Stomach Growling: काही चटरबटर, मसालेदार, तिखट किंवा तळलेलं खाल्लं तर पोटासंबंधी समस्या होणं कॉमन आहे. अनेकदा आपण अनुभवलं असेल की, पोटातून कधी कधी गुडगुड असा आवाज येतो. हा आवाज सगळ्यांनाच माहीत आहे. जास्तीत जास्त लोक कॉमन समस्या समजून याकडे दुर्लक्ष करतात. कधी कधी जर असा आवाज येत असेल तर ठीक, पण जर नेहमीच असं होत असेल तर याकडे लक्ष दिलं पाहिजे.
डॉ. इमरान अहमद यांनी झी न्यूजसोबत बोलताना सांगितलं की, पोटातून गुडगुड आवाज येण्याला मेडिकलच्या भाषेत स्टोमक ग्रोलिंग असं म्हटलं जातं. जेव्हा पचनक्रिया सुरू असते तेव्हा हा आवाज आतज्या पोटा आणि आतड्यांमधून येतो. एकदा किंवा दोनदा असा आवाज येणं कॉमन आहे. पण पुन्हा पुन्हा होत असेल तर हा एखाद्या गंभीर आजाराचा संकेत असू शकतो.
जेव्हा अन्न पचनासाठी आपल्या छोट्या आतड्यांमध्ये पोहोचतं तेव्हा शरीर अन्न तोडण्यासाठी आणि त्यातील न्यूट्रिएंट्स अॅब्जॉर्ब करण्यासाठी डायजेस्टिव एंजाइम्स रिलीज करतं. सामान्यपणे भूक लागल्यावर पोटातून गुडगुड आवाज येत असतो. पण अनेक प्रयत्न करूनही हा आवाज थांबत नसेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवायला हवं.
काही केसेसमध्ये हा आवाज डायजेशनसंबंधी एखाद्या आजाराचा इशारा देत असतो. जर वेळीच याची माहिती मिळवली नाही तर स्थिती गंभीर होऊ शकते.
हा आवाज कसा बंद कराल?
जर पोटातून पुन्हा पुन्हा गुडगुड आवाज येत असेल तर पाणी पिण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. थोड्या थोड्या अंतरानं हलकं जेवण केलं पाहिजे. हवं तर दिवसातून दोनदा आपण हर्बल चहा पिऊ शकता. असं नियमितपणे केल्यास पोटातून येणारा आवाज बंद होईल.