मन आणि शरीर, सोबतच आपल्या एकूण आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ या तीन प्रमुख प्रकृतींना खूप महत्त्व दिलं आहे. हे तीन दोष आपल्या शरीराची प्रकृती (Which detox drink should you drink according to your Vata-Pitta-Kaf dosha ) निश्चित करतात आणि त्यांच्या असंतुलनामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे शरीरातील या दोषांचे संतुलन राखणे खूप महत्त्वाचे आहे. शरीरातील या दोषांचे प्रमाण आणि स्वरूप वेगवेगळे असल्यामुळे आहार-विहार, ऋतुचर्या आणि डिटॉक्स पद्धतीही प्रत्येकासाठी वेगळ्या असतात(Ayurveda detox drinks for body types).
सध्याच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये, शरीराला डिटॉक्स करणं हे अत्यंत गरजेचे मानले जाते. परंतु डिटॉक्स ड्रिंक्स निवडताना आपल्या प्रकृतीनुसार योग्य निवड करणे अत्यंत आवश्यक असते. डिटॉक्स ड्रिंक्सची निवड करताना, एका व्यक्तीसाठी फायदेशीर असलेलं डिटॉक्स ड्रिंक दुसऱ्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. जर आपण चुकीचे डिटॉक्स ड्रिंक घेतल्यास फायदा होण्याऐवजी (best detox drink for Vata - Pitta - Kaf body type) त्रासच होऊ शकतो, म्हणून प्रकृतीनुसार योग्य डिटॉक्स ड्रिंकची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते. योग्य घटकांचा समतोल साधून तयार केलेलं डिटॉक्स ड्रिंक शरीरातील विषारी घटक बाहेर काढून ऊर्जा, पचनशक्ती आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत करते. मग वात, पित्त आणि कफ या प्रकृतींनुसार कोणतं डिटॉक्स ड्रिंक योग्य आहे, ते सविस्तर जाणून घेऊया.
वात, पित्त आणि कफ या प्रकृतींनुसार कोणतं डिटॉक्स ड्रिंक प्यावे...
आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वात, पित्त किंवा कफ यापैकी एक प्रमुख दोषावर आधारित असते, आणि त्या दोषानुसार शरीराची कार्यप्रणाली, पचनशक्ती व आरोग्य कसे आहे ते ठरते. यासाठीच, सर्वांसाठी एकसारखे डिटॉक्स ड्रिंक पिणे फायदेशीर ठरत नाही. प्रकृतीनुसार योग्य डिटॉक्स ड्रिंक निवडल्यास शरीरातील विषारी द्रव्ये सहज बाहेर पडतात, चयापचय क्रियेचा वेग सुधारतो आणि मन-शरीराला हलकेपणा जाणवतो.
योग्य घटकांच्या मिश्रणाने तयार केलेले हे ड्रिंक्स पिणे अधिक फायदेशीर ठरते. इंस्टाग्रामवरील vrinda_ayurveda या अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात वात, पित्त किंवा कफ प्रकृतीनुसार कोणी कोणत्या प्रकारचे डिटॉक्स ड्रिंक प्यावे याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
१. वात दोषासाठी डिटॉक्स ड्रिंक :- जर आपल्याला वात दोष असेल तर सांधेसूखी, स्नायूंचे दुखणे, गॅस यांसारख्या समस्या वारंवार त्रास देतात. यासाठीच, वात दोष असणाऱ्यांसाठी डिटॉक्स ड्रिंक तयार करण्यासाठी आपल्याला १/२ टेबलस्पून जिरे, १/२ टेबलस्पून सुंठ पावडर व व चिमूटभर हिंग इतक्या ३ पदार्थांची गरज लागणार आहे. २ कप पाण्यांत जिरे, सुंठ पावडर, चिमूटभर हिंग घालूंन पाणी उकळवून मग गाळून प्यावे. यामुळे वात दोष शांत होण्यास मदत होते तसेच पाचनक्रिया देखील अधिक सुरळीत होण्यास फायदेशीर ठरते.
वाट्टेल ते झालं तरी करा रोज सकाळी ३ गोष्टी, वजन होईल झरझर कमी- वेटलॉसचा नवा सोपा उपाय...
२. पित्त दोषासाठी डिटॉक्स ड्रिंक :- पित्त दोष असणाऱ्यांमध्ये चिडचिडेपणा, ॲसिडिटी, पोटांत जळजळ होणे, सतत घाम येणे यांसारख्या समस्यां दिसून येतात. यासाठीच, पित्त दोष असणाऱ्यांसाठी डिटॉक्स ड्रिंक तयार करण्यासाठी आपल्याला २ कप थंड पाणी, १ टेबलस्पून धणेपूड व ५ ते ६ पुदिन्याची पाने, १/२ टेबलस्पून मध इतक्या पदार्थांची गरज लागणार आहे. डिटॉक्स ड्रिंक तयार करण्यासाठी थंड पाण्यात धणेपूड, पुदिन्याची पाने, मध घालावा, १० मिनिटे हे मिश्रण पाण्यांत व्यवस्थित भिजवून घ्यावे. त्यानंतर गाळून हे पाणी डिटॉक्स ड्रिंक म्हणून प्यावे. यामुळे पित्त शांत होते व शरीर आतून थंडगार राहते.
मॉर्निंग वॉकला तर जाता पण चुकीच्या पद्धतीने चालणं म्हणजे हार्ट ॲटॅकचा धोका, टाळा ७ चुका....
३. कफ दोषासाठी डिटॉक्स ड्रिंक :- कफ दोष असणाऱ्यांमध्ये सतत थंडी वाजणे, कफ होणे, अळसपणा वाटणे यांसारखी लक्षणं दिसून येतात. कफ दोष असणाऱ्यांसाठी डिटॉक्स ड्रिंक तयार करण्यासाठी आपल्याला २ कप पाणी, ५ तुळशीची पाने, १ टेबलस्पून आल्याचा किस व १/२ टेबलस्पून हळद इतक्या पदार्थांची गरज लागणार आहे. पाण्यात तुळशीची पाने, आल्याचा किस, हळद घालून २ ते ३ मिनिटे उकळवून घ्यावे, मग हे तयार पाणी गाळून प्यावे. या उपायामुळे कफ कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.