Lokmat Sakhi >Social Viral > सोनाक्षी सिन्हाचं लग्न, लेकीने लग्न ठरवलं पण शत्रुघ्न सिन्हा म्हणाले., 'आजकालची मुलं आई-वडिलांची परवानगी...'

सोनाक्षी सिन्हाचं लग्न, लेकीने लग्न ठरवलं पण शत्रुघ्न सिन्हा म्हणाले., 'आजकालची मुलं आई-वडिलांची परवानगी...'

Shatrughan Sinha breaks silence on Sonakshi Sinha's wedding with Zaheer Iqbal : शत्रुघ्न सिन्हा लेकीच्या लग्नाबद्दल नाराज तर नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2024 01:31 PM2024-06-11T13:31:28+5:302024-06-11T13:32:59+5:30

Shatrughan Sinha breaks silence on Sonakshi Sinha's wedding with Zaheer Iqbal : शत्रुघ्न सिन्हा लेकीच्या लग्नाबद्दल नाराज तर नाही?

Shatrughan Sinha breaks silence on Sonakshi Sinha's wedding with Zaheer Iqbal | सोनाक्षी सिन्हाचं लग्न, लेकीने लग्न ठरवलं पण शत्रुघ्न सिन्हा म्हणाले., 'आजकालची मुलं आई-वडिलांची परवानगी...'

सोनाक्षी सिन्हाचं लग्न, लेकीने लग्न ठरवलं पण शत्रुघ्न सिन्हा म्हणाले., 'आजकालची मुलं आई-वडिलांची परवानगी...'

बॉलीवूडची दबंग क्वीन सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. अभिनेता झहीर इक्बालशी (Zaheer Iqbal) २३ जून रोजी लग्नगाठ बांधणार असून, यासंदर्भातली बातमी सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मात्र, सोनाक्षीच्या लग्नाबद्दल खुद्द तिचे वडील ज्येष्ठ अभिनेते व नवनिर्वाचित खासदार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांना माहित नसल्याचं ते सांगतात (Wedding Plans).

त्यामुळे वडील शत्रुघ्न मुलीने घेतलेल्या निर्णयावर नाखुश आहेत का? आयुष्यातला मोठा निर्णय सोनाक्षीने एकटीने घेतला का? असे अनेक प्रश्न सोशल मिडीयावर नेटकरी विचारत आहेत(Shatrughan Sinha breaks silence on Sonakshi Sinha's wedding with Zaheer Iqbal).

रुसलेल्या बायकोचा राग कसा कमी करायचा? ६ गोष्टी करा, बायकोही होईल खुश

सोनाक्षीच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा नाराज?

शत्रुघ्न सिन्हा यांनी 'टाइम्स नाऊ'ला मुलाखत देताना सांगितलं की, 'मी सध्या दिल्लीत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मी येथे आलो. माझं माझ्या मुलीच्या प्लॅन्सबद्दल बोलणं झालेलं नाही. तर तुमचा प्रश्न आहे, ती लग्न करणार आहे का? उत्तर असं आहे की तिने मला याबद्दल काहीही सांगितलेलं नाही.  मी मीडियात जे वाचले तेच मला माहीत आहे.  जेव्हा ती मला आणि माझ्या पत्नीला याबद्दल विश्वासात घेऊन सांगेल, तेव्हा आम्ही जोडप्याला आशीर्वाद देऊ. ती नेहमी आनंदी राहो, याच शुभेच्छा.' असं ते म्हणाले.

'आजकालची मुलं परवानगी घेत नाहीत, फक्त लग्न करत असल्याचं सांगतात.'

केस गळतीमुळे हैराण? खोबरेल तेलात मिसळा '१' खास पावडर; केस होतील घनदाट

शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले, 'आम्हाला आमच्या मुलीच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. ती कधीही चुकीचा निर्णय घेणार नाही. तिला स्वतःचे निर्णय घेण्यास अधिकार आहे. जेव्हा माझ्या मुलीचे लग्न होईल, तेव्हा मला तिच्या लग्नाच्या मिरवणुकीसमोर नाचायला आवडेल. माझ्या जवळचे लोक मला लग्नाबद्दल विचारत आहेत की मला या कथित लग्नाबद्दल का माहीत नाही, आणि मीडियाला याबद्दल माहीत आहे. यावर मी फक्त इतकंच म्हणू शकतो की आजकालची मुलं आई-वडिलांची परवानगी घेत नाहीत, तर त्यांना कळवतात. आम्हीही त्याचीच वाट पाहत आहोत.' असं ते म्हणाले.

Web Title: Shatrughan Sinha breaks silence on Sonakshi Sinha's wedding with Zaheer Iqbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.