Lokmat Sakhi >Health > पोटाच्या तक्रारी त्रास देतात? घरच्या घरी करता येणारे एक पेय प्या, व्हाल एकदम ओके...

पोटाच्या तक्रारी त्रास देतात? घरच्या घरी करता येणारे एक पेय प्या, व्हाल एकदम ओके...

ताकापासून तयार होणारे पेय ठरेल आरोग्याच्या बऱ्याच तक्रारींवर रामबाण उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 16:08 IST2022-01-30T16:02:24+5:302022-01-30T16:08:42+5:30

ताकापासून तयार होणारे पेय ठरेल आरोग्याच्या बऱ्याच तक्रारींवर रामबाण उपाय...

Stomach complaints bother? Drink a drink that can be made at home, it will be OK ... | पोटाच्या तक्रारी त्रास देतात? घरच्या घरी करता येणारे एक पेय प्या, व्हाल एकदम ओके...

पोटाच्या तक्रारी त्रास देतात? घरच्या घरी करता येणारे एक पेय प्या, व्हाल एकदम ओके...

Highlightsपोट आणि पचनाच्या तक्रारी दूर करायच्या असतील तर ताक ठरतो उत्तम उपाय...ताकापासून केलेले हे उत्तम पेय आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त...

आपल्या शरीरातील एकूण रोगप्रतिकारक पेशींपैकी ७० टक्के पेशी या आपल्या आतड्यामध्ये असतात. आपल्या शरीरात चांगल आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे बॅक्टेरीया कार्यरत असतात. पण या दोघांमधील असमतोलामुळे शरीराचे कार्य बिघडू शकते. शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकण्याचे अतिशय महत्त्वाचे काम या बॅक्टेरीयांच्या माध्यमातून होत असते. विविध प्रकारच्या संसर्गांना दूर ठेवण्यासाठी हे बॅक्टेरीया उत्तम पद्धतीने काम करत असतात. पण यामध्ये असमतोल झाला तर लठ्ठपणा, पोटाच्या तक्रारी यांबरोबरच कर्करोगासारखे दुर्धर आजारही होत असतात. इतकेच नाही तर त्वचेशी संबंधित पुरळे, इसब, गजकर्ण, सोरायसिस अशा समस्याही उद्भवतात. आहाराच्या चुकीच्या पद्धतींमुळे पोटाशी किंवा आतड्यांशी निगडीत या समस्या (Gut related problems) उद्भवत असल्याने आहाराबाबत (Good diet) योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. सतत जंक फूड, तेलकट, मसालेदार पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने आरोग्याच्या या समस्या निर्माण होतात. 

आपण खाल्लेले पदार्थ जेव्हा योग्य पद्धतीने पचत नाहीत त्यावेळी हे घटक पचनप्रक्रियेत अडथळे निर्माण करतात आणि त्यामुळे अॅसिडीटी, बद्धकोष्ठता, गॅसेस यांसारख्या पचनाच्या तक्रारी निर्माण होतात. नियमितपणे यांसारख्या तक्रारी भेडसावणारे बरेच जण आपल्या आजुबाजूला असतात. पण या तक्रारी वेळीच दूर करायच्या असतील तर त्यावर औषधोपचार करण्यापेक्षा आयुर्वेदात एक अतिशय उत्तम पेय सांगितले आहे. द योगा इन्स्टीट्यूटच्या प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र (Dr. Hansaji Yogendra) यांनी पोटाशी निगडीत तक्रारींसाठी (Digation related problems) एक अतिशय उत्तम पेय सांगितले आहे. पाहूयात या पेयाचे फायदे आणि ते कसे तयार करायचे याविषयी....

(Image : Google)
(Image : Google)

साहित्य - 

ताक - एक कप
लिंबाचा रस - २ चमचे 
आलं - १ चमचा किसलेले 
हिंग - पाव चमचा
मोहरी - अर्धा चमचा
जिरे - अर्धा चमचा 
तूप - एक चमचा
कडिपत्ता - ७ ते ८ पाने 
खडे मीठ - चवीनुसार

कृती - 

- मिक्सरच्या भांड्यात ताक, लिंबाचा रस, हिंग, आलं, खडे मीठ एकत्र करा. ते मिक्सरमधून चांगले फिरवून एकजीव करा.

- एका पॅनमध्ये तूप घाला, त्यामध्ये मोहरी, जीरे आणि कडिपत्ता घालून फोडणी करा. ही फोडणी चांगली तडतड होऊद्या, त्यानंतर गॅस बंद करा.

- या फोडणीमध्ये ताकाचे केलेले मिश्रण घाला आणि हे सगळे एकजीव होईपर्यंत हलवा. 

(Image : Google)
(Image : Google)


फायदे 

१.  ताक हे घरच्या घरी तयार करता येणारे आणि आरोग्याच्या अनेक तक्रारींवर अतिशय उत्तम पेय आहे. 

२.  ताकामध्ये अँटीव्हायरल, अँटी बॅक्टेरीयल तसेच अँटी कॅन्सर गुणधर्म असतात. 

३. ताकाच्या नियमित सेवनाने कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी कमी होण्यास मदत होते. 

४. ज्यांना कॅल्शियमची कमतरता आहे अशांसाठी ताक अतिशय उत्तम पेय आहे. 

५. ज्यांना लॅक्टोज म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ चालत नाहीत. त्यांच्यासाठी ताक हा अतिशय उत्तम पर्याय असू शकतो. ताकाचे अशाप्रकारचे पेय तर अशांसाठी अतिशय उत्तम ठरु शकते.

६. उन्हाळ्याच्या दिवसांत तर ग्लासभर ताक पिण्याने डिहायड्रेशन, हिट स्ट्रोक यांसारख्या गोष्टींवर उत्तम उपाय म्हणून ताक प्यायलेले केव्हाही चांगले. 


७. ताकामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस यांसारखे इलेक्ट्रोलाइटस असतात. त्यामुळे हे घटक आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात.

८. अॅसिडीटीसारख्या समस्यांसाठीही नियमितपणे ताक पिणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील चांगले बॅक्टेरीया वाढण्यास मदत होते 

९. त्यामुळे तुमच्या आहारात ताकाचा नियमितपणे वापर करा, पण तुम्हाला सर्दीचा त्रास असेल तर मात्र रात्रीच्या वेळी ताक घेणे टाळलेलेच बरे.  
 

Web Title: Stomach complaints bother? Drink a drink that can be made at home, it will be OK ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.