Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मासिक पाळीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी केस धुवावे की नाही? जाणून घ्या सत्य...

मासिक पाळीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी केस धुवावे की नाही? जाणून घ्या सत्य...

Hair Care During Periods: आधी घरातील वयस्क महिला मासिक पाळीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी केस धुण्यास मनाई करत होत्या. यामागे त्यांचं असं मत होतं की, असं केल्यानं आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो किंवा शरीर कमजोर होतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 14:16 IST2025-04-29T14:15:34+5:302025-04-29T14:16:20+5:30

Hair Care During Periods: आधी घरातील वयस्क महिला मासिक पाळीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी केस धुण्यास मनाई करत होत्या. यामागे त्यांचं असं मत होतं की, असं केल्यानं आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो किंवा शरीर कमजोर होतं.

Hair Care During Periods: Can you wash your hair on your first, second and third day? Know the fact | मासिक पाळीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी केस धुवावे की नाही? जाणून घ्या सत्य...

मासिक पाळीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी केस धुवावे की नाही? जाणून घ्या सत्य...

Hair Care During Periods:  खूप आधीपासून मासिक पाळीसाठी वेगवेगळे नियम बनवण्यात आले आहेत. हे नियम बदलत्या काळानुसार महिलांच्या गरजा आणि आरोग्यानुसार ठरवण्यात आले आहेत. मात्र, बदलत्या काळानुसार आजकालच्या महिला या नियमांवर फार काही विश्वास ठेवत नाही म्हणा किंवा त्यांना तसं करावसं वाटत नाही म्हणा. आधी घरातील वयस्क महिला मासिक पाळीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी केस धुण्यास मनाई करत होत्या. यामागे त्यांचं असं मत होतं की, असं केल्यानं आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो किंवा शरीर कमजोर होतं. पण खरंच यात काही तथ्य आहे की केवळ गैरसमज आहे? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. 

वेगवेगळ्या घरांमध्ये मासिक पाळीदरम्यान केस धुण्यासंबंधी वेगवेगळे नियम आहेत. तरूणी आणि महिलांना मासिक पाळीच्या पहिल्या तीन दिवसात केस धुण्याचा सल्ला दिला जातो. यामागे काही वैज्ञानिक कारण नाहीये. पण जुन्या काळात ठरवलेले काही नियम आहेत.

- मासिक पाळीदरम्यान रक्तस्त्रावामुळे शरीर कमजोर होतं आणि केस धुतल्यानंतर शरीरात अधिक थकवा जाणवण्याचा धोका असतो. 

- केस भिजल्यामुळे सर्दी आणि ताप येण्याचा धोकाही वाढू शकतो. ज्यामुळे शरीरात इतरही अनेक समस्या वाढू शकतात.

- केसांवर अचानक भरपूर पाणी टाकल्यानं शरीरातील ब्लड फ्लो वर सुद्धा प्रभाव पडू शकतो.

मासिक पाळीदरम्यान शरीरात होणारे बदल

मासिक पाळीदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, मूड स्विंग्स, कमजोरी, थकवा जाणवतो. शरीर थोडं संवेदनशील होतं. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही आंघोळ करणं किंवा केस धुणं सोडलं पाहिजे. उलट या दिवसांमध्ये स्वच्छतेची अधिक काळजी घ्यावी लागते. जेणेकरून इन्फेक्शनपासून बचाव व्हावा.

मासिक पाळीदरम्यान केस धुण्याबाबत वैज्ञानिक सल्ला

मासिक पाळीदरम्यान केस धुणं एकदम सेफ आहे. असं केल्यास काहीच नुकसान होणार नाही. उलट आंघोळ केल्यावर तुम्हाला चांगलं वाटेल आणि मूडही चांगला राहील. कोमट पाण्यानं आंघोळ केल्यास स्नायूंना आराम मिळेल. स्वच्छता असेल तर बॅक्टेरिया आणि इन्फेक्शनपासून बचावही होईल.

Web Title: Hair Care During Periods: Can you wash your hair on your first, second and third day? Know the fact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.