lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Pregnancy > उर्मिला निंबाळकर म्हणते बाळांतपणानंतर वाढलेलं वजन, सुटलेलं पोट, ते ही सुंदरच आहे.. कारण..

उर्मिला निंबाळकर म्हणते बाळांतपणानंतर वाढलेलं वजन, सुटलेलं पोट, ते ही सुंदरच आहे.. कारण..

बाळांतपणानंतर तब्येतीत झालेला बदल स्विकारा. डिलेव्हरीनंतर सपाट पोट घेऊन कुणीच कधीच घरी येत नसतं. त्यामुळे आपल्याही बाबतीत तसं होणार नाही, हे वास्तव समजून घ्या, असं सांगतेय  अभिनेत्री उर्मिला निंबाळकर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 05:44 PM2021-08-16T17:44:30+5:302021-08-16T17:45:07+5:30

बाळांतपणानंतर तब्येतीत झालेला बदल स्विकारा. डिलेव्हरीनंतर सपाट पोट घेऊन कुणीच कधीच घरी येत नसतं. त्यामुळे आपल्याही बाबतीत तसं होणार नाही, हे वास्तव समजून घ्या, असं सांगतेय  अभिनेत्री उर्मिला निंबाळकर.

Actress Urmila Nimbalkar says accept the reality and beauty of weight gain after delivery | उर्मिला निंबाळकर म्हणते बाळांतपणानंतर वाढलेलं वजन, सुटलेलं पोट, ते ही सुंदरच आहे.. कारण..

उर्मिला निंबाळकर म्हणते बाळांतपणानंतर वाढलेलं वजन, सुटलेलं पोट, ते ही सुंदरच आहे.. कारण..

Highlightsउर्मिला जे काही लिहिते आहे, सांगण्याचा प्रयत्न करते आहे, ते अगदी आपलंच, आपल्या मनातलंच आहे, असंही नकळतपणे अनेकींना वाटत आहे.

एका नव्या जीवाला या जगात सुखरूपपणे आणण्यासाठी आईचं शरीर अहोरात्र झटत असतं. त्यामुळे शरीरात खूप बदल होतात. काही बदल सुक्ष्म असतात तर काही अगदी स्पष्टपणे जाणवणारे. बाळांतपणानंतर जाणवणारा सगळ्या मोठा बदल म्हणजे सुटलेलं ओटीपोट आणि वाढलेलं वजन. पण हे बाळांतपणाचं वास्तव आहे. काल्पनिक जगात रमण्यापेक्षा या वास्तवाचा स्विकार करा आणि स्वत:वर, तुमच्या शरीरावर  प्रेम करा, असं सांगतेय अभिनेत्री उर्मिला निंबाळकर. 

 

अभिनयात आपली छाप सोडणारी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर तिच्या प्रेगनन्सीनंतर विशेष चर्चेत आली आहे. तिच्या सोशल मिडियावरून तिने शेअर केलेल्या काही पोस्ट अनेकींच्या भावनांना स्पर्शून जाणाऱ्या आहेत. उर्मिला जे काही लिहिते आहे, सांगण्याचा प्रयत्न करते आहे, ते अगदी आपलंच, आपल्या मनातलंच आहे, असंही नकळतपणे अनेकींना वाटत आहे.

 

काही दिवसांपुर्वी उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. सिझर झाल्यानंतर आईलाच जबाबदार धरलं जातं आणि तिच्यावरच प्रश्नांची सरबत्ती केली जाते. जणू सिझर झालंय म्हणजे काहीतरी अपराधच तिच्याहातून घडला आहे, अशा भावनेनं हे प्रश्न विचारले जातात. हा सगळा मानसिक त्रास सहन करणं अनेकींना कठीण असतं. उर्मिलाची ही पोस्ट अनेक लाईक्स मिळवणारी तर ठरली आहेच, पण सिझर झालेल्या अनेक सखींच्या भावना त्यात अगदी स्पष्टपणे जाणवत आहेत. 

https://www.lokmat.com/sakhi/health/pregnancy/c-section-deliverythe-scientific-answers-misconception-around-c-section-delivery-a300/?utm_source=Lokmat.com&utm_medium=InfiniteArticle-Desktop

 

या पोस्टनंतर उर्मिलाने नुकतीच आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये उर्मिलाने बाळांतपणानंतर सुटलेल्या पोटाचे वास्तव मांडले आहे. यामध्ये उर्मिलाने तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचे चांगलेच पोट दिसत आहे. हा फोटो पाहून साहजिकच कुणालाही असंच वाटतं की हा फोटो उर्मिला प्रेगनंन्ट असताना काढलेला आहे. पण असं नसून हा फोटो उर्मिलाच्या डिलेव्हरीनंतर बाराव्या दिवशी काढलेला आहे.

 

एकीकडे बाळांतपणानंतर सुटलेलं आपलं पोट लपविण्यासाठी अनेक अभिनेत्रींची धडपड चाललेली असताना उर्मिलाने सोशल मिडियावर शेअर केलेला हा फोटो खरोखरच कौतूकास्पद आहे. तिच्या धाडसाचे आणि वास्तववादी असण्याचे भरपूर कौतूक नेटकऱ्यांनी केलेले आहे. बाळांतपणानंतर अगदी सहजतेने, सुंदरतेने तिने स्वत:ला स्विकारलं असून हेच म्हणणं मांडण्याचा प्रयत्न तिने या पोस्टद्वारे केला आहे.  सेलिब्रिटींच्या फ्लॅट पोटाचा विचार करून तुमच्या शरीराची अवहेलना करू नका. वास्तव स्विकारा आणि ज्या पोटाने तुमच्या बाळाइतक्या अनमोल गोष्टीची निर्मिती केली आहे, त्याला नावे ठेवू नका, असेही उर्मिला या पोस्टद्वारे सांगते आहे. 

 

Web Title: Actress Urmila Nimbalkar says accept the reality and beauty of weight gain after delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.