Join us
Daily Top 2 Weekly Top 5

मासिक पाळीत हेवी ब्लीडिंगमुळे होतेय लोहाची कमतरता? ५ सुपरफूड आहेत बेस्ट - थकवा घालवून राहा एनर्जेटिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2026 20:00 IST

foods to eat during heavy periods for iron : how to prevent iron deficiency in women : मासिक पाळीत गमावलेले लोह नैसर्गिकरित्या पुन्हा मिळवण्यासाठी रोज खा ५ पदार्थ...

स्त्रीच्या आरोग्यामध्ये दर महिन्याला येणारी मासिक पाळी हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. पण अनेकदा या काळात होणाऱ्या 'हेवी ब्लीडिंग'मुळे (अति रक्तस्राव) शरीर आतून पोखरले जाते. मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना जास्त प्रमाणात रक्तस्राव होण्याची समस्या जाणवते. यामुळे शरीरातील आयर्नचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे अशा त्रासांना सामोरं जावं लागतं. जर ही कमतरता वेळेवर भरून काढली नाही, तर त्याचा परिणाम दीर्घकालीन आरोग्यावर होतो. त्यामुळे या दिवसांत शरीराला आवश्यक पोषण मिळणं अत्यंत गरजेचं ठरतं. अशा परिस्थितीत, आहारात आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करणे हा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय ठरू शकतो(foods to eat during heavy periods for iron).

काही विशिष्ट अन्नपदार्थ नियमित खाल्ल्यास शरीरातील आयर्नची कमतरता भरून निघण्यास मदत होते आणि ऊर्जा टिकून राहते. यासाठीच, मासिक पाळीत गमावलेले लोह नैसर्गिकरित्या पुन्हा कसे मिळवायचे (how to prevent iron deficiency in women) आणि आयर्नची म्हणजेच लोहाची कमतरता भरुन काढणारे घरगुती 'सुपरफुड' पदार्थ नेमके कोणते ते पाहूयात... 

अति रक्तस्रावामुळे (Heavy Bleeding) शरीरातील आयर्न वेगाने होते कमी... 

मासिक पाळी दरम्यान दर महिन्याला गर्भाशयाचा आतील थर (एंडोमेट्रियम), जर गर्भधारणा झाली नाही तर, तुटून शरीराबाहेर पडतो. हे ३ ते ७ दिवसांपर्यंत रक्तस्रावाच्या स्वरूपात बाहेर पडू शकते. सामान्यतः ३० ते ८० मिलीलीटर इतका रक्तस्राव होतो, परंतु काही महिलांमध्ये हे प्रमाण ८० मिलीलीटरपेक्षा जास्त असते, ज्याला 'हेवी मेंस्ट्रुअल ब्लीडिंग' (Heavy Menstrual Bleeding) असे म्हणतात. अति रक्तस्रावामुळे शरीरातील आयर्न (लोह) वेगाने कमी होते, कारण रक्तामध्ये लोहाचे (how to increase iron during menstrual cycle) प्रमाण खूप जास्त असते. लोहाच्या कमतरतेमुळे रक्ताल्पता किंवा ॲनिमिया (Anaemia) होऊ शकतो.

उन्हाळ्यात दह्यात मीठ घालून खावं की दहीसाखर खाणंच फायद्याचं? पाहा शरीरासाठी काय फायद्याचं...

डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी दिवसाला किती पावलं चाललंच पाहिजे? डॉक्टर सांगतात परफेक्ट फॉर्म्युला...

लोहाच्या कमतरतेची लक्षणे...

१. सतत थकवा आणि कमजोरी जाणवणे.

२. धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे.

३. चक्कर येणे.

४. केस गळणे.

५. चेहरा फिका किंवा पिवळसर पडणे.

लोहाची कमतरता भरून काढणारे कोणते पदार्थ खावेत ? 

नॅशनल हेल्थ मिशन (NHM) नुसार, मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्राव होत असल्यास महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'आयरन-फॉलिक ॲसिड' (Iron-Folic Acid) गोळ्या नियमितपणे घ्याव्यात. या गोळ्या रक्तातील लोहाचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात. मात्र, या गोळ्या नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात. गोळ्यांसोबतच, आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे. यासोबतच, 

१. पालेभाज्या :- शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात मुख्यत्वे पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरते.

२. फळे :- लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी बीट आणि डाळिंब यांसारखी फळे नैसर्गिक 'ब्लड प्युरिफायर' आणि 'हिमोग्लोबिन बूस्टर' म्हणून काम करतात.

३. कडधान्ये :- प्रथिने आणि लोहाचा उत्तम स्रोत म्हणून रोजच्या जेवणात डाळी, राजमा आणि चणे यांचा वापर करावा.

४. गोड पदार्थ :- साखरेऐवजी गूळ खाल्ल्याने शरीराला नैसर्गिकरीत्या लोह मिळते आणि ऊर्जा टिकून राहते.

५. सुकामेवा :- रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी दररोज मूठभर काळे मनुके, खजूर आणि बदाम खाणे आरोग्यासाठी उत्तम असते.

असे पदार्थ नियमित खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते.

मुलं बटाट्यासारखी गोलमटोल झाली म्हणून टेंशन आलं, ‘एवढं’ करा-डाएटची शिस्त न पाळूनही होतील फिट...

व्हिटॅमिन 'सी' लोहाचे शोषण करण्यास करते मदत... 

केवळ लोहयुक्त पदार्थ खाऊन चालत नाही, तर ते लोह शरीरात नीट शोषले जाणेही तितकेच महत्त्वाचे असते. व्हिटॅमिन 'सी' (Vitamin C) शरीराला अन्नातील लोह अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करते. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान लोहाच्या बरोबरीनेच व्हिटॅमिन 'सी' युक्त फळे जसे की लिंबू, संत्री, आवळा, कीवी, स्ट्रॉबेरी, पेरू आणि टोमॅटो यांचा आहारात समावेश करा. ही फळे जेवणासोबत किंवा जेवणाच्या दरम्यान खाल्ल्याने शरीरातील लोहाचे शोषण चांगल्या प्रकारे केले जाऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy Bleeding During Periods? 5 Superfoods to Fight Iron Deficiency

Web Summary : Heavy bleeding during menstruation can lead to iron deficiency, causing fatigue and weakness. Include iron-rich foods like leafy greens, beetroot, pulses, jaggery, and dried fruits in your diet. Vitamin C enhances iron absorption. Consult a doctor for iron supplements if needed to maintain energy levels.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्यअन्नफिटनेस टिप्सस्त्रियांचे आरोग्य