Join us

मृणाल ठाकूरचं एग्ज फ्रिजिंगसंदर्भात महत्वाचं विधान, हे एग्ज फ्रिजिंग म्हणजे नेमकं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2024 18:58 IST

Mrinal Thakur's important statement regarding egg freezing : मृणालने एग्ज फ्रिजिंगबाबत एका मुलाखतीत आपले मत मांडले आहे. 

अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur) आजपर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक कामं केली आहेत. मृणाल ठाकूरनं बॉलिवूडमध्येच नाही तर टॉलिवूडमध्येही नाव कमावले आहे. ती आपल्या अभिनयातून अनेकांची मन जिंकून घेते. तिच्या अनेक सुपरहिट सिनेमांनी प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले आहे. मृणालने एग्ज फ्रिजिंगबाबत एका मुलाखतीत आपले मत मांडले आहे. 

मृणालनं नुकतीच 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत मृणालनं तिच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे.   एग्स फ्रीज करण्याचा विचार करत असल्याचं तिनं सांगितलं. नात्याबद्दल बोलताना ती म्हणाली, 'मला माहित आहे की ते रिलेशनशिप कठीण आहे, परंतु म्हणूनच तुम्हाला तुमच्या कामाचं स्वरूप समजणारा योग्य जोडीदार हवा आहे'.

 

एग्स फ्रिजिंग म्हणजे काय? ते का करतात

एग्ज फ्रिजिंग (Egg Freezing Technique) ही एक शास्त्रीय वैद्यकीय  प्रक्रिया आहे जी स्त्रियांना त्यांच्या पसंतीच्या वयात बाळाला जन्म देण्याची परवानगी आणि प्रजनन स्वातंत्र्य देते. एका विशिष्ट वयामध्ये ओव्हरीमधून मॅच्युर एग्ज काढून लॅबमध्ये हे एग्ज शून्य तापमानावर फ्रिज केले जातात. जेव्हा या एग्जची गरज भासते तेव्हा शुक्राणूंसह (Sperm) यांचा मिलाप घडून गर्भाशयात हे स्थलांतरित करण्यात येते. त्यामुळे एका विशिष्ट वयानंतरही कोणत्याही महिलेला आई होता येतं. तुम्हांला एखाद्या विशिष्ट वयात आई व्हायचं नसेल पण काही वर्षांनंतर तुम्हांला आई व्हायची इच्छा झाली तर तुम्हांला या एग्ज फ्रिजिंग प्रक्रियेमुळे आपलं स्वप्नं साकार करता येतं. 

डोसा तव्याला चिकटतो, जाळी येत नाही? पिठात 'हा' पदार्थ मिसळा-मऊ, जाळीदार बनेल डोसा

यासाठी तुम्हांला कोणत्याही शुक्राणूंची किंवा अन्य गोष्टींची गरज भासत नाही. कारण तुमचे एग्ज हे एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येतात. जेणेकरून तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा गरोदर होण्यासाठी याचा वापर करू शकता. भविष्यासाठी तुम्ही तुमच्या तरूण वयातही हे एग्ज फ्रिजिंग करून ठेऊ शकता. ते बरेच काळ टिकून राहते आणि त्याचा पुढे कोणताही त्रास होत नाही. 

डॉक्टरांच्या मते, कमी वयातच एग्ज फ्रिज करण्याचे अनेक फायदे होतात. यामुळे एखाद्या महिलेला वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आई होता येते. तज्ज्ञांनुसार वय वाढल्यानंतर अनेक आजारांमुळे महिलांच्या अंड्यांमध्ये दर्जा आणि संख्येत कमतरता येऊ शकते, त्यामुळे कमी वयात एग्ज फ्रिजिंग करावी. कमी वयात अर्थात २० ते ३० वय वर्षाच्या दरम्यान एग्ज फ्रिज करणे योग्य ठरते. कारण यानंतर एग्जची संख्या कमी होऊ लागते. कमी वयात एग्ज फ्रिज केल्याने एग्जचा दर्जा चांगला राहू शकतो. ज्यामुळे कधीही त्याचा वापर करता येऊ शकतो.

या वयादरम्यान चांगल्या दर्जाचे एग्ज सर्वात जास्त प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असतात. त्यामुळेच पूर्वी साधारण वीशीनंतर लग्न करण्याचा आग्रह असायचा. मुलांना जन्म देण्यासाठी हा काळ योग्य असतो. तसंच या वयामध्ये गर्भावस्थेदरम्यान होणाऱ्या गुंतागुंतीही कमी होतात यामुळेच कमी वयातच एग्ज फ्रिजिंग (Egg Freezing Technique) करण्याचा सल्ला दिला जातो.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य