Lokmat Sakhi >Health > तुम्हीही रोज जेवताना ‘या’ ३ चुका करताय का? म्हणून बिघडतेय तुमची तब्येत, पोटाचेही वाढतात विकार

तुम्हीही रोज जेवताना ‘या’ ३ चुका करताय का? म्हणून बिघडतेय तुमची तब्येत, पोटाचेही वाढतात विकार

Bad Eating Habits : आपण काय होतो हे तर महत्वाचं आहेच, पण सोबतच ते कसं खातो हेही त्याहूनही महत्वाचं ठरतं. कारण याचा संबंधी आतड्यांच्या आरोग्याशी असतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:56 IST2025-08-06T10:06:59+5:302025-08-06T12:56:33+5:30

Bad Eating Habits : आपण काय होतो हे तर महत्वाचं आहेच, पण सोबतच ते कसं खातो हेही त्याहूनही महत्वाचं ठरतं. कारण याचा संबंधी आतड्यांच्या आरोग्याशी असतो.

These 3 eating habits are damaging your gut health | तुम्हीही रोज जेवताना ‘या’ ३ चुका करताय का? म्हणून बिघडतेय तुमची तब्येत, पोटाचेही वाढतात विकार

तुम्हीही रोज जेवताना ‘या’ ३ चुका करताय का? म्हणून बिघडतेय तुमची तब्येत, पोटाचेही वाढतात विकार

Bad Eating Habits :  तब्येत चांगली ठेवणं किंवा बिघडवणं सगळं आपल्या हातात असतं. कारण आपण जे खातो, जी लाइफस्टाईल फॉलो करतो त्याचा प्रभाव आपल्या आरोग्यावर पडत असतो. सतत कळत-नकळत आपण अशा काही चुका करत असतो ज्यामुळे शरीरात काहीना काही गडबड होते. इतकंच नाही तर गंभीर आजाराचा धोकाही वाढतो. आपण काय होतो हे तर महत्वाचं आहेच, पण सोबतच ते कसं खातो हेही त्याहूनही महत्वाचं ठरतं. कारण याचा संबंधी आतड्यांच्या आरोग्याशी असतो.

न्यूट्रिशनिस्ट शालिनी सुधाकर यांनी अशा काही चुकांबाबत सांगितलं आहे ज्या जास्तीत जास्त लोक जेवताना करतात. 

जेवणाआधी पाणी पिणे

वजन कमी करण्यासाठी आणि कमी खाल्लं गेलं पाहिजे म्हणून बरेच लोक जेवणाआधी पाणी पितात. जेव्हा आपण जेवणाआधी पाणी पितो, तेव्हा पोट लवकर भरतं आणि मेंदुला पोट तृप्तीचा खोटा संकेत मिळतो. यामुळे पचन रसाचं संतुलन बिघडतं आणि दिवसभर भूक लागत राहते. ज्यामुळे अनहेल्दी क्रेविंग आणि जास्त खाण्याची सवय लागते.

अशात जेवणाच्या अर्धा तासआधी पाणी पिणं टाळलं पाहिजे. दोन तीन घोट पाणी पिऊ शकता. पण जास्त प्रमाणात पाणी पिणं योग्य नाही. यामुळे पचनक्रिया प्रभावित होते.


जेवताना मोबाइल-टीव्ही बघणे

केवळ लहान मुलंच नाही तर घरातील मोठे सुद्धा ही चूक करतात. पण अनेकांना याचा जराही अंदाज नसतो की, ही चूक वजन वाढण्याचं कारण ठरू शकते. अनेक रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, जेव्हा आपण जेवण करताना टीव्ही किंवा मोबाइल बघतो, तेव्हा आतड्या आणि मेंदुचं कनेक्शन बिघडतं. यामुळे आतड्यांना हे समजण्यात कन्फ्यूजन होतं की पोट भरलं की नाही. मेंदुसोबतही हेच होतं. याचा परिणाम असा होतो की, आपण प्रमाणापेक्षा जास्त खाता. ज्यामुळे वजन वाढतं.

जेवण करताना ते फक्त गिळायचं नाहीये. ते चावून चावून खायचं आहे. तसेच जेवताना फक्त जेवणावर फोकस असला पाहिजे. जे खात आहात त्याचा आनंद घेऊन खाल्लं पाहिजे. तेव्हाच ते शरीराला लागतं. पचन चांगलं होण्यासाठी जेवणावर फोकस करणं खूप महत्वाचं असतं.

जेवणानंतर प्रोबायोटिक्स न घेणं

अनेकांना हे माहीत नसतं की, प्रोबायोटिक किती महत्वाचं असतं. गुड बॅक्टेरियाशिवाय अन्न चांगलं पचन होत नाही. तसेच जे खाल्लं त्यातील पोषक तत्वही शरीराला पूर्णपणे मिळत नाहीत. शालिनी सुधाकर सांगतात की, जेवण झाल्यावर प्रोबायोटिक गरजेचं असतं. ते मिळवण्यासाठी दही खाऊ शकता. 

Web Title: These 3 eating habits are damaging your gut health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.