lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Pregnancy > गरोदरपणात प्रोफेशनल फोटोशूट करण्याचा नवाच ट्रेंड, बर्थ शूट! हौशीचा नवा अजब मामला

गरोदरपणात प्रोफेशनल फोटोशूट करण्याचा नवाच ट्रेंड, बर्थ शूट! हौशीचा नवा अजब मामला

प्री वेडिंग फोटोग्राफी, हनीमुन फोटोग्राफी अगदी फर्स्ट नाईट बेडरूम फोटोग्राफी हे सगळं आपण ऐकलंय, पण आता असाच एक अफलातून ट्रेण्ड आलाय बर्थ फोटोग्राफी.... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:27 PM2021-08-20T16:27:33+5:302021-08-20T17:13:57+5:30

प्री वेडिंग फोटोग्राफी, हनीमुन फोटोग्राफी अगदी फर्स्ट नाईट बेडरूम फोटोग्राफी हे सगळं आपण ऐकलंय, पण आता असाच एक अफलातून ट्रेण्ड आलाय बर्थ फोटोग्राफी.... 

New trend of photography: birth shoot or birth photography | गरोदरपणात प्रोफेशनल फोटोशूट करण्याचा नवाच ट्रेंड, बर्थ शूट! हौशीचा नवा अजब मामला

गरोदरपणात प्रोफेशनल फोटोशूट करण्याचा नवाच ट्रेंड, बर्थ शूट! हौशीचा नवा अजब मामला

Highlightsबर्थ फोटोग्राफी म्हणजे आयुष्यातली अत्यंत थ्रिलिंग गोष्ट आहे, असे हा अनुभव घेतलेले काही फोटोग्राफर सांगतात. 

हौसेला काही मोल नसतं हेच खरं... फोटो काढण्याची हौस पण अशीच विलक्षण आहे. जीवनातला प्रत्येक आनंदाचा प्रसंग. मग तो अगदी लहानसहान गोष्टींमधला आनंद असो, की आयुष्यातली एखादी मोठी घटना. जेव्हा तो आनंद आपण कॅमेऱ्यात कैद करतो, तेव्हाच त्या आनंदाला पुर्णत्व येतं. मग आई होणं किंवा बाबा होणं, हे तर जीवनातले परम सुख. या सुखद क्षणांच्या आठवणीही कैद करण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. यातूनच तर जन्माला आले आहे बर्थ शूट किंवा बर्थ फोटोग्राफीचं नवं तंत्र. 

 

भारतात साधारण ५ ते ६ वर्षांपुर्वीपासून या नव्या प्रकारच्या फोटोग्राफीचं वारं वाहू लागलं आहे. पण अगदी आतापर्यंत हा ट्रेण्ड म्हणावा तेवढा वेगवान झालेला नव्हता. मेट्रो सिटीजमधल्या मोजक्या मंडळींपर्यंत मर्यादित असणारा हा ट्रेण्ड आता मात्र बाळसे धरू लागला आहे. परदेशात लोकप्रिय असणारा हा ट्रेण्ड आपल्याकडे फक्त काही गर्भश्रीमंत लोकांपर्यंतच पोहोचलेला होता. पण आता उच्च मध्यमवर्गीय किंवा मध्यमवर्गीय जोडपीही बर्थ फोटोग्राफीचा विचार करत आहेत.

 

काय आहे बर्थ फोटोग्राफी?सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास बर्थ फोटोग्राफी म्हणजे आपलं बाळं जेव्हा या जगात येणार असतं, तो क्षण कॅमेऱ्यात कैद करणे. अगदी प्रोफेशनल पद्धतीने ही फोटोग्राफी केली जाते. यामध्ये होणाऱ्या आईला  जेव्हा सातवा महिना सुरू होतो, तेव्हापासून ते बाळाचा जन्म होऊन बाळाचे घरात स्वागत होईपर्यंतचे सर्व फोटो काढले जातात. अशा प्रकारच्या फोटोग्राफीसाठी सगळ्यात आधी डिलिव्हरी जिथे होणार आहे, त्या हॉस्पिटलची, गायनॅकची परवानगी घ्यावी लागते. त्यांनी परवानगी दिली तर बाळ आणि आई यांच्या दोघांच्याही आरोग्याची काळजी घेऊन  हे फोटो काढले जातात. अर्थात लेबर रुममध्ये जाऊन फोटो काढण्याची परवानगी दिली जात नाही. मात्र दावाखान्यात काही फोटो काढले जातात.

 

बाळंतपणाची वेळ जेव्हा जवळ येते, तेव्हा होणाऱ्या आईसाठी तो आयुष्यातला सगळ्यात कठीण प्रसंग असतो. बाळंतपणाच्या कळा सोसणं हा देखील खूप अवघड प्रसंग. आपल्याला बाळंतकळा कशा सुरू झाल्या, मग घरापासून ते दवाखान्यापर्यंत आपण कसं गेलो, दवाखान्यात गेल्यावर आपल्याला कसा त्रास झाला, कळा देताना आपली अवस्था कशी होती, आपल्यासोबत दवाखान्यात आलेले आपले नातेवाईक, डॉक्टर, नर्स, इतर स्टाफ यांच्याकडून कशी मदत मिळत गेली, असे सगळे बारकावे बर्थ फोटोग्राफीमध्ये टिपले जातात.

 बाळाचा जन्म , बाळाचे रडणे आणि मग बाळ दवाखान्यातून घरी जाईपर्यंत प्रत्येक लहान- सहान गोष्टीचे फोटो घेतले जातात. काही जणांना हे अतिजास्त होतंय, असं फिलिंग येऊ शकतं. पण शेवटी हौशेला मोल नसतं हेच खरं. ज्यांना फोटोंची प्रचंड क्रेझ आहे, ते दाम्पत्य या बर्थ फोटोग्राफीचं मनापासून स्वागत करत आहेत. इतर सगळ्या प्रकारचे फोटो काढणं वेगळं आणि बर्थ फोटोग्राफी करणं वेगळं. बर्थ फोटोग्राफी म्हणजे आयुष्यातली अत्यंत थ्रिलिंग गोष्ट आहे, असे हा अनुभव घेतलेले काही फोटोग्राफर सांगतात. 
 

Web Title: New trend of photography: birth shoot or birth photography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.