Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > कर्नाटक सरकार शाळकरी मुलींना मोफत मेन्स्ट्रुअल कप देणार, सॅनिटरी पॅडपेक्षा कप वापरा असं सरकार का सांगतंय..?

कर्नाटक सरकार शाळकरी मुलींना मोफत मेन्स्ट्रुअल कप देणार, सॅनिटरी पॅडपेक्षा कप वापरा असं सरकार का सांगतंय..?

Karnataka government will provide free menstrual cups to girls, why is the government saying to use cups instead of sanitary pads? : कर्नाटक सरकार वाटणार मुलींना मेंस्ट्रुअल कप. नक्की योजना काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2026 14:01 IST2026-01-22T13:59:21+5:302026-01-22T14:01:50+5:30

Karnataka government will provide free menstrual cups to girls, why is the government saying to use cups instead of sanitary pads? : कर्नाटक सरकार वाटणार मुलींना मेंस्ट्रुअल कप. नक्की योजना काय ?

Karnataka government will provide free menstrual cups to girls, why is the government saying to use cups instead of sanitary pads..? | कर्नाटक सरकार शाळकरी मुलींना मोफत मेन्स्ट्रुअल कप देणार, सॅनिटरी पॅडपेक्षा कप वापरा असं सरकार का सांगतंय..?

कर्नाटक सरकार शाळकरी मुलींना मोफत मेन्स्ट्रुअल कप देणार, सॅनिटरी पॅडपेक्षा कप वापरा असं सरकार का सांगतंय..?

काही वर्षांपूर्वी शाळांमध्ये वैद्यकीय कर्मचारी मासिक पाळीबद्दल माहिती देण्यासाठी जायचे तेव्हा फक्त मुलींसाठी वेगळे खास तास आखले जायचे. हळूहळू मुलांनाही या गोष्टींबद्दल माहिती देणे गरजेचे आहे असे म्हणून कर्मचाऱ्यांनी सगळ्यांना एकत्रित ही माहिती द्यायला सुरवात केली. सॅनिटरी पॅड वापरण्याची पद्धत आणि त्याची गरज मुलींना समजावली जायची.  (Karnataka government will provide free menstrual cups to girls, why is the government saying to use cups instead of sanitary pads..?)आजही भारतात अनेक ठिकाणी फडकं वापरण्याची पद्धत आहे. पण आजकाल जमाना सॅनिटरी पॅडच्याही पुढे गेला आहे. सॅनिटरी प्रॉडक्ट्समध्ये विविध प्रकार आता सहज मिळतात. 

विविध प्रकारचे पॅड्स, टॅम्पॅन, मेंस्ट्रुअल कप इतरही काही प्रॉडक्ट्स मिळतात. त्याबद्दल फार जागरुकता अजून झालेली नाही. मात्र मोठ्या शहरांमध्ये आजकाल टॅम्पॉन आणि मेंस्ट्रुअल कप वापरणारे अनेक आहेत. या प्रॉडक्ट्सबद्दल बरेच गैरसमजही आहेत. त्याबद्दल माहिती देण्याचे काम विविध मार्गांनी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांबाबत माहितीचा अभाव, गैरसमज आणि सामाजिक संकोच आजही अनेक ठिकाणी दिसून येतो. योग्य सॅनिटरी प्रॉडक्टचा वापर हा केवळ स्वच्छतेचा प्रश्न नसून तो महिलांच्या आरोग्याशी, आत्मविश्वासाशी आणि पर्यावरणाशी थेट जोडलेला आहे.

याच पार्श्वभूमीवर 7 जानेवारी रोजी कर्नाटक सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारी योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत राज्यातील दहा लाखांहून अधिक विद्यार्थिनींना मोफत मेनस्ट्रुअल कप्स दिले जाणार आहेत. डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड्सऐवजी पुनर्वापर करता येणाऱ्या कप्सचा वापर वाढावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

मेनस्ट्रुअल कप हा दीर्घकाळ वापरता येणारा सॅनिटरी पर्याय आहे. योग्य स्वच्छता राखली तर एकच कप अधिक वेळा वापरता येतो. त्यामुळे वारंवार पॅड खरेदी करण्याची गरज पडत नाही. याचा थेट फायदा म्हणजे सरकारचा खर्च कमी होईल अंदाजानुसार या योजनेमुळे कर्नाटक सरकारला दरवर्षी कोट्यवधी रुपयांची बचत होणार असून सुमारे १६ कोटी रुपयांचा खर्च वाचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

यासोबतच पर्यावरणाच्या दृष्टीनेही ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरु शकते. सॅनिटरी पॅड्समध्ये प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो आणि वापरानंतर हे पॅड्स कचऱ्यात जातात. लाखो पॅड्स लँडफिलमध्ये साचून पर्यावरणावर मोठा ताण येतो. मेनस्ट्रुअल कप्सचा वापर वाढल्यास हा कचरा मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो, ही या योजनेची आणखी एक जमेची बाजू आहे. हे कप कसे वापरावे याबद्दल मुलींना शिकवले आणि काळजी घ्यायचे महत्व समजवले तर त्यांना त्याचा फायदाच होईल असे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे. 

Web Title : कर्नाटक सरकार स्कूली छात्राओं को मुफ्त में मासिक धर्म कप देगी।

Web Summary : कर्नाटक सरकार स्कूली छात्राओं को मुफ्त में मासिक धर्म कप देगी। इससे लागत कम होगी, सैनिटरी पैड से कचरा कम होगा और पर्यावरण को मदद मिलेगी।

Web Title : Karnataka Govt to Provide Free Menstrual Cups to School Girls.

Web Summary : Karnataka government will provide free menstrual cups to school girls. This will reduce costs, reduce waste from sanitary pads, and help the environment.