Moringa Supplements Side Effects : शेवगा ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर भाजी आहे. अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, शेवग्याच्या शेंगांची, पानांची आणि फुलांची भाजी खाल्ल्यानं आरोग्यासंबंधी कितीतरी समस्या दूर होतात. त्यामुळे आयुर्वेदातही या भाजीला खूप महत्व आहे. कारण यातून शरीराला अनेक आवश्यक व्हिटामिन्स आणि मिनरल्स मिळतात.
शेवग्यामध्ये भरपूर प्रोटीन, आयर्न, व्हिटामिन सी, व्हिटामिन बी6, बी2, व्हिटामिन ए, मॅग्नेशिअम असे पोषक तत्व असतात. तसेच यात फायबरही भरपूर असतं जे वजन कंट्रोल ठेवतं आणि पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करतं. त्यामुळे भरपूर लोक शेवग्याच्या बाजारात मिळणारे सप्लीमेंटही घेणं सुरू करतात.
डॉक्टर काय सांगतात?
डॉक्टर सुगंधा शर्मा सांगतात की, जे लोक सोशल मीडियावरील जाहिराती बघून शेवग्याचे सप्लीमेंट, कॅप्सूल किंवा पावडर वापरत असतील त्यांनी सावध होण्याची गरज आहे. यात अजिबात दुमत नाही की, शेवग्यामधून भरपूर फायदे मिळतात. पण काही लोकांसाठी शेवगा घातकही ठरू शकतो.
आयुर्वेदात शेवग्याला औषधी मानलं जातं. पण डॉक्टर सांगतात की, शेवग्यानं शरीरातील वात आणि कफ दोष कमी होतो. पण पित्त दोष वाढतो. शेवगा उष्ण आणि तीष्ण असतो.
गर्भपाताचा धोका
डॉ. सुगंधा सांगतात की, गर्भवती महिलांसाठी शेवग्याच्या सप्लीमेंट्स घातक ठरू शकतात. कारण यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो. तसेच यूटेराइन कॉन्ट्रक्शन वाढतं. ज्यामुळे मिसकॅरेज आणि अबॉर्शन धोका राहतो. तसेच स्तनपान करणाऱ्या आणि फॅमिली प्लॅनिंग करणाऱ्या महिलांनी सुद्धा शेवग्याचे सप्लीमेंट्स टाळले पाहिजेत.
कुणी टाळावा शेवगा?
ज्या लोकांना जास्त अॅसिडिक समस्या असते, ज्यांनी ब्लीडिंग पाइल्स असेल, ज्यांना मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होतो, गॅस्ट्रायटिसचे रूग्ण,, गॅस्ट्रिक अल्सरचे रूग्ण यांनी शेवगा खाणं किंवा याचे सप्लीमेंट्स घेणं टाळलं पाहिजे.