लोक झोपण्यापूर्वी अनेकदा त्यांच्या खोलीतील लाईट बंद करतात. तर काही लोक रात्री लाईट बंद करत नाहीत. अनेकांना नेमकं काय करावं अशा प्रश्न पडतो. याच दरम्यान हार्वर्ड युनिव्हर्सिटीने एक रिसर्च केला आहे. त्यामुळे झोपताना लाईट बंद ठेवावे की चालू हे जाणून घेऊया.
अमेरिकेतील लोकप्रिय युनिव्हर्सिटी असलेल्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी माणसाच्या झोपेवर एक रिसर्च केला. या रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की झोपताना जर आर्टिफिशियल लाईट तुमच्या डोळ्यांवर पडला तर त्याचा तुमच्या हृदयावर आणि मेंदूवर परिणाम होऊ शकतो.
रिसर्चनुसार, झोपताना तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहोचणारा थोडासा प्रकाश देखील मेंदूला एक्टिव्ह करतो, ज्यामुळे धमन्यांमध्ये रक्तप्रवाह वाढतो. झोपेदरम्यान शारीरिक कार्यांचा वेग मंदावत असल्याने, या परिस्थितीत वाढलेला रक्तप्रवाह हृदयावर परिणाम करू शकतो. याचा अर्थ असा की, रात्री लाईट चालू ठेवल्याने हृदय आणि मेंदू दोघांनाही नुकसान पोहचू शकतं.
बहुतेक लोक रात्री लाईट चालू ठेवून झोपत नाहीत. काही लोक निक्टोफोबियामुळे म्हणजेच अंधाराच्या भीतीमुळे लाईट चालू ठेवून झोपतात. काही लोक रात्री मध्येच उठावं लागलं तर दिसावं म्हणून लाईट चालू ठेवतात. जे लोक बराच काळ तणावाखाली असतात ते देखील लाईट चालू ठेवून झोपतात. काही लोक आळस असल्यामुळेही झोपताना लाईट चालू ठेवतात.
रात्री लाईट चालू ठेवून झोपणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एका रिसर्चनुसार, लाईटचा संपूर्ण शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. जर तुम्ही लाईच चालू ठेवून झोपत असाल तर तुम्ही आताच ही सवय बदला.
