lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Pregnancy > पहिल्या बाळांतपणात माझं २० किलो वजन वाढलं होतं! करीना कपूर म्हणते, वजनावरुन नावं कसली ठेवता?

पहिल्या बाळांतपणात माझं २० किलो वजन वाढलं होतं! करीना कपूर म्हणते, वजनावरुन नावं कसली ठेवता?

How Kareena Kapoor Gain Weight in First Pregnancy : सुरुवातीचे ६ महिने आपण हे पाळले मात्र नंतर आपले नियंत्रण सुटले आणि आपण मनसोक्त खात सुटलो असे करीना मोकळेपणाने सांगते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2023 03:19 PM2023-05-22T15:19:09+5:302023-05-22T15:20:48+5:30

How Kareena Kapoor Gain Weight in First Pregnancy : सुरुवातीचे ६ महिने आपण हे पाळले मात्र नंतर आपले नियंत्रण सुटले आणि आपण मनसोक्त खात सुटलो असे करीना मोकळेपणाने सांगते.

How Kareena Kapoor Gain Weight in First Pregnancy : I gained 20 kg during my first pregnancy! Kareena Kapoor says, How do you talk about weight Gain? | पहिल्या बाळांतपणात माझं २० किलो वजन वाढलं होतं! करीना कपूर म्हणते, वजनावरुन नावं कसली ठेवता?

पहिल्या बाळांतपणात माझं २० किलो वजन वाढलं होतं! करीना कपूर म्हणते, वजनावरुन नावं कसली ठेवता?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाडकी बेबो वयाच्या चाळीशीत असली तरी तिचे सौंदर्य तसूभरही कमी झालेले नाही. २ मुलांची आई असलेली करीना सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर संसारात रमली.  बहुतांश अभिनेत्री लग्नानंतर किंवा मूल झाल्यानंतर करिअरमध्ये ब्रेक घेतात. मात्र करीनाने दोन मुलांची आई झाल्यावरही लवकर कमबॅक केल्याचे दिसले. अभिनेत्रींना आपले वजन, सौंदर्य याबाबत कायमच खूप जागरुक राहावे लागते. आपली इमेज जपण्यासाठी त्यांना मेंटन राहणे आवश्यक असते. म्हणूनच बाळंतपणानंतर या अभिनेत्री तज्ज्ञांच्या सल्ल्याने उत्तम व्यायाम आणि आहार असे शेड्यूल फॉलो करताना दिसतात. करीनाने नुकतेच आपल्या पहिल्या प्रेग्नन्सीबद्दल वक्तव्य केले. यावेळी आपले वजन किती वाढले होते याबाबत मोकळेपणाने चर्चा केली (How Kareena Kapoor Gain Weight in First Pregnancy). 

(Image : Google)
(Image : Google)

करीना म्हणजे तैमूरचा जन्म झाल्यानंतर माझे वजन थोडेथोडके नाही तर तब्बल २० किलोने वाढले होते. २०१६ मध्ये पहिल्यांदाच करीना लॅक्मे फॅशन वीकमध्ये बेबी बंपसह सहभागी झाली होती. आपल्या प्रेग्नन्सीच्यावेळी आपल्याला असंख्य प्रश्न पडत होते आणि आपण डॉक्टरांना ते विचारुन भंडावून सोडत होतो असे ती एका मुलाखीत म्हणाली. इतकेच नाही तर आपली मोठी बहिण लोलो म्हणजेच करिश्मा कपूरलाही आपण बरेच प्रश्न विचारत असल्याचे करीनाने सांगितले. सुरुवातीला आपण डाएट, फिटनेस याबाबत बरीच काळजी घेतली मात्र नंतर आपण बाळंतपण एन्जॉय केले आणि आपल्या आवडीच्या सगळ्या गोष्टी मनसोक्त खाल्ल्या असे ती म्हणाली. त्यावेळी तिचे वजन थोडे थोडके नाही तर तब्बल २० किलोंनी वाढलं. 

(Image : Google)
(Image : Google)

त्यावेळी डॉक्टरांनी तिला खाणं कमी करण्याचा सल्ला दिला. प्रत्यक्षात बाळ पोटात असताना किंवा नंतरही आपण खूप जास्त खाऊ नये कारण त्यामुळे अॅसिडीटी, अपचन, गॅसेस अशा तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. या काळात तुम्ही योग्य गोष्टीच खायला हव्यात. सुरुवातीचे ६ महिने आपण हे पाळले मात्र नंतर आपले नियंत्रण सुटले आणि आपण मनसोक्त खात सुटलो असे करीना मोकळेपणाने सांगते. त्यावेळी आपण दिवसभरात जवळपास १० पराठे खायचो आणि आता १ खातो असेही करीनाने आपला हा बाळंतपणाचा प्रवास स्पष्ट करताना सांगितले. करीना कपूर आपल्या फिटनेसबाबत, आहाराबाबत, मुलांबाबत कायम काही ना काही गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असते. यावेळीही तिने आपल्या वजन वाढण्याच्या संदर्भातील गोष्टी मुलाखतीत सांगून त्याबाबत महिलांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला आहे.  

 

Web Title: How Kareena Kapoor Gain Weight in First Pregnancy : I gained 20 kg during my first pregnancy! Kareena Kapoor says, How do you talk about weight Gain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.