बदलत्या हवामानात लोक अनेकदा आजारी पडतात. थोडासा निष्काळजीपणा देखील ताप, खोकला आणि इन्फेक्शनचा धोका वाढवतो. व्हायरल फिव्हर आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये काय फरक आहे ते जाणून घेऊया... व्हायरल फिव्हर आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे येणाऱ्या तापातील फरक ओळखण्यात लोक अनेकदा चुका करतात. या दोघांची लक्षणं तुम्हाला अगदी नॉर्मल वाटतील. पण दोघांमध्ये खूप फरक आहे.
व्हायरल फिव्हर हा थोड्या काळासाठी येतो. यात सर्दी आणि खोकला होऊ शकतो. व्हायरल फिव्हर कोणत्याही तपासणीशिवाय स्वतःहून बरा होऊ शकतो. मात्र तुमच्या संपर्कात येणाऱ्या लोकांमध्ये हा ताप वेगाने पसरतो. यासाठी अँटीबायोटिक्सची आवश्यकता नसते. थंड हवामान आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती ही व्हायरल फिव्हर होण्याची प्रमुख कारणं मानली जातात.
काही व्हायरल फिव्हर हे धोकादायक देखील असू शकतात. यामध्ये स्वाइन फ्लू, कोविड आणि डेंग्यू यांचा समावेश आहे. व्हायरल फिव्हरपेक्षा बॅक्टेरियल इन्फेक्शन हे जास्त काळ राहतं. यामध्ये घसा खवखवणं, छातीत दुखणं, कावीळ, लघवी करताना जळजळ होणं, रक्त येणं इत्यादी लक्षणं दिसतात. याच्या तपासणीसाठी चाचण्या करणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी अँटीबायोटिक्सही दिले जातात.
बॅक्टेरियल इन्फेक्शन फार लवकर पसरत नाही, त्याचा प्रसार होण्याची शक्यता खूप कमी असते. तपासणीनंतर, विशिष्ट अँटीबायोटिक्सची आवश्यकता असते. बॅक्टेरियल इन्फेक्शन दूषित पाणी पिण्यामुळे, दूषित अन्न खाण्यामुळे, संक्रमित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात आल्याने किंवा लसीकरण न केल्याने होऊ शकतात. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.