lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Pregnancy > बाळ हसायला लागलं की आईचे केस गळू लागतात, असं का? तज्ज्ञ सांगतात खरंखुरं कारण आणि उपाय

बाळ हसायला लागलं की आईचे केस गळू लागतात, असं का? तज्ज्ञ सांगतात खरंखुरं कारण आणि उपाय

Hair Loss After Pregnancy: बाळ हसायला लागलं ना, आता आईचे केस गळणारच... असं आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. पण असं का होतं? काय आहे या मागचं नेमकं शास्त्रीय कारण, वाचा तज्ज्ञांचं मत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2023 05:42 PM2023-08-17T17:42:28+5:302023-08-17T17:43:55+5:30

Hair Loss After Pregnancy: बाळ हसायला लागलं ना, आता आईचे केस गळणारच... असं आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. पण असं का होतं? काय आहे या मागचं नेमकं शास्त्रीय कारण, वाचा तज्ज्ञांचं मत..

Hair loss in new moms, Best treatment for postpartum hair loss, Reasons for hair loss after delivery | बाळ हसायला लागलं की आईचे केस गळू लागतात, असं का? तज्ज्ञ सांगतात खरंखुरं कारण आणि उपाय

बाळ हसायला लागलं की आईचे केस गळू लागतात, असं का? तज्ज्ञ सांगतात खरंखुरं कारण आणि उपाय

Highlightsआई झाल्यानंतर जवळपास ९० टक्के महिलांना तरी या अनुभवातून जावंच लागतं. म्हणूनच याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली ही महत्त्वपूर्ण माहिती प्रत्येक आईने एकदा वाचलीच पाहिजे. 

गरोदरपणाच्या काळात बहुतांश गर्भवतींच्या चेहऱ्यावर छान तेज झालेलं असतं. त्वचा सुंदर- तुकतुकीत झालेली असते. तसंच केसांचंही असतं. केसांचं गळणं कमी झालेलं असतं. शिवाय ते भराभर वाढतही असतात. बाळ झाल्यानंतरही २ ते ३ महिने त्वचा, केस चांगले राहतात. पण जसं बाळ ३ ते ४ महिन्यांचं होऊ लागतं, तसंतसं आईचे केस, त्वचा असं सगळंच बिघडू लागतं. याकाळात केस गळती तर खूपच जास्त वाढलेली असते. असं झालं की मग घरातल्या वयस्कर स्त्रियांकडून हमखास एक वाक्य ऐकू येतं.... आणि ते म्हणजे "बाळ आता हसायला लागलं ना, मग आईचे केस गळणारच...", का होतं बरं असं, काय आहे यामागचं खरं कारण? 

 

प्रत्येक आईला हे वाक्य कधी ना कधी ऐकावंच लागलेलं असतं. वयस्कर महिलांचं असं म्हणणं असलं तर आजच्या सुशिक्षित आईला पक्क ठाऊक असतं की बाळाच्या हसण्याचा आणि आईच्या केस गळण्याचा तसा काहीही संबंध नाही. पण मग असं का होतं आणि तसं होऊ नये, म्हणून काय करावं, हे मात्र कळत नाही.

 

 

मुलांना सॅण्डविच खूप आवडतं, मग भरपूर भाज्या घालून करा पोळीचे सॅण्डविच! पोटभरीचा चटकमटक खाऊ

केस गळण्यासोबतच मान- पाठ दुखणे, अशक्तपणा येणे, त्वचा निस्तेज होणे, असेही त्रास होऊ लागतात. आई झाल्यानंतर जवळपास ९० टक्के महिलांना तरी या अनुभवातून जावंच लागतं. म्हणूनच याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली ही महत्त्वपूर्ण माहिती प्रत्येक आईने एकदा वाचलीच पाहिजे. 

 

बाळंपणानंतर केस गळू नयेत म्हणून....
बाळ साधारण ३ महिन्याचे झाले की चेहरे ओळखून हसायला लागतं. तो वेळ आईच्या दृष्टीने असा असतो की त्यादरम्यानच गरोदरपणात घेतलेले आयर्न- कॅल्शियम यांचे तिच्या शरीरातील सप्लिमेंट्स संपत आलेले असतात.

ऐन तारुण्यात गुडघे दुखतात? दररोज फक्त १० मिनिटं करा खास व्यायाम, गुडघे ठणकणं होईल कमी

तसेच या काळात आईचे संपूर्ण लक्ष बाळाकडे असते. त्यामुळे मग स्वतःकडे दूर्लक्ष व्हायला लागते. गरोदरपणात जसं आहाराकडे विशेष लक्ष असतं, तशी काळजी घेतली जात नाही. त्यातच स्तनपानही सुरू असतं. त्यामुळे आईच्या पोषणातला बहुतांश भाग बाळाकडे जातो. म्हणूनच मग शरीरात पोषणमुल्यांची कमतरता निर्माण होते आणि त्याचाच परिणाम म्हणजे केस गळतात, त्वचा कोरडी- निस्तेज होते, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. त्यामुळे बाळंतपणानंतरही आहारात पालेभाज्या, फळे, दूध, तूप सक्तीने खावे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीव्हिटॅमिन्सचा डोस चालू ठेवावा.
- डॉ. ऋचा दाशरथी आचार्य
स्त्रीरोग तज्ज्ञ

 

Web Title: Hair loss in new moms, Best treatment for postpartum hair loss, Reasons for hair loss after delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.