Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > पाळीमध्ये पेनकिलर घ्यावीच लागते? डॉक्टर सांगतात खास उपाय, पाळीचा त्रास जाणवणारच नाही... 

पाळीमध्ये पेनकिलर घ्यावीच लागते? डॉक्टर सांगतात खास उपाय, पाळीचा त्रास जाणवणारच नाही... 

Ayurvedic Home Remedies For Pain Free Periods: मासिक पाळीदरम्यान तुम्हालाही दर महिन्याला पेनकिलर घेण्याएवढा जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांनी सांगितलेला हा खास उपाय करून पाहाच.. (how to reduce menstrual pain?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2024 12:05 PM2024-06-18T12:05:11+5:302024-06-18T12:05:57+5:30

Ayurvedic Home Remedies For Pain Free Periods: मासिक पाळीदरम्यान तुम्हालाही दर महिन्याला पेनकिलर घेण्याएवढा जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांनी सांगितलेला हा खास उपाय करून पाहाच.. (how to reduce menstrual pain?)

Ayurvedic home remedies for pain free periods, how to reduce menstrual pain | पाळीमध्ये पेनकिलर घ्यावीच लागते? डॉक्टर सांगतात खास उपाय, पाळीचा त्रास जाणवणारच नाही... 

पाळीमध्ये पेनकिलर घ्यावीच लागते? डॉक्टर सांगतात खास उपाय, पाळीचा त्रास जाणवणारच नाही... 

Highlightsसलग ३ महिने हा उपाय करा. यामुळे पाळीचा त्रास एवढा कमी होईल की पाळी आल्याचं तुम्हाला जाणवणारही नाही. त्यानंतर हे उपाय नाही केले तरी चालेल. 

मासिक पाळी म्हणजे अनेकजणींसाठी दर महिन्याची डोकेदुखी असते. काही जणींना तर पाळी येण्याच्या आधीपासूनच पोट, पाठ दुखायला सुरुवात होते. पायात गोळे येऊ लागतात. पाळी सुरू झाल्यानंतर तर हा त्रास कितीतरी पटींनी वाढतो. पहिला एक किंवा दोन दिवस इतका त्रास होतो की शेवटी पेनकिलर घेऊनच त्या वेदना थांबवाव्या लागतात. बऱ्याच जणींना तर दर महिन्याच्या त्या चार दिवसांत एक दिवस तरी सुटी घेऊन शाळा, कॉलेज, ऑफिसला सुटी मारावी लागते (how to reduce menstrual pain?). तुम्हालाही पाळीचा असाच त्रास होत असेल आणि तो कमी करण्यासाठी तुम्हीही दर महिन्याला पेन किलर घेत असाल तर आयुर्वेदतज्ज्ञांनी सांगितलेला हा एक सोपा घरगुती उपाय लगेचच करून पाहा. (Ayurvedic home remedies for pain free periods)

 

मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी उपाय

मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी कोणता घरगुती उपाय करावा, याविषयीची माहिती आयुर्वेदतज्ज्ञांनी vaidya_mihir_khatri या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी ५ पद्धतीने करा कोरफडीचा उपयोग, ओपन पोअर्स, डार्कसर्कल्स होतील गायब

साधारण आपल्याला आपली पाळी कधी येणार याचा अंदाज असतोच. त्याप्रमाणे पाळी साधारणपणे ज्या दिवशी येणार असे तुम्हाला वाटते, त्याच्या ५ दिवस आधीपासून हे २ उपाय सुरू करा.

पहिला उपाय करण्यासाठी रात्री झोपण्यापुर्वी १ चमचा तूप घ्या. त्यात २ केशराच्या काड्या भिजत घाला. सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी हे तूप खा आणि त्यावर १ ग्लास कोमट पाणी प्या.

 

पहिला उपाय केल्यानंतर एखाद्या तासाने हा दुसरा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी रात्री झोपण्यापुर्वी ५ काळ्या मनुका पाण्यात भिजत घाला. दुसऱ्यादिवशी वर सांगितलेला तुपाचा उपाय केल्यानंतर १ तासाने या मनुका खा. त्या मनुका ज्यामध्ये भिजत घातल्या आहेत, ते पाणी प्यायले तरी चालेल. 

काकडीच्या सालींचे 'हे' उपयोग पाहाल तर कधीच ते कचऱ्यात नाही फेकणार- बघा कसे वापरायचे

सलग ३ महिने हा उपाय करा. यामुळे पाळीचा त्रास एवढा कमी होईल की पाळी आल्याचं तुम्हाला जाणवणारही नाही. त्यानंतर हे उपाय नाही केले तरी चालेल. 


 

Web Title: Ayurvedic home remedies for pain free periods, how to reduce menstrual pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.