Pregnancy Issues : आजकाल अनेक महिलांना वेगवेगळ्या कारणांनी वयाच्या तिशीनंतर बाळ होण्यास अडचणी येतात. याची कारणं डॉक्टर वेळोवेळी सांगत असतात. याबाबत स्त्री रोग एक्सपर्ट डॉक्टर महिमा यांनी काही गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. डॉक्टर महिमा यांच्यानुसार, महिलांच्या फर्टिलिटीचा प्रवास त्यांच्या जन्मापासूनच सुरू होतो. जेव्हा मुलगी आपल्या आईच्या गर्भात असते, तेव्हाच तिच्या ओव्हरीजमध्ये अंड्यांची लाखोंमध्ये असते.
जन्मावेळी ही संख्या जवळपास 1 ते 2 मिलियनपर्यंत कमी होते आणि प्यूबर्टीपर्यंत पोहोचल्यावर केवळ 50 ते 60 हजार एग्सच शिल्लक राहतात. याचा अर्थ हा आहे की, वय वाढण्यासोबतच महिलांची फर्टिलिटी हळूहळू कमी होऊ लागते.
पीसीओडी किंवा पीसीओएस
डॉक्टर सांगतात की, जर महिलेला पीसीओडी किंवा पीसीओएससारख्या हार्मोनल समस्या असतील, तर मासिक पाळीमध्ये जास्त वेदना, अधिक रक्तस्त्राव आणि एंडोमेट्रियोसिससारख्या समस्या होतात. अशात वेळीच डॉक्टरांना संपर्क करणं गरजेचं असतं. त्याशिवाय एका दुसऱ्या व्हिडिओत डॉक्टरांनी आयव्हीएफ टेक्निकमध्ये येणाऱ्या खर्चाबाबतही सांगितलं.
त्यांना एका शोमध्ये विचारण्यात आलं की, IVF एकदा फेल झाल्यावर पुन्हा पैसे द्यावे लागतात का? यावर त्यांनी सांगितलं की, प्रत्येक महिलेचं शरीर आणि हार्मोनल रिस्पॉन्स एकसारखा नसतो. काही महिलांच्या शरीरात जास्त एग्स तयार होतात, ज्याला हायपर स्टिमुलेशन म्हटलं जातं. तर काही महिलांमध्ये कमी एग्स तयार होतात.
IVF ची गॅरंटी नाही
याच कारणाने वेगवेगळ्या सायकलमध्ये इंजेक्शनचा डोज आणि ट्रीटमेंटमध्ये बदल करावा लागतो. जेणेकरून प्रत्येक रूग्णाला चांगली IVF ट्रीटमेंट आणि खर्च कमी लागावा. एक्सपर्टनी स्पष्टच सांगितलं की, IVF मध्ये कुणाला तीन किंवा चार सायकलमध्ये प्रेग्नेंट केलं जाईल, तर हे शक्य नाही. असं करणं केवळ एक स्कॅम आहे.