lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > PCOS आहे? करा 5 प्रकारचे व्यायाम, PCOS नियंत्रणात ठेवा, भविष्यातील धोके टाळा

PCOS आहे? करा 5 प्रकारचे व्यायाम, PCOS नियंत्रणात ठेवा, भविष्यातील धोके टाळा

पीसीओएस (pcos) ही गंभीर समस्या असली तरी योग्य आणि संतुलित आहार आणि व्यायाम (exercise) याद्वारे ती नियंत्रित करता येते. व्यायाम करताना पीसीओएस डोळ्यासमोर ठेवून काही विशिष्ट व्यायाम (exercises for control pcos) प्रकार केल्यास पीसीओएसची समस्या नियंत्रणात ठेवण्यास त्याचा फायदा होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 04:11 PM2022-07-15T16:11:59+5:302023-09-21T12:14:04+5:30

पीसीओएस (pcos) ही गंभीर समस्या असली तरी योग्य आणि संतुलित आहार आणि व्यायाम (exercise) याद्वारे ती नियंत्रित करता येते. व्यायाम करताना पीसीओएस डोळ्यासमोर ठेवून काही विशिष्ट व्यायाम (exercises for control pcos) प्रकार केल्यास पीसीओएसची समस्या नियंत्रणात ठेवण्यास त्याचा फायदा होतो.

Do 5 types of exercise to control PCOS. | PCOS आहे? करा 5 प्रकारचे व्यायाम, PCOS नियंत्रणात ठेवा, भविष्यातील धोके टाळा

PCOS आहे? करा 5 प्रकारचे व्यायाम, PCOS नियंत्रणात ठेवा, भविष्यातील धोके टाळा

Highlightsपीसीओएसचा त्रास कमी करण्यासाठी स्ट्रेन्थ ट्रेनिंगचा चांगला उपयोग होतो.झुम्बा व्यायामानं वजन कमी होत असल्यानं पीसीओएसच्या समस्येत गर्भधारणा होण्यासही मदत मिळते.नियमित योग केल्यानं पाळीच्या समस्या कमी होतात. 

अनेक महिला आणि मुलींना पीसीओएसचा (pcos) त्रास असतो. या समस्येत शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. शरीरात ॲस्ट्रोजनऐवजी टेस्टोस्टेरोन हे पुरुषी हार्मोन्स वाढतं.  पीसीओएसमध्ये  चेहेऱ्यावरचे, अंगावरचे केस वाढणे, पाळी अनियमित येणे, चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येणं, ओटीपोट वाढणं  तसेच गर्भधारणेत अडचणी जाणवणं या समस्या जाणवतात. पीसीओएस ही गंभीर समस्या असली तरी योग्य आणि संतुलित आहार आणि व्यायाम (exercise) याद्वारे ती नियंत्रित करता येते. व्यायाम करताना पीसीओएस डोळ्यासमोर ठेवून काही विशिष्ट व्यायाम प्रकार (exercises for control pcos)  केल्यास पीसीओएसची समस्या नियंत्रणात ठेवण्यास त्याचा फायदा होतो. 

Image: Google

1. स्ट्रेन्थ ट्रेनिंग

पीसीओएसचा त्रास कमी करण्यासाठी स्ट्रेन्थ ट्रेनिंगचा चांगला उपयोग होतो. पूल अप्स, पूश अप्स, स्क्वाॅट्स, प्लॅंक हे स्ट्रेन्थ ट्रेनिंगचे प्रकार आहेत. स्ट्रेन्थ ट्रेनिंगमुळे स्नायू मजबूत होतात. महिलांमधील प्रजननाच्या समस्या कमी होतात. स्ट्रेन्थ ट्रेनिंगमुळे मनावरचा ताणही कमी होतो. स्ट्रेन्थ ट्रेनिंग हे तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून शिकून तंत्रशुध्द पध्दतीनं केल्यास त्याचा फायदा होतो. पण व्यायाम चुकीचा केल्यास शरीरातील टेस्टोस्टेरोन या हार्मोनची पातळी वाढते. 

Image: Google

2. झुम्बा

झुम्बा हा व्यायामही आहे आणि तो करताना मजाही येते. टेन्शन न घेता हा व्यायाम करता येतो. झुम्बा केल्यानं महिलांमधील स्थूलता कमी होते. पाळीसंबंधीच्या तक्रारी बऱ्याच प्रमाणात कमी होतात. व्यायाम म्हणून झुम्बा डान्स केल्यास शरीर लवचिक आणि फिट होतं. झुम्बा व्यायामानं वजन कमी होत असल्यानं पीसीओएसच्या समस्येत गर्भधारणा होण्यासही मदत मिळते. 

Image: Google

3. योग

निरोगी आणि आनंदी राहाण्यासाठी आपल्या दीनचर्येत योगचा समावेश अवश्य करावा. नियमित योग केल्यानं पीसीओएसमुळे असंतुलित झालेले हार्मोन नियंत्रणात येण्यास मदत होते. पेल्विक भागातील अवयवांना रक्तपुरवठा व्यवस्थित होतो. पाळीच्या समस्या कमी होतात. योग केल्यानं शरीराच्या ताणासोबतच मनावरचा ताण तणावही दूर होतो. योग केल्यानं दिवसभर उत्साही वाटतं. प्रजननक्षमता वाढण्यासाठी भ्रामरी प्राणायाम , विपरीताकर्णी, पश्चिमोत्तानासन आणि भुजंगासन ही आसनं केल्यास फायदा होतो. 

Image: Google

4. चालणे- फिरायला जाणे

दिवसाची सुरुवातच जर चालण्यानं केल्यास संपूर्ण दिवस शरीराची आणि मनाची ऊर्जा टिकून राहाते. ताजंतवानं वाटतं. सकाळी उठून फिरल्यानं पीसीओएसची समस्या तर नियंत्रणात राहातेच सोबतच रक्तदाब, हदयविकाराचा धोकाही कमी होतो. चालण्यामुळे संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह चांगला राहातो. फिट होण्यास/ राहाण्यास चालण्याच्या व्यायामाचा फायदा होतो. 

Image: Google

5. पोहोणे

पोहोणे हा उत्तम व्यायाम समजला जातो. पोहोण्याचा व्यायाम करताना शरीरातील रक्तप्रवाह वेगवान होतो. श्वासासंबंधी समस्येवरही आराम मिळतो. पीसीओएसच्या समस्येत आठवड्यातून 3- 4 वेळा पोहोण्याचा व्यायाम केल्यास फायदेशीर ठरतो.

Web Title: Do 5 types of exercise to control PCOS.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.