Lokmat Sakhi >Health >Pregnancy > अदिती सारंगधरला लागले होते बिअर पिण्याचे डोहाळे; पण गरोदरपणात बिअर प्यावी? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात..

अदिती सारंगधरला लागले होते बिअर पिण्याचे डोहाळे; पण गरोदरपणात बिअर प्यावी? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात..

Aditi Sarangdhar started drinking beer at pregnancy, Is It Ever Ok To Drink a Beer During Pregnancy? : गरोदरपणात बिअर पिण्याची सवय बाळाच्या आरोग्यासाठी फार घातक कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2024 04:47 PM2024-06-11T16:47:16+5:302024-06-11T16:49:19+5:30

Aditi Sarangdhar started drinking beer at pregnancy, Is It Ever Ok To Drink a Beer During Pregnancy? : गरोदरपणात बिअर पिण्याची सवय बाळाच्या आरोग्यासाठी फार घातक कारण..

Aditi Sarangdhar started drinking beer at pregnancy, Is It Ever Ok To Drink a Beer During Pregnancy? | अदिती सारंगधरला लागले होते बिअर पिण्याचे डोहाळे; पण गरोदरपणात बिअर प्यावी? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात..

अदिती सारंगधरला लागले होते बिअर पिण्याचे डोहाळे; पण गरोदरपणात बिअर प्यावी? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात..

भाग्यश्री कांबळे

गरोदरपणात डोहाळे लागतात, पण म्हणजे नेमकं काय होतं? असा प्रश्न साहजिक तुमच्या मनातही आला असेल (Aditi Sarangdhar). स्त्री गरोदर राहिल्यानंतर तिला सर्वात आधी एक प्रश्न विचारला जातो, 'तुला काय खाण्याचे डोहाळे लागले'? काही महिला आंबट पदार्थांची लिस्ट समोर ठेवतात (Pregnancy Care). तर काही तिखट. पण नुकतंच अभिनेत्री अदिती सारंगधरने तिला गरोदरपणात बिअर पिण्याचे डोहाळे लागले असल्याचं ती सांगते. 'आरपार ऑनलाईन' या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलखतीत तिने, प्रेग्नन्सीदरम्यान तिला बिअर पिण्याची (Alcohol) इच्छा होत असल्याचं ती म्हणाली.

पण मग प्रेग्नन्सी काळात बिअर पिणं योग्य मानलं जातं का? याचा दुष्परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो का? या प्रश्नांची उत्तरं स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर सुषमा सुषमा भुतडा यांनी लोकमत सखी. कॉमशी बोलताना सांगितले(Aditi Sarangdhar started drinking beer at pregnancy, Is It Ever Ok To Drink a Beer During Pregnancy?).

अदिती सांगते तिला गरोदरपणात बिअर पिण्याचे डोहाळे लागले होते, ही सवय चांगली की वाईट?

प्रेग्नन्सीमध्ये बिअर पिणं वाईट. याचा थेट दुष्परिणाम गर्भात असलेल्या मुलावर होतो. फक्त बिअरच नसून, कोणत्याही प्रकारचे अल्कोहल घेणं टाळावे. कारण आई जे खाते तेच तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलाला मिळते. नाळेद्वारे मद्य  बाळापर्यंत पोहोचू शकते आणि त्याच्या विकसनशील शरीराला हानी पोहोचवू शकते. लहान बाळ मोठ्यांप्रमाणे मद्यावर प्रक्रिया करू शकत नाही. यामुळे बाळाच्या मेंदूला, वाढीमध्ये अडचण, हृदय, चेहरा किंवा आय.क्यू. लेव्हल कमी होऊ शकतो. शालेय शिक्षण घेण्यात अडचण यासह इतर समस्या निर्माण होऊ शकतात.

सोनाक्षी सिन्हाचं लग्न, लेकीने लग्न ठरवलं पण शत्रुघ्न सिन्हा म्हणाले., 'आजकालची मुलं आई-वडिलांची परवानगी...'

गरोदरपणात बिअर पिण्याची सवयी सुटत नसेल तर काय करावे? यामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम होतो का?

अल्कोहलचे प्रकार प्रेग्नन्सीदरम्यान घेऊ नये. प्रेग्नन्सी आधी, प्रेग्नन्सीदरम्यान आणि स्तनपान करतानाही अल्कोहल घेणं टाळावे. यामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. जर पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला प्रॉब्लेम  आला नसेल तर, पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो. जर आपल्याला अल्कोहलची सवय लागली असेल तर, काउन्सलरकडे जाऊन काउन्सलिंग  घ्या. शिवाय पार्टीमध्ये जाणं टाळा. जेणेकरून अल्कोहल पिण्याची इच्छा आपल्याला होणार नाही.

प्रेग्नन्सीदरम्यान अल्कोहल पिणं महिलांसाठी किती घातक?

रुसलेल्या बायकोचा राग कसा कमी करायचा? ६ गोष्टी करा, बायकोही होईल खुश

अल्कोहल कोणत्याही स्वरुपात घेणं गरोदर महिलेसाठी घातक ठरू शकतं. अल्कोहलमुळे गर्भपात किंवा अकाली प्रसूती होऊ शकते. ज्यामुळे महिलेला शारीरिकदृष्ट्या त्रास होऊ शकतो. शिवाय फीटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसऑर्डरचा धोकाही वाढतो. गर्भधारणेदरम्यान महिलेने केलेले मद्यपान तिच्या न जन्मलेल्या बाळासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे बेबी प्लॅन करण्याआधी हेल्दी जीवनशैली जगण्यास सुरुवात करा. बिअर पिणं टाळा. 

Web Title: Aditi Sarangdhar started drinking beer at pregnancy, Is It Ever Ok To Drink a Beer During Pregnancy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.