Lokmat Sakhi >Health > सतत थकवा, अंगदुखी, अस्वस्थता? शरीरात असू शकते १ गोष्टीची कमतरता, लक्षणं ओळखा आणि...

सतत थकवा, अंगदुखी, अस्वस्थता? शरीरात असू शकते १ गोष्टीची कमतरता, लक्षणं ओळखा आणि...

Symptoms of Magnesium Deficiency and Magnesium rich food Health Tips : शरीराला पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम मिळाले नाही तर सामान्यपणे कोणती लक्षणे दिसतात याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2022 13:42 IST2022-07-24T13:29:19+5:302022-07-24T13:42:08+5:30

Symptoms of Magnesium Deficiency and Magnesium rich food Health Tips : शरीराला पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम मिळाले नाही तर सामान्यपणे कोणती लक्षणे दिसतात याविषयी...

Symptoms of Magnesium Deficiency and Magnesium rich food Health Tips : Constant fatigue, body aches, restlessness? The body may be deficient in 1 thing, identify the symptoms and… | सतत थकवा, अंगदुखी, अस्वस्थता? शरीरात असू शकते १ गोष्टीची कमतरता, लक्षणं ओळखा आणि...

सतत थकवा, अंगदुखी, अस्वस्थता? शरीरात असू शकते १ गोष्टीची कमतरता, लक्षणं ओळखा आणि...

Highlightsमॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणे कोणती आणि असे त्रास होऊ नयेत म्हणून आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा याविषयीशरीरात एखादा घटक कमी असेल तर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात.

पुरेशी झोप झाली, योग्य आहार घेतला, व्यायामही करत असू तर अनेकदा आपल्याला सतत थकल्यासारखे वाटते. कधी सारखी अंगदुखी होते तर कधी अस्वस्थता येते. रोज उठून घरातले काम, ऑफीस, सगळ्यांचे सगळे करता करता आपण थकून जातो असे आपल्याला वाटते आणि शरीर देत असलेल्या या संकेतांकडे आपण दुर्लक्ष करतो. पण सातत्याने असा थकवा आणि अंगदुखी होत असेल तर आपल्या शरीरात एका गोष्टीची कमतरता असू शकतो. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून याबाबतची जागृती करतात. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा लहान-मोठा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ती काळजी घ्यायला हवी. लवनीत बत्रा सोशल मीडियावर बऱ्याच अॅक्टीव्ह असून त्या आपल्या फॉलोअर्सना काही ना काही महत्त्वाची माहिती देत असतात (Symptoms of Magnesium Deficiency and Magnesium rich food Health Tips). 

(Image : Google)
(Image : Google)

आपल्या शरीरातील स्नायूंची ताकद वाढावी आणि मज्जातंतूंचे कार्य सुरळीत व्हावे यासाठी आपल्याला मॅग्नेशियमची आवश्यकता असते. तसेच शरीरात डी व्हिटॅमिन चांगल्या प्रमाणात शोषले जावे यासाठीही मॅग्नेशियम आवश्यक असते. एकूण शरीरातील विविध कार्य सुरळीत होण्यासाठी मॅग्नेशियम हा अतिशय आवश्यक घटक आहे. आपण साधारणपणे शरीराला प्रोटीन, कॅल्शियम सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स मिळावेत यासाठी प्रयत्नशील असतो. पण मॅग्नेशियम हे महत्त्वाचे खनिज असून त्याची शरीराला आवश्यकता असते. शरीराला पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम  मिळाले नाही तर सामान्यपणे काही लक्षणे दिसून येतात. ती कोणती आणि असे त्रास होऊ नयेत म्हणून आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा याविषयी...

मॅग्नेशियमची कमतरता असल्याची लक्षणे 

१. थकवा आणि अशक्तपणा 
२. भूक न लागणे - स्नायूंमध्ये पेटके येणे किंवा उबळ आल्यासारखे होणे
३. मळमळ किंवा उलटी 
४. बधीरपणा 
५. डोळ्यांच्या असामान्य हालचाली 
६. हृदयाची असामान्य धडधड होणे 

(Image : Google)
(Image : Google)

आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा? 

आपला आहार संतुलित असणे अतिशय आवश्यक असते. आपल्या आरोग्याच्या बहुतांश तक्रारी या चुकीच्या आहारपद्धतीमुळे उद्भवतात.जंक फूड, तळलेले किंवा मसालेदार पदार्थ यांच्या सेवनाने शरीराला विशेष फायदे न होता तोटेच होतात. त्यामुळे जंक फूड किंवा बाहरचे खाण्यापेक्षा घरात केलेला ताजा आणि संतुलित आहार केव्हाही आरोग्यासाठी सर्वात चांगला असतो हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. अन्यथा कमी वयात आरोग्याच्या विविध तक्रारी डोके वर काढताना दिसतात. त्यामुळे तुम्हालाही वरील लक्षणे दिसत असतील तर आहारात आवर्जून खालील पदार्थांच समावेश करा आणि मॅग्नेशियमची कमतरता भरुन काढा. 

१. राजगिरा 
२. विविध प्रकारच्या शेंगा
३. सिताफळ
४. नटस आणि बिया 


 

Web Title: Symptoms of Magnesium Deficiency and Magnesium rich food Health Tips : Constant fatigue, body aches, restlessness? The body may be deficient in 1 thing, identify the symptoms and…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.