Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मुलांना सतत ॲण्टिबायोटिक औषधं देणं घातक, रिसर्चचा दावा मुलींना लहान वयात येतेय पाळी कारण..

मुलांना सतत ॲण्टिबायोटिक औषधं देणं घातक, रिसर्चचा दावा मुलींना लहान वयात येतेय पाळी कारण..

Antibiotic Side Effects On Girls: जर बालपणी मुलींना अ‍ॅंटी-बायोटिक अधिक दिले गेले तर त्यांना मासिक पाळी वेळीआधीच येण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे मुलींना अजिबात अ‍ॅंटी-बायोटिक देऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 16:59 IST2025-05-15T13:02:12+5:302025-05-15T16:59:02+5:30

Antibiotic Side Effects On Girls: जर बालपणी मुलींना अ‍ॅंटी-बायोटिक अधिक दिले गेले तर त्यांना मासिक पाळी वेळीआधीच येण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे मुलींना अजिबात अ‍ॅंटी-बायोटिक देऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. 

Giving Antibiotics to children it can lead early periods in girls long term negative effects says research | मुलांना सतत ॲण्टिबायोटिक औषधं देणं घातक, रिसर्चचा दावा मुलींना लहान वयात येतेय पाळी कारण..

मुलांना सतत ॲण्टिबायोटिक औषधं देणं घातक, रिसर्चचा दावा मुलींना लहान वयात येतेय पाळी कारण..

Antibiotic Side Effects On Girls: भारतात लहान मुलांसाठी अ‍ॅंटी-बायोटिक औषधांचा खूप जास्त वापर केला जातो. जरा ताप आला किंवा सर्दी-खोकला झाला तरी लहान मुलांना अ‍ॅंटी-बायोटिक्स दिले जातात. अशाप्रकारे लहान मुलांना भरपूर अ‍ॅंटी-बायोटिक्स देणं त्यांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं आणि जास्त काळ दुष्परिणाम करणारं ठरतं. अलिकडेच करण्यात आलेल्या एका शोधात सांगण्यात आलं आहे की, बालपणीच अ‍ॅंटी-बायोटिकच्या वापरामुळे मुलींमध्ये प्यूबर्टी लवकर सुरू होते. म्हणजे जर बालपणी मुलींना अ‍ॅंटी-बायोटिक अधिक दिले गेले तर त्यांना मासिक पाळी वेळीआधीच येण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे मुलींना अजिबात अ‍ॅंटी-बायोटिक देऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. 

कमी वयात मासिक पाळी

हा रिसर्च यूरोपिअन सोसायटी ऑफ पीडियाट्रिक अ‍ॅंडोक्रायनोलॉजी आणि यूरोपिअन सोसाइटी ऑफ अ‍ॅंडोक्रायनोलॉजीच्या पहिल्या संयुक्त संमेलनात सादर करण्यात आला. यात कमी वयात औषधांचा वापर केल्यानं पुढे काय काय समस्या होतात याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. शोधात आढळून आलं आहे की, जर बाळांना सुरूवातीच्या काळातच अ‍ॅंटी-बायोटिक औषधं दिली गेली तर त्यांच्यात लवकर puberty येण्याचा धोका वाढतो. म्हणजे मुलींमध्ये 8 वयात मासिक पाळी येण्याची भिती असते. याला मेडिकल भाषेत सेंट्रल प्रीकॉसियस प्यूबर्टी CPP म्हटलं जातं आणि ही स्थिती जास्तकरून मुलींना अधिक प्रभावित करते. गेल्या काही वर्षात यामुळे मुलींमध्ये मासिक पाळी जास्त येत आहे. 

पहिल्या 3 महिन्यात औषधं घेणं अधिक नुकसानकारक

दक्षिण कोरियाच्या हानयांग यूनिव्हर्सिटी गुरी हॉस्पिटल आणि मेडिकल सेंटरच्या अभ्यासकांनी हा शोध केला. ज्यात त्यांनी 0 ते 12 महिन्यांच्या 3.2 लाखांपेक्षा अधिक लहान मुलांच्या मेडिकल रेकॉर्डचं विश्लेषण केलं. नंतर मुलींना 9 वर्ष आणि मुलांना 10 वर्षापर्यंत ट्रॅक करण्यात आलं. शोधातून समोर आलं की, ज्या मुलींना 3 महिने वयाच्या आधीच अ‍ॅंटी-बायोटिक देण्यात आले, त्यांना मासिक पाळी लवकर येण्याचा धोका 33 टक्के जास्त होता आणि ज्या मुलींना जन्माच्या 14 दिवसांच्या आत अ‍ॅंटी-बायोटिक देण्यात आले त्यांना हा धोका 40 टक्के जास्त होता. इतकंच नाही तर 

विचार करा मगच द्या औषधं..

शोधासंबंधीत डॉ. युनसू चोए म्हणाले की, हा अशाप्रकारचा पहिलाच शोध आहे, ज्यात इतक्या मोठ्या संख्येनं मुलांच्या डेटाच्या आधारावर बघण्यात आलं की, औषधाची वेळ, प्रमाण आणि प्रकार मुलांच्या शारीरिक विकासाला कशाप्रकारे प्रभावित करतं. या शोधाच्या निष्कर्षातून समोर आलं की, बाळांना अ‍ॅंटी-बायोटिक देण्याआधी विचार करा. कारण अ‍ॅंटी-बायोटिकचा अधिक वापर त्यांचं आरोग्य खराब करू शकतो.

Web Title: Giving Antibiotics to children it can lead early periods in girls long term negative effects says research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.