यांवर पट्टी बांधून शिव तांडव सादर केलं, ज्यामध्ये तिची प्रतिभा आणि चिकाटी दोन्ही दिसून आली.

आईने लेकीचा छंद जोपासला

दिल्लीची राहणाऱ्या नियतीने तिचं मत व्यक्त केलं आहे. संगीत कधीही विक्रम प्रस्थापित करण्यासाठी नव्हतं. ते हे सिद्ध करण्याबद्दल आहे की कोणीही मला किंवा माझ्या सर्वात मोठ्या आदर्श असलेल्या आईला शांत करू शकत नाही असं नियतीने म्हटलं आहे. नियती सहा महिन्यांची असताना तिच्या आईने तिच्यासाठी खेळण्यातील कीबोर्ड विकत घेतला होता. लहानपणीही ती स्वयंपाकघरातील भांडी वाजवून सूर तयार करायची. तेव्हापासूनच आईने तिचा छंद जोपासला. नियतीला म्युझिक डिरेक्टर व्हायचं आहे. 

Web Title: Abandoned by Her Father as a Baby, This 13-YO Now Plays the National Anthem on 15 Instruments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.