Clove For Period Pain: मासिक पाळीदरम्यान वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. पोटदुखी, ओटीपोट दुखणे या कॉमन समस्या असतात. पण अनेकदा वेदना खूप असह्य असतात. ज्यामुळे औषधं घ्यावी लागतात. मात्र, यावर काही घरगुती उपायही आहेत. डायटिशिअन श्वेता शाह पांचाल यांनी असाच एक उपाय सांगितला आहे. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी लवंग खूप फायदेशीर ठरते. यात वेदना दूर करण्याचे नॅचरल अॅंटी-इन्फ्लामेटरी तत्व असतात. जे या काळात होणाऱ्या वेदना कमी करून आराम देतात. पण यासाठी लवंग कशी खाल हे पाहुयात.
हर्बल टी
वेदना दूर करण्यासाठी श्वेता यांनी सांगितलं की, लवंग टाकलेली हर्बल टी खूप फायदेशीर ठरते. हर्बल टी बनवण्यासाठी ३ ते ३ लवंग ३०० मिली पाण्यात टाका. पाणी अर्ध होईपर्यंत ते उकळवून घ्या. नंतर हे पाणी गाळून कोमट असताना प्या. हा चहा आपण दिवसातून दोन १ ते २ वेळा प्यायल्यास पोटदुखीचा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते.
लवंग चघळा
जर चहा करायला वेळ नसेल किंवा प्यायचा नसेल तर आपण थेट लवंग तोंडात ठेवून चघळू शकता. यानंही फायदा मिळेल आणि ही पद्धतही सोपी आहे. तसेच असं केल्यानं तोंडाची दुर्गंधी सुद्धा दूर होईल.
लवंगाचं तेल
डायटिशिअन सांगतात की, लवंग पोटात घेण्यासोबतच याच्या तेलाचे सुद्धा खूप फायदे असतात. जर लवंगाच्या तेलानं पोट शेकलं तर आराम मिळू शकतो. लवंगाचं तेल गरम करा. या तेलानं पोटाच्या खालच्या भागात हलक्या हातानं मसाज करा. या उपायानं स्नायूंना आराम मिळतो आणि वेदना कमी होतात.
काय काळजी घ्याल?
लवंगाचे फायदे भरपूर आहेत. वेगवेगळ्या घरगुती उपचारात याचा फायदा होतो. पण इतके फायदे असूनही लवंग खूप जास्त खाऊ नये. कारण लवंग गरम असते. जास्त खाल तर पोटात जळजळ, गॅस किंवा अॅसिडिटीची समस्या होऊ शकते.