Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मासिक पाळीच्या वेदना कमी करणारं सुपरफूड म्हणजे बीट, डॉक्टर सांगतात बीट खाण्याचे फायदे

मासिक पाळीच्या वेदना कमी करणारं सुपरफूड म्हणजे बीट, डॉक्टर सांगतात बीट खाण्याचे फायदे

Beetroot Benefits In periods : सुपरफूड ठरणारी भाजी म्हणजे बीट महिलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 13:20 IST2025-08-22T12:03:00+5:302025-08-22T13:20:22+5:30

Beetroot Benefits In periods : सुपरफूड ठरणारी भाजी म्हणजे बीट महिलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर...

Beetroot benefits for women during periods | मासिक पाळीच्या वेदना कमी करणारं सुपरफूड म्हणजे बीट, डॉक्टर सांगतात बीट खाण्याचे फायदे

मासिक पाळीच्या वेदना कमी करणारं सुपरफूड म्हणजे बीट, डॉक्टर सांगतात बीट खाण्याचे फायदे

Beetroot Benefits In periods : मासिक पाळी म्हटली की महिलांना सतत थकवा, पोट दुखणं, ब्लोटिंग, मूड स्विंग अशा गोष्टींचा सामना करावाच लागतो. त्यामुळे या दिवसांमध्ये शरीराला खास पोषणाची आणि काळजी घेण्याची गरज असते. कमजोरी होऊ नये म्हणून महिलांनी पौष्टिक गोष्टी खाल्ल्या-पिल्या पाहिजेत. अशात आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. वैशाली शुक्ला यांनी एका सुपरफूड भाजीबाबत माहिती दिली आहे. ती म्हणजे बीट. मासिक पाळीदरम्यान महिलांना बिटाचे काय काय फायदे मिळतात हे पाहुयात.

मासिक पाळीत बिटाचे फायदे

बीट हे मासिक पाळीदरम्यान महिलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. बीट या दिवसात एखाद्या नॅचरल औषधीसारखं काम करतं. या दिवसांमध्ये बीट खाल्ल्यास शरीराला एनर्जी मिळते, क्रॅम्प्स कमी येतात आणि हार्मोनल बॅलन्स संतुलित ठेवण्यास मदत मिळते. बिटामध्ये बीटा लाइन्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्स असतात. या तत्वांमुळे ब्लड सर्कुलेशन सुरळीत होतं, तसेच शरीरातील विषारी तत्वही बाहेर पडतात. अलिकडे अनेक महिला अ‍ॅनीमिया किंवा हीमोग्लोबिन कमी झाल्याच्या शिकार होतात. अशात बीट त्यांना एनर्जी देऊ शकतं.

मासिक पाळीदरम्यान कसं खावं बीट?

मासिक पाळीदरम्यान बीट उकडून घ्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करा. त्यानंतर त्यावर लिंबाचा रस टाका. तसेच वरून थोडे तीळ आणि मीठ टाका. हा बिटाचा सलाद आपण मासिक पाळीदरम्यान खावा. 

Web Title: Beetroot benefits for women during periods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.