Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > सावधान! पिरिएड्सच्या दिवसात नकळतपणे उद्भवू शकतात हे ५ गंभीर आजार; वाचा लक्षणांसह उपाय

सावधान! पिरिएड्सच्या दिवसात नकळतपणे उद्भवू शकतात हे ५ गंभीर आजार; वाचा लक्षणांसह उपाय

Menstrual cycle : मासिक पाळीत हार्मोन्समध्ये होणारे बदल हे PMS चे कारण मानले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 11:35 AM2021-06-22T11:35:50+5:302021-06-22T12:40:42+5:30

Menstrual cycle : मासिक पाळीत हार्मोन्समध्ये होणारे बदल हे PMS चे कारण मानले जाते.

Menstrual cycle : 5 serious illnesses that can occur in Menstrual cycle | सावधान! पिरिएड्सच्या दिवसात नकळतपणे उद्भवू शकतात हे ५ गंभीर आजार; वाचा लक्षणांसह उपाय

सावधान! पिरिएड्सच्या दिवसात नकळतपणे उद्भवू शकतात हे ५ गंभीर आजार; वाचा लक्षणांसह उपाय

Highlightsअतिघाम, अचानक थंडी भरून येणे, अतिकाळजी वा औदासिन्य, झोपेच्या तक्रारी, योनीत जाणवणारा कोरडेपणा व संभोगातील तक्रारी, वारंवार लघवी होणे, वजन वाढणे.सर्व स्त्रियांच्या आयुष्यात स्वाभाविकपणे येणारा हा काळ आहे. चाळीशीच्या मध्यावर वा पन्नाशीच्या उंबरठ्यावर हा त्रास चालू होऊ शकतो.

डॉ. देविका गद्रे

प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला अविभाज्य भाग म्हणजे मासिक पाळी. वयात येताना मिळालेली ही नवीन मैत्रीण अगदी वयाच्या पन्नाशीपर्यंत मैत्री निभावते. इतकी घट्ट मैत्री असताना त्यावर दिलखुलास बोलताही आलं पाहिजे. आपल्या मैत्रिणीला कसं जपायचं आणि हा काळ आनंदात कसं घालवायचा हे सुद्धा शिकायला पाहिजे. आज आपण बघूया की पाळीमध्ये कोणते आजार होऊ शकतात? 

१) Premenstrual Syndrome (PMS) : म्हणजेच मासिक पाळीआधी स्त्रियांनी अनुभवलेली शारीरिक व मानसिक लक्षणे. अगदी सोप्या भाषेत बोलायचं झालं तर mood swings. मासिक पाळीत हार्मोन्समध्ये होणारे बदल हे PMS चे कारण मानले जाते.

कोणती लक्षणे आढळतात?

सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिक स्थितीमध्ये घडणारे बदल. अचानक वाटणारी काळजी, चिंता किंवा अचानक येणारे औदासिन्य, अस्वस्थता, चिडचिड, लक्ष केंद्रित न होणे, गोंधळ.

शारीरिक लक्षणे: स्तनांचे दुखणे, अतिसार, बद्धकोष्ठता, पोटात जडपणाची भावना येणं, त्वचेमध्ये घडणारे बदल जसे की मुरूम येणे, डोकेदुखी, कमी भूक लागणे, अती घाम येणे इत्यादी. उपचारांमद्धे योग्य आहार, चांगली जीवनशैली, मुबलक व्यायाम व योगासने, तणावमुक्त जगणे ह्यांचा समावेश होतो.

२) Amenorrhea: म्हणजेच ३ किंवा अधिक महिन्यांसाठी मासिक पाळी न येणे. यात दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात मुलगी वयात आली तरीही पाळी सुरु होत नाही. तर दुसरा प्रकार म्हणजे सुरुवातीला योग्य प्रकारे पाळी चालू होऊन नंतर ती मधून मधून येते व पूर्णपणे थांबते. 
Amenorrhea होण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की जन्मजात आजार, लठ्ठपणा, थायरॉईड इत्यादी.

कोणती लक्षणे आढळतात?

अतिप्रमाणात वजन वाढणे वा कमी होणे, स्तनांचा बदलत जाणारा आकार, चेहऱ्यावर येणारे मुरूम, केस गळणे, तोंडावर वा मानेखाली केस येणे, डोकेदुखी याप्रकारची लक्षणे दिसून येतात.

उपाय 

सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे वजन योग्य प्रमाणात ठेवणे, मानसिक ताण कमी करण्यासाठी योग्य ते उपचार घेणे, जर तुम्ही खेळाडू असाल तर खाण्याच्या आणि व्यायामाच्या योग्य सवयी आत्मसात करणे. वैद्यकीय उपायांमध्ये Estrogen Replacement Therapy हा पर्याय डॉक्टरांच्या सल्ल्याने आजमावता येऊ शकतो.  

३) Dysmenorrhea: म्हणजेच पाळी सुरु असताना पोटात cramp येणे व दुखणे. हे cramps नेहमीसारखे नसून अतिशय जोरात कळा मारल्यासारखे येतात. ह्यालाही अनेक कारणे असू शकतात. जसे की संप्रेरकांच्या बदलत्या पातळीमुळे गर्भाशयाचे आकुंचन होणे तसेच ह्यासाठी endometriosis सारखे आजारही कारणीभूत ठरू शकतात.

 लक्षणे कशी ओळखावीत?

डिस्मेनोरियाचे मुख्य लक्षण म्हणजे खालच्या ओटीपोटात वेदना होतात. ह्या सहसा पोटाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला जाणवतात व मांडीच्या भागापर्यंत पसरतात. पोटात cramp येणे, पाठदुखी, पायदुखी, खाण्यावरची इच्छा जाणे, मळमळ, पोट खराब होणे, थकवा, चक्कर येणे व डोकेदुखी ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात.
ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई, जस्त आणि थायमिन (व्हिटॅमिन B12) ही पोषक तत्त्वे डिस्मेनोरियाच्या उपचारांसाठी योग्य मानली जातात.

४) Endometriosis: Endometrium म्हणजे गर्भाशयातील सर्वात आतील आवरण. या आवरणातील पेशी जेंव्हा गर्भाशयाव्यतिरिक्त अंडाशय, अंडनलिका वा इतर भागांमद्धे वाढू लागतात तेंव्हा Endometriosis ची लक्षणे दिसून येतात. ह्याची लक्षणे एन्डोमेट्रिअल पेशी कुठल्या भागात वाढतयत त्यावर अवलंबून असतात.

लक्षणे: पाळीदरम्यान पोटात वेदना, संभोगादरम्यान वेदना, अतिरक्तस्राव, शौचास त्रास, वंधत्व, पाठदुखी व थकवा इत्यादी. निदानासाठी पेल्विक अल्ट्रासाउंडचा वापर केला जातो. ह्यात जर पेल्विक अवयवांमद्धे ह्या पेशी वाढत असतील तर त्याची माहिती मिळते. उपचारासाठी वेदनाशामक औषधे व Hormone Therapy चा वापर होतो.

५) Perimenopause: म्हणजे रजोनिवृत्तीच्या आधीच काळ. हा काही आजार नाही. सर्व स्त्रियांच्या आयुष्यात स्वाभाविकपणे येणारा हा काळ आहे. चाळीशीच्या मध्यावर वा पन्नाशीच्या उंबरठ्यावर हा त्रास चालू होऊ शकतो. काही स्त्रियांना काही महिन्यांसाठी तर काहींना ४ ते ५ वर्षेसुद्धा हा त्रास जाणवू शकतो. मासिक पाळी अनियमित होणे, नेहमीपेक्षा जास्त रक्तस्राव होणे अशी लक्षणे दिसून येतात. ज्या स्त्रियांना गर्भधारणा झाली नाही वा ज्या स्त्रीची मासिक पाळी लवकर सुरु झाली अश्यांना Perimenopause ची लक्षणे लवकर दिसू शकतात.

ह्यात आपल्या संप्रेरकांचं काय काम असतं?

चाळीशीच्या उंबरठयावर स्त्रियांच्या अंडाशयातील अंड्यांचं प्रमाण झपाट्याने घटत जाते. इस्ट्रोजेन या संप्रेरकाचे प्रमाणसुद्धा घटते आणि म्हणूनच रजोनिवृत्ती येते. प्रोजेस्टेरॉनचे प्रमाणही कमी होते आणि म्हणूनच Perimenopause च्या काळात अनियमित व अतिरक्तस्राव होऊ लागतो. 

Perimenopause ची लक्षणे:

अतिघाम, अचानक थंडी भरून येणे, अतिकाळजी वा औदासिन्य, झोपेच्या तक्रारी, योनीत जाणवणारा कोरडेपणा व संभोगातील तक्रारी, वारंवार लघवी होणे, वजन वाढणे. कमी व्यायाम, खाण्याच्या चुकीच्या सवयी, कमी जागरूकता, अपुरी झोप इत्यादी कारणांमुळे चाळीशीमद्धे स्त्रियांचे वजन वाढण्याचे प्रमाण अधिक असते. Perimenopause साठी डॉक्टरांच्या व स्त्रीरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने hormone therapy सारखे उपचार करता येऊ शकतात. पाळीच्या समस्यांमध्ये रजोनिवृत्तीचा काळ व PCOS म्हणजे Polycystic Ovarian Syndrome ह्या दोन सामान्य तक्रारी आहेत. त्याबद्दल येणाऱ्या काही लेखांमद्धे माहिती घेऊ.

(लेखिका फिजिओथेरपिस्ट आहेत. फिजिओमंत्र, विलेपार्ले, मुंबई)
devikagadre99@gmail.com

Web Title: Menstrual cycle : 5 serious illnesses that can occur in Menstrual cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.