Lokmat Sakhi >Health > हातापायांना सतत मुंग्या येतात, गोळे येतात? तुमच्या नसा तर कमजोर नाहीत-पाहा कारण काय..

हातापायांना सतत मुंग्या येतात, गोळे येतात? तुमच्या नसा तर कमजोर नाहीत-पाहा कारण काय..

How To Make Strong Nerves: जेव्हा नसा कमजोर होतात, तेव्हा शरीरात एक नाही तर अनेक समस्या घर करतात. जसे की, शरीराच्या एखाद्या भागात वेदना, सुन्नपणा, झिणझिण्या येतात, तसेच स्नायूही कमजोर होतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 14:39 IST2025-08-14T10:29:41+5:302025-08-14T14:39:18+5:30

How To Make Strong Nerves: जेव्हा नसा कमजोर होतात, तेव्हा शरीरात एक नाही तर अनेक समस्या घर करतात. जसे की, शरीराच्या एखाद्या भागात वेदना, सुन्नपणा, झिणझिण्या येतात, तसेच स्नायूही कमजोर होतात.

What are the causes of weakness in the nerves? Know how to fix it | हातापायांना सतत मुंग्या येतात, गोळे येतात? तुमच्या नसा तर कमजोर नाहीत-पाहा कारण काय..

हातापायांना सतत मुंग्या येतात, गोळे येतात? तुमच्या नसा तर कमजोर नाहीत-पाहा कारण काय..

How To Make Strong Nerves: आपलं शरीर इतकं गूढ असतं की, त्याबाबत आपल्याच अनेक गोष्टी माहीत नसतात. वरून जरी छोटं, हलकं-फुलकं किंवा सामान्य दिसत असलं तरी शरीराच्या आतील संरचना फारच किचकट आणि गुंतागुंतीची असते. शरीरातील प्रत्येक अवयवांची आपापली जबाबदारी ठरलेली असते. नसा सुद्धा शरीरात खूप महत्वाचं काम करतात. सामान्यपणे एका व्यक्तीच्या शरीरात तब्बल ७२ हजार नसा असतात. ज्या शरीराच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत पसरलेल्या असतात. या नसा शरीरात रक्त आणि ऑक्सीजनचा सप्लाय करतात. इतकंच नाही तर नसांच्या माध्यमातूनच मेंदूला वेगवेगळे संकेत पाठवले जातात. 

पण जेव्हा नसा कमजोर होतात, तेव्हा शरीरात एक नाही तर अनेक समस्या घर करतात. जसे की, शरीराच्या एखाद्या भागात वेदना, सुन्नपणा, झिणझिण्या येतात, तसेच स्नायूही कमजोर होतात. याचं एक मोठं आणि मुख्य कारण असतं, काही पोषक तत्वांची कमतरता. नसा कमजोर होण्याचं एक मुख्य कारण म्हणजे व्हिटामिन्सची कमतरता. अशात नसा मजबूत करण्यासाठी काय आवश्यक असतं हे समजून घेऊया.

नसा कमजोर होण्याची कारणं

काही व्हिटामिन आणि व्हिटामिन बी १२ नसांच्या निर्मितीसाठी खूप गरजेचे असतात. जेव्हा शरीरात व्हिटामिन बी १२ कमी होतं, तेव्हा या नसा मेंदूला बरोबर पद्धतीनं संकेत पाठवू शकत नाही. नसा कमजोर झालेल्या असतात. त्यामुळे व्यक्तीला वेगवेगळ्या समस्या होतात. 

त्याशिवाय व्हिटामिन बी १ कमी झाल्यामुळेही नसा कमजोर होतात. हे व्हिटामिन शरीरात एनर्जी वाढवण्यात आणि नर्व्हस फंक्शनला कायम ठेवण्यास महत्वाची भूमिका बजावतं. तसेच व्हिटामिन डी सुद्धा नसांच्या आरोग्यासाठी आणि लवचिकतेसाठी फायदेशीर असतं. हे जर कमी झालं तर नसा कठोर होतात आणि त्यांमध्ये बिघाड होऊ शकतो. तर व्हिटामिन ई नसांचा ऑक्सीडेटिव्ह इजेपासून बचाव करतं.

नसा मजबूत कशा ठेवाल?

नसा मजबूत ठेवण्यासाठी आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश केला पाहिजे. ज्यात व्हिटमिन बी १२, ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड आणि व्हिटामिन डी चा भरपूर समावेश असावा. व्हिटामिन बी १२ दूध आणि इतर डेअरी प्रॉडक्टमधून मिळेल. तसेच कडधान्य, प्लांट बेस्ड मिल्क यातूनही ते मिळेल. तसेच ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड अळशीच्या बिया, चिया सीड्स, अक्रोड, सोयाबीनमधून मिळेल. या गोष्टींसोबतच नियमित व्यायाम केल्यानंही नसांचं आरोग्य चांगलं राहतं. नसा मजबूत राहतात. 

Web Title: What are the causes of weakness in the nerves? Know how to fix it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.