Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > PCOD & PCOS: PCOS मध्ये फर्टिलिटीवर तर PCOD मध्ये पिरिएड्सवर 'असा' होतो परिणाम; जाणून घ्या लक्षणं अन् फरक

PCOD & PCOS: PCOS मध्ये फर्टिलिटीवर तर PCOD मध्ये पिरिएड्सवर 'असा' होतो परिणाम; जाणून घ्या लक्षणं अन् फरक

PCOD & PCOS PCOD आणि PCOS यापैकी कोणताही आजार उद्भवल्यास यातील फरक आणि त्यामुळे होणारा परिणाम लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे.  :

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 12:26 PM2021-07-15T12:26:54+5:302023-09-21T15:43:41+5:30

PCOD & PCOS PCOD आणि PCOS यापैकी कोणताही आजार उद्भवल्यास यातील फरक आणि त्यामुळे होणारा परिणाम लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे.  :

PCOD & PCOS : What is difference between pcos or pcod and know which is more dangerous for women | PCOD & PCOS: PCOS मध्ये फर्टिलिटीवर तर PCOD मध्ये पिरिएड्सवर 'असा' होतो परिणाम; जाणून घ्या लक्षणं अन् फरक

PCOD & PCOS: PCOS मध्ये फर्टिलिटीवर तर PCOD मध्ये पिरिएड्सवर 'असा' होतो परिणाम; जाणून घ्या लक्षणं अन् फरक

Highlightsपीसीओएस आणि पीसीओडी दोन्ही आजार आहेत ज्यात आमची अंडाशय आणि हार्मोन्सचा समावेश आहे, परंतु त्यात काही फरक आहेत.जगभरातील जवळपास एक तृतीयांश महिला PCOD नं पीड़ित आहेत. म्हणजेच  ही सामान्य समस्या आहे. PCOS ही अशी समस्या आहे जी पीसीओडीनं पीडित महिलांच्या तुलनेत या आजाराची कमी प्रकरणं पाहायला मिळतात.

महिलांना ज्या आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो त्यात पॉलीसिस्टिक ओवेरियन डिजीज (PCOD) आणि पॉलीसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम  (PCOS) यांचा समावेश आहे. हे दोन्ही आजार अंडाशय आणि हार्मोनल फंक्शनशी निगडीत कॉमन समस्यांसंदर्भातील आहेत. PCOD आणि PCOS यापैकी कोणताही आजार उद्भवल्यास यातील फरक आणि त्यामुळे होणारा परिणाम लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे.  महिलांमध्ये अंडाशय दर महिन्याला एग्स आणि हार्मोन्स रिलीज करते. ज्यामुळे फर्टिलिटी, मासिक धर्म आणि फेशियल हेअर्स नियंत्रणात ठेवता येतात. 

PCOD काय आहे? 

पीसीओडी एक स्थिती आहे ज्यात अंडाशय (ovaries) वेळेआधीच एग्स रिलिज करतात. वेळेनुसार त्याचे सिस्ट (cysts) मध्ये रुपांतर होते. परिणामी महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होते. वजन वाढणं, केस गळणं, पोटदुखी अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय गर्भाशयाचा आकारही वाढत जातो आणि शरीरात हाय लेव्हल मेल हार्मोन (एंड्रोजन) रिलीज होत जाते. या स्थितीसाठी अनहेल्दी लाइफस्टाइल जसं की जंक फूडचे अतिसेवन आणि लठ्ठ्पणा कारणीभूत ठरतो. 

PCOS  काय आहे?

पीसीओएस अंतःस्रावी तंत्र (endocrine system) का एक मेटाबोलिक विकार (metabolic disorder) आहे. या स्थितीत अधिक प्रमाणात पुरूष हार्मोन रिलीज होतात. त्यामुळे ओव्युलेशन अनियमित होते. या स्थितीमुळे अंडाशयात खूप  सिस्ट तयार होतात.  ही स्थितीत पीसीओडी पेक्षा जास्त गंभीर आणि धोकादायक आहे. अशा स्थितीत वजन वेगानं वाढण्याची शक्यता असते. 

या दोघांमधील फरक


PCOD मध्ये निर्माण होत असलेल्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करू शकता.  त्यासाठी हेल्दी आहार आणि व्यायामाचा  दिनचर्येत समावेश असायला हवा. PCOS मध्ये डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर उपचारांची आवश्यकता असते. कारण  हा  एक मेटाबोलिक डिसॉर्डर आहे. 

जगभरातील जवळपास एक तृतीयांश महिला PCOD नं पीड़ित आहेत. म्हणजेच  ही सामान्य समस्या आहे. PCOS ही अशी समस्या आहे जी पीसीओडीनं पीडित महिलांच्या तुलनेत या आजाराची कमी प्रकरणं पाहायला मिळतात. पीसीओएस एक अंतस्त्रावी तंत्र विकार आहे. पीसीडीओडी एक शारीरिक स्थिती आहे. जी हार्मोनल असंतुलनामुळे उद्भवते. 

गर्भावस्था आणि आरोग्यासंबंधी समस्या

पीसीओडी हा गंभीर आजार नाही. त्यामुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर  कोणताही प्रभाव होत नाही. पीसीओडीनं पीडित असलेल्या महिला साधारणपणे फर्टाईल असतात आणि त्यांना गरोदरपणात वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. दुसरीकडे पीसीओएस मध्ये महिलांसाठी प्रेग्नंसीबाबत खूप मोठे आव्हान असते. 

PCOS नं पीड़ित महिलांना हार्मोनल इंम्बॅलेंसमुळे मासिक पाळी अनियमित असण्याच्या त्रासाचा सामना करावा लागतो. कारण त्यांच्या ओव्हरीज अंडी तयार करण्यास सक्षम नसतात. अशा स्थितीत अनेकदा महिलांना गर्भपाताच्या जोखिमेचा सामना करावा लागतो. 

बचावाचे उपाय

पीसीओएस आणि पीसीओडी दोन्ही आजार आहेत ज्यात आमची अंडाशय आणि हार्मोन्सचा समावेश आहे, परंतु त्यात काही फरक आहेत. पीसीओएस पीसीओडीपेक्षा अधिक गंभीर असले तरी वेळेत आढळल्यास दोघांवरही उपचार करता येतात. निरोगी आहार आणि फिटनेस सिस्टमचे अनुसरण केल्यामुळे पीसीओएस आणि पीसीओडीमुळे होणारी हार्मोनल असंतुलन सुधारण्यास मदत होते. जर आपल्याला ही लक्षणे जाणवत असतील तर आपण डॉक्टरकडे जावे जेणेकरून समस्येचे वेळेत निवारण होऊ शकेल.

Web Title: PCOD & PCOS : What is difference between pcos or pcod and know which is more dangerous for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.