Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > Menstrual Health: पाळीच्या दिवसात केसांवरून आंघोळ करावी की नाही? डॉक्टरांनी सांगितले 'हे' शास्त्रीय कारण!

Menstrual Health: पाळीच्या दिवसात केसांवरून आंघोळ करावी की नाही? डॉक्टरांनी सांगितले 'हे' शास्त्रीय कारण!

Menstrual Health: मासिक पाळी सुरु असताना केसावरुन आंघोळ करू नये असे आपली आई आजी सांगत असे, त्याला शास्त्राधार आहे का ते डॉक्टरांकडून जाणून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 15:47 IST2026-04-02T15:44:41+5:302026-04-02T15:47:57+5:30

Menstrual Health: मासिक पाळी सुरु असताना केसावरुन आंघोळ करू नये असे आपली आई आजी सांगत असे, त्याला शास्त्राधार आहे का ते डॉक्टरांकडून जाणून घेऊ.

Menstrual Health: Should you bathe your hair during your period or not? Doctors said 'this' is the scientific reason! | Menstrual Health: पाळीच्या दिवसात केसांवरून आंघोळ करावी की नाही? डॉक्टरांनी सांगितले 'हे' शास्त्रीय कारण!

Menstrual Health: पाळीच्या दिवसात केसांवरून आंघोळ करावी की नाही? डॉक्टरांनी सांगितले 'हे' शास्त्रीय कारण!

मासिक पाळी (Periods) आणि त्यासंबंधित अनेक नियम आपण परंपरेने ऐकत आलो आहोत. यातलाच एक महत्त्वाचा आणि नेहमी चर्चिला जाणारा प्रश्न म्हणजे— "पाळीच्या दिवसात केसांवरून आंघोळ करावी की नाही?"

काही जण याला अंधश्रद्धा मानतात, तर काही जण यामागे वैज्ञानिक कारण असल्याचे सांगतात. तज्ज्ञ डॉ. मानसी मेहेंदळे यांनी या विषयावर मांडलेले नेमके मत आणि त्यामागचे शास्त्र आपण आज जाणून घेणार आहोत.

पाळी आणि केसावरुन न्हाण्याचा परस्पर संबंध: 

मासिक पाळीच्या काळात शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. या प्रक्रियेत शरीराच्या तापमानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

तापमान आणि प्रवाह: पाळी सुरू असताना शरीराचे तापमान नैसर्गिकरित्या थोडे वाढलेले असते. हे वाढलेले तापमान गर्भाशयातील स्त्राव (Blood flow) खालच्या दिशेने सुरळीत वाहण्यासाठी मदत करते.

केसांवरून आंघोळीचा परिणाम: जेव्हा आपण केसांवरून आंघोळ करतो, तेव्हा शरीराचे तापमान अचानक कमी होते. विज्ञानानुसार, तापमानातील हा बदल रक्ताभिसरणावर आणि पर्यायाने पाळीच्या प्रवाहावर परिणाम करू शकतो.

तज्ज्ञांच्या मते 'केसांवरून आंघोळ' कधी करावी?

डॉ. मानसी मेहेंदळे यांच्या मते, केसांवरून आंघोळ करण्याचे टायमिंग पाळीच्या चक्रावर अवलंबून असते:

१. पाळी वेळेत येण्यासाठी (Before Periods)

अनेकदा पाळी पुढे जाण्याची किंवा वेळेत न येण्याची समस्या असते. अशा वेळी पाळी येण्यापूर्वी केसांवरून आंघोळ केल्यास शरीराचे तापमान कमी होते, ज्यामुळे शरीराला पाळी सुरू होण्याचे संकेत मिळतात आणि स्त्राव वेळेत सुरू होण्यास मदत होते.

२. पाळीच्या दरम्यान (During Periods)

पाळीच्या पहिल्या दोन-तीन दिवसांत शरीराला उष्णतेची गरज असते जेणेकरून गर्भाशय पूर्णपणे स्वच्छ होईल. या दिवसांत केसांवरून आंघोळ केल्यास तापमान कमी होऊन प्रवाह मध्येच खंडित होऊ शकतो किंवा पोटदुखी वाढू शकते. म्हणूनच, या काळात फक्त अंगावरून आंघोळ करणे हिताचे मानले जाते.

३. स्त्राव थांबवण्यासाठी (On 4th Day)

आपल्या संस्कृतीत पाळीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी केसांवरून आंघोळ करण्याची पद्धत आहे. यामागे शास्त्रीय कारण असे की, केसांवरून आंघोळ केल्याने शरीराचे तापमान कमी होते आणि तोपर्यंत पूर्ण झालेला स्त्राव नैसर्गिकरित्या थांबण्यास मदत होते. सोबत दिलेला व्हिडीओ पाहा -


Web Title : मासिक धर्म: पीरियड्स में बालों को धोना? वैज्ञानिक कारण बताए!

Web Summary : पीरियड्स के दौरान बाल धोने से शरीर का तापमान और रक्त प्रवाह प्रभावित होता है। विशेषज्ञ मासिक धर्म चक्र के चरणों के आधार पर बाल धोने का समय निर्धारित करने की सलाह देते हैं: प्रवाह और परेशानी को प्रबंधित करने के लिए पहले, दौरान और बाद में।

Web Title : Menstrual Health: Hair Wash During Periods? Scientific Reasons Explained!

Web Summary : Washing hair during periods affects body temperature and blood flow. Experts advise timing hair washes based on menstrual cycle stages: before, during, and after, to manage flow and discomfort.