lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मी वर्षातून १-२ वेळा पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेते, त्यामुळं वंध्यत्व येईल का? डॉक्टर सांगतात....

मी वर्षातून १-२ वेळा पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेते, त्यामुळं वंध्यत्व येईल का? डॉक्टर सांगतात....

Period Delay Tablets Side Effects : सणावाराला मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी अनेकजणी सर्रास गोळ्या घेतात, मात्र त्याचे तब्येतीवर गंभीर परिणाम होतात.

By manali.bagul | Published: August 22, 2023 09:08 AM2023-08-22T09:08:00+5:302023-08-22T09:10:01+5:30

Period Delay Tablets Side Effects : सणावाराला मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी अनेकजणी सर्रास गोळ्या घेतात, मात्र त्याचे तब्येतीवर गंभीर परिणाम होतात.

Period Delay Tablets Side Effects : Most Common Side Effects of Period Delay Tablets by Dr. Gauri Karandikar | मी वर्षातून १-२ वेळा पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेते, त्यामुळं वंध्यत्व येईल का? डॉक्टर सांगतात....

मी वर्षातून १-२ वेळा पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेते, त्यामुळं वंध्यत्व येईल का? डॉक्टर सांगतात....

मनाली बागुल

सणवार आले किंवा कुठेही प्रवास करायचा असेल तर बायका, मुली लगेच पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेतात. अनेकींना या गोळ्या घेतल्यानंतर पाळी येईपर्यंत पोटदुखीचा त्रास होतो तर काहीजणींना अशा कोणत्याही वेदना जाणवत नसल्याने त्या पाळी लांबवण्याच्या गोळ्या सर्रास घेतात. दर महिन्याला नाही पण वर्षातून एकदा दोनदाच आम्ही या गोळ्या घेतो असं बऱ्याचजणीचं म्हणणं असतं, पण १-२ वेळा तरी या गोळ्या का घ्यायच्या? पाळी आल्यानं असं काय बिघडतं?  याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसुतीरोगतज्ज्ञ डॉक्टर गौरी करंदीकर यांनी अधिक माहिती दिली आहे. (Most Common Side Effects of Period Delay Tablets)

डॉक्टर गौरी करंदीकर सांगतात, ''पाळी ही नैसर्गिक आहे.  त्यावेळी होणारा स्त्राव हा घाणेरडा, अशुद्ध किंवा शरीराच्या विपरीत  नसतो हे क्लिअर असायला हवं.  दुसरं म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्रीला आराम मिळवा आणि हायजीन पाळलं जाईल की  याची खात्री नसल्याने म्हणून या सगळ्या गोष्टींना वितुष्ट असं म्हटलं जायचं. आपली जशी स्क्रीन शेड ऑफ होते, आपल्याला नवीन त्वचा येते म्हणून आपण पूजा करणं बंद करत नाही.

तसंच पाळीच्या दिवसात शरीरातला स्त्राव त्याबरोबर येणारं रक्त आणि आतला स्तर बाहेर येतो. तो महिन्यात एकदाच बाहेर येतो, दररोज येत नाही. म्हणूनच ४ दिवस पाळीचे धरले जातात. यातून प्रत्येक व्यक्ती जन्माला येतो म्हणून हा स्त्राव शुद्ध असायला हवा. मेस्ट्रअल ब्लड हे शुद्ध असते आपल्या शरीरात जर कोणतेही इन्फेक्शन असेल तरच या स्त्रावामध्ये इन्फेक्शन असू शकतं.'' 

वारंवार या गोळ्या घेतल्याचा काय परिणाम होतो?

आपल्या शरीरात जी नैसर्गिक सायकल सुरू आहे, १५ दिवसांनी बीज तयार होणं १५ दिवसांनी पाळी येणं हा निसर्गाचा रिदम आपण ही गोळी घेणं म्हणजे हा रिदम बदलल्याने शरीराचं नुकसान होतं. हे निसर्गाच्या विरुद्ध आहे. गोळ्या घेण्यापेक्षा महिलांनी हायजिन इम्प्रुव्ह करायला हवं. खोकला झाला म्हणून आपण पूजा करणं बंद करत नाही, हा तर इन्फेक्टेड आणि अब्नॉर्मल स्त्राव असतो. याऊलट मासिक पाळीत हेल्दी स्त्राव होत असतो. 

वारंवार या गोळ्या घेतल्याने पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या येतात, डोकेदुखी होते, प्रेग्नंसी माहित नसताना चुकून या गोळ्या घेतल्यानं गर्भावर परिणाम होऊ शकतो. तुम्ही कोणत्या गोळ्या घेता यावरही ते अवलंबून असते. अनेकदा  डॉक्टरांना न विचारता मेडिकलमधून ओव्हर द काऊंटर या गोळ्या घेतल्या जातात. याचे दुष्परिणाम बऱ्याच महिलांमध्ये जाणवतात हे अनैसर्गिक आहे. मासिक पाळी टाळण्याच्या गोळ्या घेण्यापेक्षा स्वच्छता मेंटेन ठेवायला हवी.

Web Title: Period Delay Tablets Side Effects : Most Common Side Effects of Period Delay Tablets by Dr. Gauri Karandikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.