Join us

मासिक पाळीबाबत 'ही' खोटी माहिती व्हायरल, चुकीचे आरोग्य सल्ले ऐकून महिला पडताहेत आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2025 18:35 IST

Myths About Menstruation Cycle: मासिक पाळीच्या बाबतीत तुम्हीही सोशल मिडियावरून माहिती घेऊन त्यानुसार वागत असाल तर थोडं थांबा आणि हे वाचा...(fake information about menstrual health)

ठळक मुद्दे काही जणांकडून आलेली माहिती अगदीच वरवरची, उथळ आणि कोणताही शास्त्रीय आधार नसणारी असते.

सध्या सोशल मीडियाचा जनसामान्यांवरील प्रभाव खूप जास्त वाढला आहे. प्रत्येकाच्याच हातात मोबाईल आणि इंटरनेट आहे. त्यामुळे अगदी पाहिजे तो विषय अगदी एका क्लिकच्या बटनाएवढा दूर आहे. साेशल मीडिया इन्फ्लुएन्सर हे प्रस्थ सध्या खूप वाढत आहेत. कोणत्याही गोष्टीविषयी मनात शंका आली तर त्याबाबत सांगणारे कित्येक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर दिसतात. त्यामुळेच मासिक पाळीच्या बाबतीतही अनेक महिला सोशल मीडियावरून माहिती घेतात. माहिती घ्यायला हरकत नाही. पण आपण जिचं ऐकतो आहोत ती व्यक्ती त्याविषयात किती तज्ज्ञ आहे, तिचा त्याविषयाचा किती अभ्यास आहे, याची आधी शाहनिशा करणं गरजेचं आहे. कारण नुकत्याच झालेल्या एव्हरटीन मासिक स्वच्छता सर्व्हेक्षणात असं दिसून आलं आहे की बहुतेक भारतीय महिला मासिक पाळीबद्दल माहिती मिळविण्यासाठी सोशल मीडियाला चांगला स्त्रोत मानतात (myths about menstruation cycle). आणि त्यात सांगितलेल्या चुकीच्या माहितीचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होतो.. तुम्हीही तसंच करत नाही ना?(fake information about menstrual health)

भारतातील दोन तृतीयांशपेक्षा जास्त महिला मासिक पाळीसंदर्भात माहिती मिळविण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतात. काही सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि ब्लॉगर्स याबाबतीत खरंच चांगली माहिती देऊन जनजागृती करतात.

फक्त २० रुपयांची 'ही' वस्तू घरी आणा- किचनपासून बाथरुमपर्यंत सगळं घर होईल स्वच्छ- चकाचक

पण काही जणांकडून आलेली माहिती मात्र अगदीच वरवरची, उथळ आणि कोणताही शास्त्रीय आधार नसणारी असते.

या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका...

१. उशिरा मासिक पाळी येणे म्हणजे पोलिसिस्टिक ओव्हरियन डिसिज म्हणजेच पीसीओडीचा त्रास असणे. हे चुकीचे आहे. वेगवेगळ्या कारणांमुळेही पाळी यायला उशीर होऊ शकतो.

 

२. मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यासाठी लिंबूपाणी किंवा कॉफी पिणे.

३. मासिक पाळीच्या काळात व्यायाम केल्यास शरिराला इजा होणे.

पावसाळ्यात लाकडी फर्निचरला बुरशी, वाळवी लागण्याची भीती? ४ टिप्स- फर्निचर टिकेल वर्षांनुवर्षे.. 

४. मासिक पाळीचे रक्त अपवित्र असते. त्यामुळे यादरम्यान महिलांनी लोणचे किंवा आंबवलेले पदार्थ खांना स्पर्श करू नये.

५. मासिक पाळीदरम्यान केस धुणे आळावे. दूध आणि दही यासारखे पांढऱ्या रंगाचे पदार्थ टाळावे.   ६. टॅम्पॉन्स वापरल्यामुळे जननेंद्रीय मोठे होते तर मासिक कप वापरणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. अशा प्रकारची माहिती सोशल मीडियावर नेहमीच पसरवली जाते. या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगलेच.. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्यसोशल मीडिया