lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > पाळीच्या ४ दिवसात सतत व्हजायनल वाॅश वापरता? स्वच्छतेचा अतिरेक की इन्फेक्शनला आमंत्रण?

पाळीच्या ४ दिवसात सतत व्हजायनल वाॅश वापरता? स्वच्छतेचा अतिरेक की इन्फेक्शनला आमंत्रण?

Personal Hygiene : मासिकपाळीच्या दिवसात पर्सनल हायजिनची काळजी घ्यायला हवी पण त्यासाठी व्हजायनल वॉश वापरण्याची गरज असते का?

By manali.bagul | Published: August 25, 2023 04:09 PM2023-08-25T16:09:59+5:302023-08-25T16:21:50+5:30

Personal Hygiene : मासिकपाळीच्या दिवसात पर्सनल हायजिनची काळजी घ्यायला हवी पण त्यासाठी व्हजायनल वॉश वापरण्याची गरज असते का?

Personal Hygiene : Is it good to use vaginal wash every day or in periods | पाळीच्या ४ दिवसात सतत व्हजायनल वाॅश वापरता? स्वच्छतेचा अतिरेक की इन्फेक्शनला आमंत्रण?

पाळीच्या ४ दिवसात सतत व्हजायनल वाॅश वापरता? स्वच्छतेचा अतिरेक की इन्फेक्शनला आमंत्रण?

मनाली बागुल

मासिकपाळीच्या दिवसात बाजारात मिळणारे व्हजायनल वॉश वापरावेत का? कुणी वापरावे?

मासिक पाळीच्या दिवसात नेहमीपेक्षा अधिक स्वच्छेची काळजी घ्यावी लागते. जाहीराती- फोटोंमध्ये योनी स्वच्छ ठेवण्याची उत्पादनं पाहिल्यानंतर अनेकींना वाटतं की आपण तर साबणापलिकडे दुसरं काही लावत नाही. व्हजायनल वॉश नावाची अनेक उत्पादनं बाजारात दिसतात. पण ती वापरावीत का? त्याचा फायदा होतो का, तो नेमका काय? की तोटा होतो? ते सारं कुणी वापरावं? याच प्रश्नांची उत्तरं देत आहेत स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. गौरी कंरदीकर. त्या सांगतात मासिक पाळीच्या काळातले स्वच्छतेचे महत्त्व आणि त्याबाबतची शास्त्रीय माहिती.. (Is it good to use vaginal wash every day or in periods)

डॉ. करंदीकर सांगतात, मासिक पाळीत स्वच्छता कशी ठेवावी?

मासिक पाळीतील स्त्राव कोणत्याही दृष्टीने घाणेरडे नसते. हे स्वच्छ रक्त असते, त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसात मेस्ट्रुअल वॉश वापरण्याची काही आवश्यकता नाही. बाहेर पडणारा स्त्राव हा क्लिअर आणि क्लिन असतो. या दिवसात फक्त पर्सनाल हायजिनची काळजी घ्यावी. वॉशरूमला गेल्यानंतर ती जागा स्वच्छ करायला हवी. नियमित आतले कपडे बदलायला हवेत. पाळीच्या दिवसात किमान ८ ते १० तासांनी पॅड बदलणे आवश्यक आहे. काहीजण ब्लिडींग होत नाही म्हणून किंवा अंगावरून कमी रक्त जात म्हणून २४ तास एकच पॅड ठेवतात ते योग्य नाही. (Is it good to use feminine wash daily)

कारण या पॅडवर जे रक्त जमा होतं त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यावर उपाय म्हणून रियुजेबल पॅड्स, मेस्ट्रुअल कप वापरायला हवेत. याहून जास्त स्वच्छतेनसाठी व्हजायनल वॉश हे पाळीमध्ये वापरण्याची काही आवश्यकता नाही. साबण किंवा फक्त पाण्याने जरी ही जागा स्वच्छ केली तरी हे चालू शकते. लूब्रिकंण्स, जेल हेदेखील गरज नसताना वापरू नयेत. मात्र  इन्फेक्शन असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावे.

व्हजायनल वॉश सर्वांनी का वापरू नये?

आपण जसे चेहऱ्याला मॉईश्चरायजर लावतो, डोक्याला तेल लावतो, त्याचप्रमाणे सरसकट व्हजायनल वॉश वापरू नये. अन्यथा यामुळे त्वचा कोरडी पडू शकते. आपल्याला इन्फेक्शन होऊ नये यासाठी तोंडात, पोटात प्रत्येक ठिकाणी गुड बॅक्टेरियाज असतात. त्याचप्रमाणे योनी मार्गातला पीएच निसर्गाने असा बनवला आहे की त्यातही काही बॅक्टेरियाज असतात.

हे बॅक्टेरिया नॉर्मल असतात जे आपल्याला जंतूसंसर्ग होण्यापासून वाचवतात. याचं संतुलन बिघडल्यास इन्फेक्शन होऊ शकतं. व्हजायनल वॉश वापरल्याने नैसर्गिक बॅक्टेरिया नष्ट होतात. ते वापरणं बंद केल्यानंतर परत इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अशी उत्पादनं वापरावीत अन्यथा वापरु नयेत.

Web Title: Personal Hygiene : Is it good to use vaginal wash every day or in periods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.